पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
माझी गझल निराळी
कुंडलीने घात केला
कसा कुंडलीने असा घात केला दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला
असे वाटले की शिखर गाठतो मी अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला
विचारात होतो अता झेप घ्यावी तसा पाय मागे कुणी खेचलेला
खुली एकही का, इथे वाट नाही हरेक पथ येथे कुणी हडपलेला?
पटू संसदेचा, तरी दांडगाई म्हणू का नये रे तुला रानहेला?
दिशा दर्शवेना, मती वाढवेना कसा मी स्वीकारू तुझ्या ज्येष्ठतेला?
’अभय’ चेव यावा अता झोपल्यांना असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला
गंगाधर मुटे ................................................... (वृत्त-भुजंगप्रयात)
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.