Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

ती...

Main page content

विनिता
By विनिता | 11:15 AM IST, बुध November 05, 2014
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
छंदमुक्त कविता

ती....

काळ्या मातीत खुरपतांना,
लुगड्याचा पदर डोक्यावर सावरत,
मधेच आभाळाकडे जायची तिची नजर
कपाळावर गडद चिंतेच्या रेषा,
त्याहून गडद डोळ्यांतली निराशा...

मग कधीतरी क्षितिजावर दिसायची
काळी किनार पावसाळी ढगांची
वाजत-गाजत यायची स्वारी
वर्दी देत मृगाची...

पहील्या सरीसवे तिची
चिंता पण जायची ओघळून
हिरवे रान, हिरवे स्वप्न
डोळ्यांत रहायचे आकळून

जित्रांपाचे खाणे, जित्रापाची धार
जित्रांपांना पाणी कोन दावनार?
सकाळी बाहेर नेऊन परत
गोठ्यात कोन आणणार?

तिन्ही ऋतू तिन्ही काळ
तिचे चक्र घरघरायचे
ती म्हणजे शेत, ती म्हणजे घर
ती म्हणजे ...सर्वकाही!

....आता फोटोतली 'ती' पहाते टूकुटूकु
शेतात तण माईना, पिकाला पाणी कोन देईना
भाऊबंदकी शिरली घरात मागल्या दाराने
उतरल्या भिंंती चौ-अंगाने
जित्राप केविलवाणी २४ तास गोठ्यात
सगळेच आहेत आता आपापल्या ताठ्यात

फोटोतल्या फोटोत ती उसासते
भकास नजरेने पहात रहाते,
दिसत नाही आता नजरेला
क्षितिजावरचा पावसाळी मेघ
दिसते भेगाळलेली काळी भुई
अन्...सात-बारावरची रुंदावणारी रेघ!!!

--विनिता माने- पिसाळ
पुणे

पद्यलेखन स्पर्धा-२०१४
हम्म

गंगाधर मुटे

बुधवार, November 5, 2014 - 13:22
Permalink
New

सात-बारावरची रुंदावणारी रेघ!!!

शेतकरी जीवनातीचा पैलू उलगडणारी कविता. सुरेख उतरलीय
* * *

जित्राप हा शब्द बर्‍याच दिवसांनी ऐकायला मिळाला. आमच्याकडे जुन्या पिढीकडून हा शब्द ऐकला होता.

धन्यवाद विनिताजी. :)

  • Log in or register to post comments
धन्यवाद सर

विनिता

बुधवार, November 5, 2014 - 13:58
Permalink
New

धन्यवाद सर

माझ्या मावशीवरुन हि कविता लिहीली गेली.

  • Log in or register to post comments
वा

हेमंत साळुंके

बुधवार, November 5, 2014 - 15:20
Permalink
New

तरळत गेले चित्र डोळ्यासमोरून.....

  • Log in or register to post comments
अभिनंदन.

विजय शेंडगे

मंगळवार, February 17, 2015 - 22:12
Permalink
New

अप्रतीम रचना. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन.

http://maymrathi.blogspot.com/

  • Log in or register to post comments
वाहवा

Ravindra Kamthe

गुरुवार, March 5, 2015 - 17:15
Permalink
New

विनिताजी,

अतिशय सुरेख आणि भावनिक अशी तुमची ही कविता झाली आहे.
तुम्ही खूप छान लिहिता...
धन्यवाद.
रविंद्र कामठे, पुणे.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 10821 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 42 *
Who's new नवीन सदस्य
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    11 hours 50 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    12 hours 32 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 day 1 hour ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 16 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 16 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 3
बळीराजाचा पोवाडा 3
अशीही उत्तरे-भाग-३ 3
कान पकडू नये 3
३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : कवी संमेलन-१ 3
अशीही उत्तरे-भाग - २ 3
तुमचं काय गेलं:- मंगेश पाडगावकर व्यंगातून जीवन भाष्य 3
शेतकरी राजा 3
पुन्हा जन्म घे बळीराजा 3
गज़ल : घाट्याच्या सौद्यात शेती 3
शेतकरी बाप 3
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 3
कोरोना काळ आणि भाजीपाला पीकाला मिळालेला भाव 3
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 3
त्रैमासिक अंगारमळा : अंक - २ 3
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 3
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 3
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 3
जगणं प्रत्येकाला सुगंधी वाटलं तर 3
हाडाचे शेतकरी 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,993
कान पकडू नये 25,877
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,747
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,563
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,344
माय मराठी स्तवन git 25,344
एवढा मोठा नांगूर... 25,074
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,073
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,490
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,418
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,028
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,977
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,946
शेतकरी पात्रता निकष 23,938
शेतकरी प्रकाशन 23,934
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,894
हे गणराज्य की धनराज्य? 23,831
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,742
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini