ठेवलेले नाव जेथे जावे
लागे ठेवून मागे
दगड कागद रंगवून उगाच
वळून पाहु का मागे
दोन क्षणाच्या दुःखा मागे
एक् क्षणाचे सुख
या दोन क्षणाची भागीदारी
सोबत असते नेक
नावासाठी जन्म आपला
म्हणून कोरी नाव
जीव जाता विश्व मातीला
नाती ना उरे भाव
आल्यावर गाव आपले
नाव आपले
गेल्यावर साव आपले
चोर आपले
असताना जे जाळत ते
आता पळती दूर
असताना पाळत त्यांच्या
डोळयास नुस्ता पूर
मी पाहतो जळणाराही
अन जाळणारा
मी त्यातही मी यातही
सदा खेळणारा
मला मी भेटतो नावगाव
सोडताना
मला मी ओळखतो पुन्हा
जळताना
बरगड्याच्या बराकीची
किती ती मिजाशी
मुक्त विश्वातली मजा खरी
वाटे ती मीराशी
यशवंत पुलाटे
दुर्गापूर ता.राहता
जि अहमदनगर
पिन कोड ४१३७३६
मो .न. 9657867499

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
समीक्षक
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.