झाडीबोली रचना
वावर - कसं जगावं मर्दानं*
मांझ वावरं वावरं, मालं देई जीवन,दान
काऱ्या ढेकलातं राबावं अस्सल झाडप्या मर्दानं
सोसं ऊन वारा पानी,कइ तडाखा दवाचा
उगवनं सोनं नानं,एक किरन आसचा
मूठभर बि बिजाई, ढोल्या भरते खंडीनं
काऱ्या ढेकलातं राबावं अस्सल झाडप्या मर्दानं
फांदी लेकराचा झुला,संग बायको राबते
माय माई कारी माती, थेंब घामाचे सोकते
बीज गर्भारून भूई,जीव इवला येईन
काऱ्या ढेकलातं राबावं अस्सल झाडप्या मर्दानं
डोरे सुखावून जाते, पावून हिवरा सपन
जीव जंतू हरकते धरनीच्या सिंगारन
बळीराजाले सालोबाद , रावो हास वरदान
काऱ्या ढेकलातं राबावं अस्सल झाडप्या मर्दानं
निसरग कोपला का , येते पाऊस वादळी
हिवरा नेसना फेडते, रडते राकनारा माळी
ढीग कर्जाचा पावून, हिलगते कासऱ्यानं
कर्जाच्या वज्याखाली, कसं जगावं मरदान
कसं जगावं मरदान...?
*सौ.किरण महादेव चौधरी*
*नवेगाव -कॉम्प्लेक्स गडचिरोली*
