सपान
करपली शेंग, उभावल रान,
पीक ना हाताशी राहील ना भान,
कास्तकार बाप माह्या आशेन जगते,
सपान येचतो रोज सपान येचते,
वावरात बाप रोज सपान येचते....
बहरला गहू पडे ज्वारी मंधी जीव,
यले त्याचे दिसा-राती कोणा नाही कीव,
पाटाच्या ह्या पान्यासंग घाम निथयते,
सपान येचतो रोज सपान येचते,
वावरात बाप रोज सपान येचते....
वाकुल्या दावते रोज चन्यातली अई,
पीक होइन कस आता करपली कयी,
बुजगावण्याच्या संग बाप उभा होते,
सपान येचतो रोज सपान येचते,
वावरात बाप रोज सपान येचते....
भाव पडे मालाचा जशी गळे पाती,
राब राब राबुनिया कायी नाही हाती,
धुरा धुरा फिरूनिया जाग्रनाले जाते,
सपान येचतो रोज सपान येचते,
वावरात बाप रोज सपान येचते....
बळी राज्या येर आता जनम घे पुन्हा,
कास्तकार झालो मी हाच का रे गुन्हा,
पूर्ण होवो इच्छा साऱ्या हात जोडते,
सपान येचतो रोज सपान येचते,
वावरात बाप रोज सपान येचते....
- अभय दांडेकर
हिंगणघाट जि.वर्धा
9960535500
