पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कुटिलतेचा जन्म…….!!
मत्सराची ज्योत जेथे शीलगाया लागली नेमकी तेथे कुटिलता जन्म घ्याया लागली
जळफ़ळ्या वृत्तीवर दवा,औषध तरी कोठले? आमरस्त्यावरच कांटे पसरवाया लागली
कालपावेतो भुतावळ मी म्हणत होतो तिला चेटकी होऊन आता ती फ़िराया लागली
वरणभात जुनाट झाला वेगळे खावे म्हणे कुंठलेली नीतिमत्ता शेण खाया लागली
थांबवा फ़ाजील चेष्टा बांडगूळांनो अता वेदना सोसून काने, छी:! पिकाया लागली
ह्या खडूसांची खुशामत “अभय” केली ना कधी सावजासम घेरती मज डाफ़राया लागली
गंगाधर मुटे ---------------------------------------- वृत्त – देवप्रिया ( गालगागा ) ३ + गालगा
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.