Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

शुभारंभ

Main page content

Profile picture for user संपादक
By संपादक | 8:29 AM IST, सोम May 23, 2011
जाहीर निमंत्रण 

एक नवे संकेतस्थळ

बळीराजा डॉट कॉम
www.baliraja.com

आपण येथे वाचू शकता, 
मराठीत लिहू शकता, 
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता, 
नवीन चर्चा सुरू करू शकता
या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा.....!
*  *  *

नमस्कार मंडळी,
           आज मिती वैशाख कृ.६ रोज सोमवार दिनांक २३ मे २०११. आकाशात ढग गर्दी करायला लागलेले. रोहिनी नक्षत्राचे आगमन अवघ्या काही तासाच्या अंतरावर येऊन ठेपलेले. अशा या मंगलदायी शुभपर्वावर "बळीराजा डॉट कॉम" या संकेतस्थळाचा शुभारंभ करताना अत्यंत आनंद होत आहे.
           शेती विषय केंद्रस्थानी ठेऊन एखाद्या शेतकर्‍याने एखादे मराठी संकेतस्थळ निर्माण करून ते चालविणे तसे फ़ारच जिकिरीचे काम आहे. मुद्रीत माध्यमातील लेखन वाचण्याशी सुद्धा जेथे हाडाच्या शेतकर्‍याचे हाडवैर आहे तेथे संगणकिय तंत्रमाध्यमात शेतकर्‍यांना सामील करून पुढील वाटचाल करणे किती महाकठीण काम आहे, याची आम्हांस जाणिव आहे. मात्र परिश्रम आणि चिकाटीने हे कार्य सुरू ठेवल्यास, त्यासाठी तंत्रज्ञान विषयक शिबीर आयोजित करून शेतकरीपुत्रांना प्रशिक्षण दिल्यास, प्रचार आणि प्रसार केल्यास जास्तीत जास्त शेतकरी मंडळींना या उपक्रमात सामिल करून घेता येईल, असा विश्वास आहे.
          अनादीकाळापासून ज्या समाजाच्या पिढोन्-पिढ्या स्वत: अबोल राहून इतरांचे ऐकण्यातच गेल्या, त्या समाजाला बोलते करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून पुढील वाटचाल करायचा "बळीराजा डॉट कॉम" या संकेतस्थळाचा मानस आहे. या कामात आपणासर्वांनी आशिर्वाद आणि सक्रिय सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती आहे.
          या संकेतस्थळाच्या निर्मीतीत श्री राज जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल "बळीराजा डॉट कॉम" च्या वतिने मी व्यक्तिश: आभार मानतो. यापुढेही तांत्रीक सहाय्य त्यांचेकडून वेळोवेळी उपलब्ध होत राहिन अशी आशा बाळगतो.
          या संकेतस्थळाच्या व्यवस्थापन मंडळाची जबाबदारी श्री. प्रमोद देव(मुंबई) आणि श्री. नवनाथ पवार (औरंगाबाद) यांनी स्विकारली असून त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यात "बळीराजा डॉट कॉम" उत्तरोत्तर प्रगती आणि निहित उद्दिष्टप्राप्तीकडे वाटचाल करेल, याची खात्री आहे.
या मित्रांनो,

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो,
उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो,
हक्कासाठी लढणार्‍यांनो,
लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो,
स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो,
नव्या युगाच्या निर्मात्यांनो,
या जरासे खरडू काही,
काळ्याआईविषयी बोलू काही.

* * * * * *
संपादकीय
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 134914 views
अभिनंदन!

प्रमोद देव

सोमवार, May 23, 2011 - 16:46
Permalink
New

अभिनंदन मुटेसाहेब! तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलात की ते कार्य तडीस नेईपर्यंत स्वस्थ बसू शकत नाही..हे,ह्या संकेतस्थळाच्या निर्मितीने तुम्ही प्रत्यक्षपणे दाखवून दिलंय. हे संकेतस्थळ ज्या मूळ उद्देशाने तुम्ही सुरु केले आहे तो पूर्ण होण्यासाठी, आपले सुशिक्षित शेतकरी बांधव इथे येऊन आपापल्या अनुभवांची देवाण-घेवाण लवकरात लवकर सुरु करोत हीच सदिच्छा!
संकेतस्थळ सुरळित सुरु राहावे ह्यासाठी माझ्याकडून शक्य असेल ती सर्व मदत मी आपणाला देईन अशी हमी देतो.
धन्यवाद!

  • Log in or register to post comments
धन्यवाद देवसाहेब. खरे तर

गंगाधर मुटे

शनीवार, May 28, 2011 - 20:36
Permalink
New

धन्यवाद देवसाहेब.
खरे तर संकेतस्थळनिर्माण वगैरे विषय माझ्यासाठी फारच नविन आहे, पण तुमच्यासारखी काही मंडळींची भरीव मदत होणारच, याच खात्रीने मी सुरूवात केली आहे. :)

  • Log in or register to post comments
सुरुवात खुप छाण केलिय मुटे

mohan

गुरुवार, September 29, 2011 - 09:48
Permalink
New

सुरुवात खुप छाण केलिय मुटे साहेब.
माझ्या सारख्या नवख्या आणी मनात आलेल्या शब्दांना येथे वाट तरि मोकळी करता येईल.

  • Log in or register to post comments
नक्कीच मनातील भावना व्यक्त

गंगाधर मुटे

गुरुवार, September 29, 2011 - 15:40
Permalink
New

नक्कीच मनातील भावना व्यक्त करा. स्वागत आहे. :)

  • Log in or register to post comments

In reply to सुरुवात खुप छाण केलिय मुटे by mohan

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 38 *
Who's new नवीन सदस्य
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    11 hours 51 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    12 hours 34 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 day 1 hour ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 16 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 16 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 9
विचारपूस 9
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 8
पिवळे हात 8
रानामधले शेर...! 8
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 7
७ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 7
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 6
हॉट चिप्स 6
माय मराठी स्तवन git 6
दुःख मातीतले.... 6
हंबरून वासराले चाटते जवा गाय 5
काही सुटे अन काही मुटे शेर 5
शेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०११ 5
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 5
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 5
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 5
पोळ्याच्या झडत्या 4
मातृत्वाचा शृंगाररस 4
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 4
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,511
नियमावली 44,828
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,172
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,828
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,773
शरद जोशी 40,759
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,119
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,066
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,575
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,057
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,054
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,804
गरीबी कशामुळे? 36,074
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,623
आईचं छप्पर ।।१०।। 34,541
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,403
रे नववर्षा 33,763
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,327
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,303
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,292
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini