Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

पिवळे हात

Main page content

आशिष आ. वरघणे
By आशिष आ. वरघणे | 7:21 AM IST, बुध November 25, 2026
कथा

पिवळे हात

गाव अजून जागं झालं नव्हतं. अंथरुणात ज्वारीच्या ओझ्याला चादर गुंडाळून टाकावी तशी ती पडलेली. तिला उठावसं वाटत नव्हतं. पण तिच्या कानामधी अंगणातल्या भांड्यांची आदळ आपट ऐकू येत होती. मात्र अलीकडे ठरलेल्या वेळेपेक्षा ती अर्धा-पाऊणतास उशीरा झोपेतून उठत असत. म्हणून दरम्यान अंगावरचं पांघरुण फेकत मायनं आवाज दिलेला. त्यामुळे साहजिकच तिचं डोकं गरम झालेलं. मग डोळ्याला कसली झोप येईल. ती पळून गेलेली. आईला शेतात जायचं होतं. त्या घाईनं तिची लगबग सुरू होती. हे सगळं तिला ठाऊक होतं. अखेर आईचा राग तिने डोळ्यातून पुसून काढला. तेवढ्यात आईचा आवाज आला, "सये, अजच्या दिवस वावरत चालतं का वं ?"
शेतात पराटीचं निंदन सुरू होतं. म्हणून आई मुद्दामहूनच तिला म्हणालेली. पण लेकीची शून्य प्रतिक्रिया न आल्यानं आईला तिचा उद्देश कळून चुकला. तरीही ती पुन्हा म्हणाली, "आवं, चालतं का नाई निंदाले ? मी अर्धी पाथ घीन तुह्यी. ह्याच वयात वावरातले कामं पोरीले आले पाह्यजे का नाई. कोन्त घर भेटते कसं, हे सांगता येत नाई."
दाराबाजूच्या ओट्यावर गोविंदराव बसून गुळाच्या चहाचा कप हातात घेऊन आकाशवाणीच्या बातम्या ऐकत होते. पण बायकोच्या बोलण्यानं त्यांच्या चेहऱ्यावरचं चहापासून मिळालेलं समाधान पाहता पाहता गळून पडलं. अन् अस्वस्थतेचं जाळं काळजीच्या कोळीनं विणत नेलं. कारण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्यांची एकुलती एक मुलगी-सई होती. आणि तिला शेतात नेणं त्यांना ते अमान्य असायचं. म्हणून ते बायकोवर उद्विग्न होऊन खेसकले, "कावं, तुह्य मोठ्या पोऱ्याईले वावरत नेवून मन दाह्यलं नाई का ? त्यायनं दावीतच हिंमत हारली. पुढं शिकल्या नाई. मनून हिनं पन शिकाचं नाई का ?"
"अजून डोस्क्यावर बसवा चांगली, थ्या घोडमीले. तुमच्या लाडापाई तुमच्या लाडलीले सयपाकाचा धड चवाडा नाई." सुमनबाई विळ्यानं कराकरा गवत कापावी तशी बोलली.
महिन्यातून दोन-चारदा तरी ह्यांचे भांडण होतात. त्याला कारण प्रत्येकवेळी सईच असते. मग कारण क्षुल्लक का असेना तरी भांडण ठरलेलंच असतात. कारण ती आईला कुठल्याच कामात मदत करतांना दिसत नाही. अन् आपल्या लेकीनं साधं पडलेलं काम उचलू नये. याचं आश्चर्य पाहून ती नेहमीच तिला बोलत असतात. जशी आज ती बोलत होती. अशी नेहमीची बाचाबाची पाहून सई आपले कामं भरभर करायची. कारण त्या कामात तीचा कोणीही हात पकडत नसे. कारण ती हुशार व बोलकी होती. शिवाय तितकीच देखणी देखील. बारावी उत्तीर्ण झाल्यावर तालुक्यातील महाविद्यालयात तिचा प्रवेश झालेला. घरची परिस्थिती मध्यम होती. पण मुलीच्या शिक्षणासाठी गोविंदरावांनी कोणतीही तडजोड केली नाही. कारण त्यांची अपेक्षा त्यावेळी प्रचंड शिकायची होती. पण आबा म्हणजे त्यांचे वडील मधेच गेल्याच्याने ती अधुरी राहिली. पण आपल्या लेकीनं खूप शिकावं, मोठं व्हावं. तिनं अधिकारी बनावं, असे त्यांचे स्वप्न होते. म्हणून लेकीवर ते खूप जीव लावायचे. तिला शेतात न्यायचं म्हटलं, की ते वस्कावून धावायचे. त्यांना शिक्षण म्हणजे काय? हे चांगल्याअर्थी ठाऊक होतं.
"बाबा, मी चालली जी," सईनं बाहेर निघताच आवाज दिला.
"हो बाई, बरोबर जाजो. काही अडचण आली त फोन कराचा," गोविंदराव बैलाचा कासरा घेत म्हणाले.
"हो बाबा."
सईनं हसत हसत उत्तर दिले आणि घराबाहेर पडली. तिच्या मागे आईची नजर बराच वेळ रेंगाळत राहिली. सुमनबाईचं असं पाहणं बघून नेहमीसारखे गोविंदराव म्हणाले, "रोजच अशी कायले पाह्यतं वं, शक धरल्यावानी. बाकीच्या पोरायसारखी नाई आपली, सई. रोज कॉलेजात जाते. एक दिवस आपलं नाव मोठं करन. ध्यानात ठेव मी का मंतो त."
"बाप्पा, पाह्यतो न आता कितीक दिवे लावते त. सयपाकाचा चोदा नाई न म्हणे नाव मोठं करणार!"
सुमनबाईचं असं बोलणं हे नेहमीच असायचं. पण 'लेक छातीशी बिलगते काय होते... वाघ असतो बाप त्याची गाय होते.' अशागत गोविंदरावांचं व्हायचं. त्यांच्या दोन्ही मोठ्या पोरींचे लग्न झालेले. सई ही लहान असल्याने अतीव लाडाची होती. कारण त्या दोघींपेक्षा ही शिक्षणात आघाडीवर असायची.

आता कॉलेजमध्ये गेल्यावर सईचं आयुष्य बदलू लागलेलं. नवीन मित्र-मैत्रिणी मिळालेले. वातावरण स्वास्थहारक होतं. शिवाय मनासारखं स्वातंत्र्य. कसलंच बंधन पुढ्यात नव्हतं. त्यामुळे आता मागे पुढे पाहायला काहीच वाव नव्हता. आकाश निळे होते ; अन् तिच्या पंखात बळही होते. फक्त आता आकाशाला गवसणी घालायची होती. उंच उंच झेप घ्यायची होती. पण त्याचवेळी तिची ओळख झाली रोहनशी. रोहन पहायला स्मार्ट आणि बोलणारा होता. सुरुवातीला नोट्सपुरतीच ओळख होती. पण काही दिवसांतच ती मैत्री अजून मैत्रीच्या पलीकडे गेली. मजबूत झाली. एके दिवशी सकाळी साडे सातच्या सुमारास कॉलेजात आल्या आल्या रोहनने तिला कॅन्टीनमध्ये विचारलं,"सई, आज चायनिज खायला जायचं का?"
"पण माझं लेक्चर आहे."
"एक दिवस नाही केलं तर काय होणार ?"
".........…..." ती काहीच बोलली नाही. निर्विकार मुद्रेनं शून्यात पाहत होती. दरम्यान तो तिचा चेहरा वाचत बसलेला. मग दोघेही बराच वेळ विचार करत बसले. शिवाय दोघात स्तब्धतेचा वावर. अखेर ती क्षणभर थांबली आणि मग खूप विचार करून म्हणाली, "ठीक आहे."
दरम्यान दोघांच्याही डोक्यावर काळया ढगांचा धूर पसरलेला. तो कसल्यातरी दिशेने पळत होता. दोघांच्याही मनासारखा. आणि कॅन्टीन समोरचे पामची उंच उंच झाडी त्या काळोख्या ढगांना पळायला सपोर्ट करत होती. तो बेबंद वारा दोघांच्याही तना-मनाला स्पर्शून जात होता. तेवढ्यात आभाळातून टपोरे थेंब बरसू लागले. कॉलेजच्या ग्राउंडमधून क्लासमध्ये जाताना दोघांच्याही अंगावर त्या टपोऱ्या थेंबांनी रोमांच उठवले. शिवाय त्या थेंबांनी तिच्या सौंदर्यात भरच भर घातली. आणि तिचे ओढणीने थेंब पुसताना पाहून तो तिला नुसता न्याहाळत राहिला. मधेच तिचे लक्ष त्याच्याकडे गेले. तेव्हा त्याने एक छानशी स्माईल दिली. आपल्याला अवतीभवतीचे मुलं-मुली न्याहाळत आहे. असे समजताच दोघेही वर्गाकडे वळाले. या दिवसापासून त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. कधी शिवाजी उद्यान, कधी सिनेमा, कधी हॉटेल, कधी तालुक्या बाहेर एकदिवसीय सहल. घरी मात्र बाबांनी विचारलं उशीर का झाला तेव्हा एकच उत्तर तयार असायचं, "आज एक्स्ट्रा लेक्चर होतं."
"आज प्रॅक्टिकल होतं."
"आज सेमिनार होता." आई पेक्षा वडील विश्वासाने मान डोलवायचे. ही तिची खोटं बोलण्याची सुरुवात होती. पण हळूहळू ती दिवसेंदिवस वाढत गेली. आणि तिच्या आयुष्याचा एक भाग झाली. एका रात्री जेव्हा ती हाल्टिंग बसनं घरी आली. तेव्हा तिला दारातच सुमनबाईंनी विचारलं, "बाई, इतका उशीर का झाला व?"
"आई, प्रोजेक्ट सबमिशन होतं." ती नेहमी सारखी मंदशी हसत बोलली. पण आईला तिचा चेहरा उतरल्यागत दिसत होता. लेकीचा निस्तेज चेहरा पाहून सुमनबाईच्या काळजात लककन झालं. पण तसं काहीसं झालं नसावं म्हणून फारसं मन भरकटू दिलं नाही. मनाला आवर घातली. पण प्रत्यक्षात त्या दिवशी सई आणि रोहन तालुक्याबाहेर गिरडच्या डोंगरावर फिरायला गेले होते. ठरल्याप्रमाणे सई सकाळी बस स्टॉपवर पोहचली. बसमधून खाली उतरत असताना तिने तोंडाला स्कार्प बांधलेला. फक्त त्यातून तिची घायाळ करणारी नजर दिसत होती. रोहनने तिला ओळखले. तिला पल्सरवर बसवून तालुका मागे टाकला. दरम्यान तिच्या काळजात धडधड वाढत होती. एखाद्या हरिणीगत दचल्यासारखं तिला व्हायचं. मन भलत्यासलत्या विचारानं लकलकायचं. अशोका हॉटेलच्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर त्याने बाइक थांबवली. तिला वाटलं पेट्रोल टाकत असावा. पण त्याने बाइक बाजूला उभी करून ठेवली. ती कोड्यात पडल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. अखेर तिनं त्याला विचारलं, "अरे, इथं गाडी कशाला थांबवली ?"
"अगं, आरंभ्याचे दोन मित्र पण आपल्या सोबत येणार आहे."
"अरे, पण त्याचं काय काम ?"
"अगं, त्यांच्या सोबत पण त्यांच्या जीएफ येणार आहे."
"अच्छा !" ती म्हणाली.
हा हा म्हणता काही वेळातच दोन बाइक त्यांच्या जवळ येऊन थांबल्या. त्या बाईकवर देखील घोरपडीसारख्या झाडाला चिकटलेल्या दोन मुली होत्या. रोहनने बाइक पुढे काढली. आणि अँक्सिलेटरला पीळ भरून बाइक वेगानं दामटवली. लसणपूरला मागे टाकल्यावर रोहनच्या पुढे असलेल्या बाईकवर त्याच्या मित्राची जिएफ बाईकच्या पायदानावर पाय ठेऊन बीएफच्या पाठीला रेलून तोल सांभाळत उभी झाली. आणि सेल्फी काढू लागली. तेवढ्यात बाइकचा समोरचा चक्का खड्यातून उसळला. अन् सेल्फी काढणारी ती वादळाने हलकसं झाड कोसळावं तशी कोलमडून खाली कोसळली. तिच्या डोक्याला जबर मार बसला नाही. तेवढ्यानं बरं वागलं. फक्त तिच्या दंडाला आणि गुडघ्याला खरचटलेलं. त्यांच्या मागे पुढे डांबरी रस्ता सुनसान होता म्हणून बरे झाले. नाही तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नव्हता. हे सारं पाहून सईच्या हृदयाची टिकटिक अजूनच वाढली. ती त्याला म्हणाली, "रोहन, परत चल. आजचा दिवस चांगला नाही. मला भीती वाटत आहे."
"अगं, काही होत नाही. आपण यांना मागे टाकून लवकरच परत येऊ."
तिनं यावर फक्त "हुं" केलं. पडलेल्या त्या मुलीला तिच्या बीएफनं बाईकच्या प्रथमोपचार बॉक्समधून खरचटल्या ठिकाणी ट्यूब लावून दिला. अन् गिरडच्या मार्गानं तिन्ही बाईक वेगानं पळू लागल्या.
सारखपावलीच्या दर्ग्यात सर्वांनी चादर चढवली. नमस्कार केला. आणि डोंगरावरच्या फरीद बाबाच्या दर्ग्याकडे तिन्ही बाईक डोंगर चढू लागल्या. डोंगरावर गेल्या गेल्या तिघांनी मिळून चादर चढवली. नमस्कार केला. आणि चिवडा सेंटरमध्ये कच्चा चिवडा खायला तिन्ही जोड्या गोल करून बसल्या.
गिरडच्या डोंगरावरून खाली असलेले शेतजमिनीचे तुकडे लहान लहान दिसत होते. डोंगराच्या खालच्या बाजूला गाई चरत होत्या. इकडचा तिकडचा अदमास घेऊन रोहनने डोंगरावरून येणाऱ्या एका नागमोडी पायवाटेवरून तिला सेल्फीच्या निमित्याने खाली बोलावले. अशा बारक्या बारक्या पायवाटा डोंगराला भरपूर होत्या. खाली काही अंतरावर गर्द राहीत आल्यावर एका जाडसर पळसाच्या झाडाच्या आडोशाला त्याने तिला कवटाळून धरले. त्यांच्यासारख्या दोन्ही जोड्या आपापल्या मस्तीत झिंगलेल्या. सई त्याच्या विळख्यातून मोकळी होण्यासाठी धडपडत होती. पण त्याने बोटात बोट फसवून तिचे हात कच्च आवळून धरलेले. तिचे पाय थरथरु लागले. ती नाही नाही म्हणू लागली. तरी पण तो ऐकेना. त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि दोन्ही ओठांचा घट्ट पीळ बसला. छाती-छातीशी भिडली. दोन हृदय एक झाले. दोन्ही शरीर उष्णशा धगीने पेटून उठले. त्याने तिच्या ओठांना ओठातून मुक्त करून तिच्या हृदयाच्या स्पंदनावर ओठ टेकवले. मग त्याखाली एका लयीत त्याने तिला हळूहळू चुंबत नेले. तिची छाती वर खाली होऊ लागली. तिच्या अंगांगावर रोमांच फुलत गेले. आणि त्या फुलण्यातून घाम निथळू लागला. अन् क्षणार्धात बराच वेळ आवरून ठेवलेलं अवसान पचकन गळल्यागत झालं. त्याने तिच्या अंगावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळण्यासाठी सोडून दिला. तिने त्याच्या कपाळावर समाधानाचे ओठ टेकवले. आणि करकचून मिठी मारली.
घरी परतताना रोहन म्हणाला, "तुझे आई-बाबा खूप विश्वास ठेवतात तुझ्यावर."
सई हसली. म्हणाली, "हो. का बरं!" तिने त्याला विचारले. तो काहीच बोलला नाही. पण तिच्या नकळत तो विश्वास रोज थोडा-थोडा तुटत होता. हे तिला ठाऊक नव्हतं.

सोमवारच्या आठवडी बाजारात गोविंदराव गेले होते. तिथे त्यांच्या ओळखीचे शिंदे काका भेटले. शिंदे काका म्हणजे पूर्वीचे त्यांच्या गावचे. त्यांच्या घरामागचे. पोरांच्या शिक्षणासाठी आणि कंपनीतल्या जॉबकरिता ते तालुक्याला आलेले. पूर्वी त्यांचा खूप घरोबा होता. पण आता काका तालुक्याला राहत असल्याने तो तोंडपुरताच राहिलेला.
"अरे गोविंदा, काल तुझी सई दिसली होती."
"कॉलेजमध्ये?"
"नाही गा ! शिवाजी पार्कमधे एका पोरासोबत बोलत होती."
गोविंदराव काहीसे हसले. आणि उजागरीनं म्हणाले, "काकाजी, आमची सई तशी नाई. तुमाले काही तरी गैरसमज झाला. ती गावातच कोणासंग धड बोलत नाई. त बाहेर कशी बोलण ?"
काकांचा नाइलाज झाला. आणि मनात गोविंदाचं पटल्यासारखं झालं. तेव्हा ते म्हणाले, "मले तिच्यावाणीच दिसली. बरं जावू दे... असन कोणीही." असे म्हणून शिंदे काका पुढे निघून गेले.
गोविंदरावांच्या मनात क्षणभर शंकेची रेघ उमटली. पण त्यांनी लगेच ती पुसून काढली. आपली सई ती नसनच. ती कवाच आपला विश्वासघात करणार नाही. आपली तिच्याकून किती अपेक्षा हाये. आपन एकदा तिले बोलून दाखवली होती त विश्वासानं ती म्हणे, "बाबा, तुमचं स्वप्न मी एक दिवस सत्यात उतरून दाखवीन. तेव्हा आपल्या गावातले लोक पाहत राहीन." विचार करत गोविंदराव बाजार करू लागले.
संध्याकाळी घरी आले तेव्हा सई मुकाट्यानं अभ्यास करत दिसली. त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तरीही रात्री सगळे मुक्यामुक्याच जेवली. मात्र आता दिवसेंदिवस सई आणि रोहन अधिक बेफिकीर झालेले. आता नेहमी सोशल मीडियावर रोहनचे फोटो, रील्स, स्टेटस झळकत होते. जरी त्यांनी घरच्यांपासून लपवण्याचा प्रयत्न केला तरी जगात प्रत्येक गोष्ट कायम लपून राहत नाही, याची त्यांना विसर पडली होती. एक दिवस रोहनच्या मित्राने काढलेला एक फोटो अनेकांच्या मोबाईलवर फिरू लागला. त्या फोटोमध्ये सई आणि रोहन हातात हात घालून हसत हसत गिरडचा डोंगर चडत होते. तो फोटो कोणीतरी गावातील एका मुलाच्या मोबाईलवर पाठवला. आणि तिथून तो फोटो सईच्या चुलत भावाकडे गेला. त्याने फोटो व्हाट्सअपवर पाहिला आणि क्षणभर थबकला.
"ही तर सई हाये?" त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं. तो फोटो डिलीट करावा? की काकांना दाखवावा? काही क्षण तो गप्प बसला. मात्र सूर्याला कितीही लपवण्याचा प्रयत्न काळया ढगांनी केला, तरी तो एक दिवस त्याच्या किरणातून बाहेर येतोच. आणि झालं तसंच होतं. त्या एका फोटोने, अनेक वर्षे ठेवलेल्या विश्वासाला आता तडा जाणार होता. तो दिवस आता जवळ येऊन ठेपला होता.
चुलत भाऊ अमोलच्या हातात मोबाईल होता. स्क्रीनवर दिसणारा फोटो पाहून त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालेलं. सांगावं की गप्प बसावं? बराच वेळ असाच गेला. त्याला तिची काळजी वाटू लागली. तिचा चेहरा त्याला दिसू लागला. सई त्याची लहानपणापासूनची लाडकी बहीण होती. पण गोविंदरावांचा त्याच्यावरही तितकाच विश्वास होता. जितका आपल्या मुलीवर. अखेर बराच विचार करून त्याने गोविंदरावांना भेटण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी गोविंदराव शेतातून घरी परतले. थकलेले असल्यामुळे चेहऱ्यावर नेहमीसारखं असमाधान होतं.
"काका, थोडं बोलायचं होतं," अमोल शांतपणे म्हणाला.
"बोल ना." अमोलने एकही शब्द न खर्चता मोबाईल पुढे केला. काकांनी फोटो पाहिला. क्षणभर त्यांना काहीच सुचले नाही. पुन्हा एकदा त्यांनी फोटो मोठा करून पाहिला. तो चेहरा त्यांच्या परिचयाचा होता. ती त्यांची मुलगी सई होती. त्यांनी कोपीत नजरेनं अमोलकडे पाहिलं. येवढ्या रागानं पाहिल्या नंतर अमोलला तिथं राहावसं वाटलं नाही. पाहता पाहता काकांच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटला. एवढा जोराचा हबका काकांच्या ताट कण्याला बसलेला. कधी नव्हे तेवढे काटे त्यांच्या काळजात कचाकचा रुतलेले. रक्त बंबाळ झालेला कलेजा डोळ्यावाटे अश्रू गाळत होता. वाघासारखा दिसणारा काका आज मात्र गायीसारखा व्याकुळ झालेला तो पाहत होता.
"हे...हे खरं हाये का?" अमोल निघायच्या पूर्वी काका कसे बसे बोलले. तो म्हणाला, "काका, मला काही माहित नाही. पण फोटो खरा वाटतो. म्हणून आधी तुम्हालाच दाखवला."
गोविंदराव काहीच बोलले नाहीत. खिन्नपणे नुसते बसून राहिले. अमोल निघून गेला. सांजच्यापारी घरात येवढे अंधारून येईल, असं काकांना वाटत नव्हतं. मलूल पाचोळा अंगणात उडत होता. घरादारावर हळूहळू काळोखाचा बुक्का भुरभुर सांडू लागला. तशी काकांच्या अस्वस्थपणात वाढ होत गेली. रात्री सई नेहमीप्रमाणे हाल्टिंगने घरी आली.
"आई, जेवायला वाढ." आंघोळ करून फ्रेश होऊन ती आईला म्हणाली. सुमनबाईंनी तिच्याकडे नुसतं कसल्यातरी निर्धारानं पाहिल्यासारखं केलं. आज तिच्या डोळ्यांत लेकीसाठी प्रेम नव्हतं. बापाच्या प्रेमात कायची कमी राहिली, असे आणि नानातऱ्हेचे प्रश्न घिरक्या घालू लागलेले. गोविंदरावांनी स्वतःला सावरले. लेकीचा मंदसा हसरा चेहरा पाहून त्यांनी तिला शांत आवाजात विचारलं, "आज कॉलेजमध्ये काय शिकवलं ?"
"नेहमीसारखं लेक्चर होतं." ती म्हणाली.
"खरंच?"
"हो."
गोविंदरावांनी मोबाईल तिच्यासमोर ठेवला. अन् म्हणाले, "मंग हा फोटो कोणाचा हाये?"
सईचा चेहरा पांढराफटक पडला. तिच्या ओठांवरचे शब्द हरवले. घशाला कोरड पडली. तोंडाची वाचा गेल्यागत झाली. घरात काही क्षण सर्वत्र भयाण शांतता पसरली. तिच्या छातीचे ठोके वाढू लागले. अंग थरथरू लागलं. चेहरा चोळामोळा होऊन खाली पडलेला. जीव कावराबावरा होऊन थरथरू लागलेला. डोळ्यातलं आभाळ भरून वाहू लागलं. तिला ज्या ठिकाणी उभं आहोत ते ठिकाण आपल्याला गिळंकृत करते की काय? असं वाटू लागलं.
"बोल सई," आईचा थरथरता आवाज तिच्या कानावर पडला, "कोण हाये तो?"
"तो... तो माझा मित्र आहे."
"मित्र? मग कॉलेजच्या वेळेत पार्कमध्ये, गिरडला काय काम असते?"
आईच्या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हते. गोविंदरावांनी रागाने आवाज चढवला नाही. कारण त्यांना ठाऊक होतं की, आपण रागावलो तर ती काही बाही करेल. या भीतीने ते गप्प होते. पण त्यांचा थंडपणा त्यांना अधिक वेदनादायक जात होता.
"आम्ही तुले शिकाइले पाठवलं होतं....का लोकायचे हात धरून फिरायले ?"
सईच्या डोळ्यांत अश्रू आले. पण त्यामागूनच जरा वेळानं बळ आलं.
"बाबा, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे." हे वाक्य ऐकताच सुमनबाई खुर्चीवर बसल्या. त्यांना विश्वास बसत नव्हता की आपल्या लेकीला हे झालं काय ? खुर्चीला पाठ टेकून बसल्याबसल्या तिची उद्विग्न नजर लेकीवर खिळून बसली. त्या रात्री कुणाचीच वासना अन्नावर गेली नाही. सारेच आपापल्या ठिकाणी थंडे होऊन बसलेले. सई रडत होती. जो पर्यंत डोळ्यात रात्रीने गर्दी केली नाही तो पर्यंत ती डोळे सुजेस्तोर पडून रडत राहिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अंतिम निर्णय झाला. सईचा मोबाईल काही दिवसांसाठी काढून घेतला गेला. कॉलेजला ये-जा करण्यासाठी तिच्या काकांना म्हणजे अमोलच्या बाबांना सांगितलं गेलं. विनाकारण बाहेर जाण्यावर बंदी आली. सईला वाटलं, आपल्यावर पाहता पाहता नजरकैद लादली. आता ह्या कैदेतून कसे सुटायचे ?
गोविंदरावांच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. आपन पोरीवर बंदी लावली खरी. पण पुन्हा ती त्या वाटेला नाही जाईल म्हणून काय शाश्वती ?
काही दिवस सर्व काही शांत होतं. पण शांततेच्या आड अजूनही बरच काही जिवंत होतं. रोहनचे फोन येणं बंद झालं नव्हतं. मित्रमैत्रिणींच्या मोबाईलवरून संदेश पोहोचत होते.
"मी तुझी वाट पाहतोय."
"तू घाबरू नको."
"आपण लवकरच भेटू." सईचं मन पुन्हा कासावीस होऊ लागलं.
एकेदिवशी ती कॉलेजमध्ये पेपरला गेल्यावर मैत्रिणीच्या फोनवरून रोहनशी बोलली. "घरच्यांनी माझ्यावर खूप बंधनं घातली आहेत."
रोहन म्हणाला, "बंधने लावासाठीच असतात. फक्त एक संधी मला मिळाली की आपण पुन्हा भेटू."
सई काही बोलली नाही. तिला जाणवत होतं की घरात आपण आईबाबांचा विश्वास तोडला आहे. तरीही आपलं मन अजूनही दोन्ही दिशांत भरकटत जात आहे.
गोविंदराव रात्री अंगणात बसले होते. सुमनबाईंनी हळूच विचारलं, "आपण लयच कठोर त वागत नाई न?"
गोविंदरावांनी दीर्घ श्वास घेतला. म्हणाले, "तिनं खोटं बोललं म्हणून मले लय दुःख झालं. तिनं माह्या विश्वासघात केला."
आकाशात चंद्र ढगाआड गेलेला. अन् घरातला आनंदाचा प्रकाश कुठेतरी हरवलेला. आणि तिकडे रोहनच्या मनात एक वेगळीच योजना आकार घेत होती. त्या योजनेमुळे सईच्या आयुष्याला असं वळण मिळणार होतं. ज्याची कल्पनाही तिने किंवा तिच्या आई-वडिलांनी केली नव्हती. हो असच होणार होतं. सईवर घरच्यांनी काही बंधने लादली होती. पण तिच्या मनातला संघर्ष अजून संपला नव्हता. एका बाजूला आई-वडिलांचा तुटलेला विश्वास, तर दुसऱ्या बाजूला रोहनचं प्रेम होतं. दोन्ही गोष्टी तिला वेगवेगळ्या दिशेने खेचत होत्या. आणि दोन्ही गोष्टी तिला सारख्या प्रमाणातच पाहिजे होत्या. कॉलेजमध्ये गेल्यावर ती वरवर अभ्यासात लक्ष द्यायची. पण संधी मिळाली की मैत्रिणीच्या मोबाईलवरून रोहनशी बोलायची.
"आपण असं किती दिवस लपून-छपून भेटणार?" सईने त्याला विचारलं. रोहन काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, "तुझ्या घरच्यांना आपलं प्रेम कधीच मान्य होणार नाही. म्हणून आता एकच मार्ग आहे. आपण घर सोडून जाऊ."
हे ऐकताच सई दचकली. म्हणाली, "नाही रोहन! मी आई-बाबांना असं सोडून जाऊ शकत नाही."
"मग आयुष्यभर त्यांच्या भीतीत राहा." त्याच्या आवाजात आता प्रेमापेक्षा तिला हट्ट जास्त जाणवत होता. ती नाही नाही म्हणायची. अन् तो पळून जायला हट्ट करायचा. त्या दिवशी बराच वेळ त्यांच्या गोष्टी चालल्या.
त्यानंतर रोहनचा स्वभाव बदलू लागला. तो वारंवार सईवर दबाव टाकू लागला. "तू माझ्यावर खरंच प्रेम करत असशील तर माझ्यासोबत चल."
"तू घाबरट आहे."
"तुझ्या घरच्यांचीच तुला जास्त काळजी आहे." असा तो तिला म्हणायचा.
सईच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. ज्याच्या गोड बोलण्यावर ती भाळली होती. तोच आज तिच्या भावनांचा वापर करत होता. त्याने असे आणि अशाप्रकारे बरेच फंडे तिच्यावर आजमावले. परंतु सई त्याच्या एकाही फंड्याच्या जाळ्यात फसली नाही. सारासार विचार करून तिने निर्णय घेतला.
पण एके दिवशी सईची मैत्रीण पूजा घाईघाईने तिच्याकडे आली. म्हणाली, "सई, मला तुला काही सांगायचं आहे."
"काय झालं?"
"काल मी रोहनला एका दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं." सईचा तिच्या बोलण्यावर विश्वास वाटत नव्हता.
"असं नाही होऊ शकत." ती विश्वासानं म्हणाली.
अखेर पूजाने मोबाईलमध्ये फोटो दाखवला. सईच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. रोहन दुसऱ्या मुलीसोबत अगदी तसाच फिरत होता. जसा तो तिच्यासोबत फिरत असे. त्याच्या दुसऱ्या दिवशी सईने रोहनला भेटण्याचा निर्णय घेतला. आणि ती भेटली. "हे काय आहे?" तिने फोटो दाखवत विचारलं. रोहन हसला.
"इतकंच? अगं ती माझी मैत्रीण आहेत."
"माझ्याशी खोटं बोलू नको, रोहन."
"तुला विश्वास नसेल तर नको ठेवू."

त्याचा थंड आवाज ऐकून सई हादरली. तिला पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातील कोरडेपणा जाणवलं. आता बाकीचे बोलण्यात काही एक अर्थ नाही. असे ठरवून ती गावाकडे निघाली. घरी परतल्यावर ती सरळ तिच्या खोलीत गेली. आईने दार ठोठावलं. म्हणाली, "सई, जेवाले ये."
"आई, मले भूक नाई. तुम्ही जेवून घ्या."
त्या रात्री ती खूप रडली. आई-वडिलांशी खोटं बोलल्याचं दुःख, रोहनच्या वागण्याचा धक्का आणि स्वतःच्या चुकीची जाणीव हे सगळं एकाच वेळी तिच्यावर कोसळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वतःहून बाबांसमोर आली. कसल्यातरी निर्धारानं बोलू लागली, "बाबा !"
गोविंदरावांनी तिच्याकडे पाहिलं.
"माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुमचा विश्वास मी तोडला. मला माफ करा."
गोविंदराव काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, "सई, प्रत्येक माणूस चूक करतो. पण चूक मान्य करण्यासाठी खूप मोठं मन लागतं. आणि त्या पोरासोबत हात धरून सगळीकडे तुझा फोटो गेला. पण बदनामी तुझ्या बापाची झाली. त्याला काही फरक पडला नाही. तू तिकडे जंतरमंतरवर उपोषणाला गेली असती. तर माझी मान अभिमानानं उंचावली असती. पण तू...."
सई रडत त्यांच्या पायाशी बसली. सुमनबाईंनी तिला जवळ घेतलं. गोविंदराव शांतपणे म्हणाले,
"सई, तुह्यावर डोये झाकून विश्वास ठेवला होता गं. पण विश्वासाले तडा गेला का बापाचं मन आतून कुठं कुठं तुटते, हे तुले आज नाई समजणार. वेळ आल्यावर नक्की समजन."
"............" ती निमूटपणे ऐकत होती.
".......तो आपल्याला कमवावा लागतो. आणि आपल्या चारित्र्यावर एकदा डाग लागला की तो आयुष्यभर पुसून काढला जात नाही. आम्ही तुले उंच उडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. पण तू स्वातंत्र्याचा दूर उपयोग केला.
"तू कशी वागावं कशी जगावं या बाबतीत आम्ही आजवर तुले बोललो का ? तुह्ये स्वप्न, तुह्या आवडी या बाबतीत सुद्धा आम्ही काही अडचणी आणल्या का ?"
"नाई बाबा!"
"आजवरच्या तुह्या हालचाली, तुह्य शिक्षण, करिअर याविषयी तुह्या निर्णय घेण्यावर आम्ही काही मर्यादा लावल्या होत्या का ?"
"............." ती मानेचं कणीस खाली करून मानेनं नकार दर्शवत होती.
"कोरोना महामारीनं सगळ्यांवर बंधनं लादले. मर्यादा चढवल्या. तरी आपण त्याही तोडून महामारीले उत्तर दिलेच. मंग आमच्या हातून अशी कोणती चूक झाली होती. जे तुले असं काही भाग करायला भाग पाडलं ?"
"बाबा, माझं चुकलं. सॉरी !" ती गयावया करत उत्तरली.
"मोबाईल घेऊन दिला तेव्हापासून तुह्य घरात बोलणं कमी झालं. कॉलेजातून आली का धरला मोबाईल हाती. सकाळी मोबाईल. संध्याकाळी मोबाईल. रात्री घंटोणशीर मोबाईल घेऊन झोपी जाणं. हे आम्हाले तुह्य दिसत नव्हतं का ? तरी पण मी आजवर बोललो का ? नाई बोललो म्हणूनच तू त्याचा फायदा उचलला."
"नाई बाबा. तसं काई नाई." म्हणत सईने मान खाली घातली. आजवर केल्या कृत्याचा अपराधीपणा डोळ्यातून गळू लागला.
गोविंदरावांनी सुमनबाईच्या कानात हळूच सांगितलं, "तुह्या भावाले सांग. एखादी चांगलं पोरगं पाहून ठेवाले. घरात वाढतीउडती पोरगी ठेवणं आता अवघड झालं. इथं मोठ्या मोठया घरादारायले कुलूप लावून कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवून चोरी होत हाये. तव्हा आजच्या काळात मायबापायची काय केवा. त्या पेक्षा हात पिवळे केलेले बरे!"
सई तनामाला सुई टोचल्यागत रडत होती. अन् मनात निर्धार करत होती. या समोर मी फक्त आणि फक्त अभ्यास करणार.
पण तिच्या मनात कुठेतरी एक दार अलगद बंद झालं होतं.

- आशिष वरघणे, रा. सिरुड, पो. वेळा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा
पिन-442301 ; मो. 9359679093

रवी दांडेकर, मुक्तविहारी, गणेश मुटे, गंगाधर मुटे
  • Log in or register to post comments
  • 6 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,274 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,171 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,231 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,013 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,487 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,379 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,213 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,835 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,103 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 8,999 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,128 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,244 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,239 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,638 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,971 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,264 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,365 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,622 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,433 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Rajshree
  • आशिष आ. वरघणे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 122 *
Who's new नवीन सदस्य
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    7 hours 26 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    8 hours 9 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    20 hours 59 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 12 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 12 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
आजचे शेतमालाचे बाजारभाव 14
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 12
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 11
गणपतीची आरती ॥३५॥ 9
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 8
विचारपूस 6
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 6
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 5
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 5
पिवळे हात 4
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 4
कापला रेशमाच्या सुताने गळा 4
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 4
धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता 4
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 4
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 4
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 2
मायेची लेकरं 2
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 2
शपथ घेऊन सांग स्वातंत्र्या 2
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,004
माझे फेसबूक स्टेटस-1 180,962
शुभारंभ 134,912
रानमेवा - भूमिका 109,386
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,395
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,584
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,542
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,824
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,580
उद्देश आणि भूमिका 77,445
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,565
विचारपूस 71,730
गणपतीची आरती ॥३५॥ 67,748
सत्कार समारंभ : वर्धा 66,732
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,309
किती चाटणार भारतपुत्रा? 61,690
जात्यावरची गाणी 56,012
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,420
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,045
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,351
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini