Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

चिंधीची गोष्ट

Main page content

By Ajit1980 | 11:25 PM IST, बुध November 25, 2026
महिला कवी/लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण

चिंधीची गोष्ट

संकल्पना व कथन :-ममता सिंधुताई सपकाळ
लेखन व मांडणी :-पूजा भडांगे
पहिली आवृत्ती:- 4 जानेवारी 2026
प्रकाशक व मुद्रक:- माई पब्लिकेशन संस्थापक : ममता सिंधुताई सपकाळ प्रकाशक :-पूजा भडांगे
लेखन व मांडणी :-पूजा भडांगे
मुद्रित शोधन:- कोमल वाघमारे मुखपृष्ठ :-विशाल वाडये
मुखपृष्ठ व सुलेखन:- ३००रुपये

या महान विभूतींचा जीवनप्रवास पूजा भडांगे यांनी आपल्या सिद्धहस्थ लेखणीतून अलगद टिपला आहे.
आकर्षक मुखपृष्ठ व सुस्पष्ट अक्षरजुळवणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिंधुताई सपकाळ यांचे वृद्धावस्थेतील चित्र असून व त्यातच चिंधीचे बालपणातील असे दोन्ही चित्र दिसतात .

या पुस्तकाच्या सर्वात पहिल्या पानावर अर्पण पत्रिका अर्पण केलेली आहे.
"त्या सर्व बालगोपाळांसाठी ज्यांच्यामुळे चिंधीचं महावस्त्र झालं आणि ती अनाथाची माय झाली ".
अशा सुंदर व उदबोधक ओळींनी या पुस्तकाची सुरुवात झालेली आहे .

हे वाक्य किती गहन व बोलके आहे. कितीतरी व्यापक संदेश यातून जातो .घरात नको असलेली चिंधी आज जगभर तिच्या कर्तुत्वाने मोठी झाली,अनाथाची माय ती झाली . हा माईचा जीवन प्रवास पूजा भडांगे यांनी एकुण ६४ पानात व चित्रात मांडला आहे.
चिंधीच पूर्ण नाव चिंधी अभिमानजी साठे आणि तिचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावात झाला.

परमेश्वराचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म आणि गुढ आहे .तो बाहय डोळ्यांना सहज दिसत नाही .जो स्वतःच्या अंतरंगात शांत होतो आणि त्यालाच त्या सत्याची जाणीव होते .देवाच्या अनुभूतीने मनातील भय कमी होते .भेदभाव नष्ट होऊन एकोप्याची भावना निर्माण होते. बाहय रूपापेक्षा अंतकरणातील श्रद्धा महत्वाची ठरते म्हणून अंतर्मुख होऊन आत्मस्वरूप शोधावे आणि हेच आयुष्य भर माईने केले.तिचा जीवन प्रवास पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागात विस्तारीत लेखिकेने केला आहे.
ज्या फुलांनी संघर्षाचे ऊन सोसलेले असते,त्यांचाच सुंगध जास्त काळ टिकतो.

चिंधीची आई सतत तिचा राग करायची.मात्र चिंधीचे बाबा ज्यांना ती प्रेमाने आणाजी
म्हणायची ,त्यांच्यामुळेच ती हातात पाटी पेन्सिल घेऊ शकली.कशीबशी ४चौथी पर्यंत तिचे शिक्षण करू शकली.
त्यातही शाळेत जाण्याच्या वेळेत आई तिला गुरं चारायला सांगायची.त्यामुळे अनेक अडथळे तिला पार करावे लागले.

वर्गात मास्तर मुलांना काय शिकवणार आहेत हे जाणून घ्यायसाठी चिंधीने नामी शक्कल लढवली मोठ्या भिंतीला कान लावलाचा आणि आतला आवाज पूर्ण लक्ष देऊन ऐकायचा असे तिचे अनौपचारिक शिक्षण झाले.

चिंधीचा अभ्यास घेतांना आणाजी कधीकधी बहिणाबाईच्या ओव्या गोड आवाजात गायचे आणि हाच तिचा शब्दांचा वारसा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला

चिंधीचे लग्न वयाच्या १२व्या वर्षीच झालं .पिंपरी मधील नवरगाव येथील सपकाळांच्या घरातील तिचे सासर . अशा प्रकारे तिचं पाटी पुस्तक हातातून सुटलं आणि चिंधीच्या संसाराचा श्री गणेशा झाला. नऊवारी साडी सांभाळत नव्या घरात ती सगळं शिकत होती .तिचा नवरा त्यावर अतिशय तापट चिडखोर आणि संशयी स्वभावाचा. तो सगळा राग चिंधीवर काढायचा.तिला शिव्या द्यायचा आणि लाथा बुक्कयाने मारायचा.असं चिंधीच नशीब....!बिचारीच्या नशिबात सासरीही नुसता त्रासच लिहिलेला ...

लग्न झाल्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे वयाच्या १४व्या वर्षे चिंधी ३मुलांची आई झाली. सपकाळची परिस्थिती तशी गरीबच आणि घर कामासोबत शेण काढणे सुद्धा ती करायची .
चिंधीचे व्यक्तिमत्व घडायला पुढील प्रवास कसा महत्वपूर्ण घडला त्याचे उदाहरण.

नवरगाव फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दमडाजी आसटकर या श्रीमंत माणसाला ३५ एकर जमीन दिली होती .त्याला स्वतःच शेणखत ३५ एकर शेतात टाकून अधिक उत्पन्न काढायचा पूर्ण अधिकार होता. मात्र गावातल्या गोरगरीब ,आदिवासी, लोकांच्या शेणखताचा लिलाव मात्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून केल्या जायचा . ही किती चुकीची गोष्ट होती हे सगळं चिंधीला बरोबर कळायचं.

दमडाची हा आपल्या सारख्या गोरगरिबांना लुटते हे बघून तिच्या मनात संताप व्हायचा. ..

आपल्या शेणाचा लिलाव करणे दूरच पण ते शेणखत उचलण्याची साधी मजुरी सुद्धा कुण्या बाईला मिळत नव्हती .रोज उन्हातानात बिचाऱ्या बाया काम करायच्या तेही विना मोबदला. आजच्या काळात आपला हक्क मिळवण्यासाठी किती कायदे आहेत .मात्र त्यावेळी सावकार म्हणेल तोच कायदा अशी गत होती. आणि यात सामान्य माणूस सारखा होरपळून निघायचा.

तिने आदिवासी स्त्रिया आणि गरीब गवळी बांधव यांची एकजुट करत अन्याया विरूद्ध बंड पुकारले . आपल्या न्याय हक्क मिळवण्यासाठी चिंधीच्या नेतृत्वात लढा दिला. सरकारकडून चौकशीचे आदेश झाले त्याचा खोटेपणा उघड पडला आणि फॉरेस्ट ने त्याला दिलेला सगळ्या शेताची समान भागात विभागणी झाली. आणि गावातल्या गरीब आदिवासी लोकांना ती जमीन वाटण्यात आली.चिंधीचा लढा तिथल्या गोरगरिबांच्या आयुष्याचं सोनं ठरला आणि हया सगळ्या बाया तिच्या गळ्यात पडून तिला आशीर्वाद देत होत्या.. हर्षाने रडत होत्या.

त्यानंतर दमडाजी आसटकर याने या गोष्टीचा बदला घेत तिच्या नव-याच्या मनात संशयाची सुई निर्माण केली. आणि तुझ्या बायकोच्या पोटात जे बाळ आहे ते माझंच आहे असे खोटे नाटे त्याला सांगितले .

त्यामुळे नवऱ्याने संशयाने अशाही परिस्थितीत तिला घराच्या बाहेर काढले.
तिला झालेल्या बेदम मारहानीमुळे बेशुध्द झाली .तिला जाग आली;तेव्हा गाईच्या गोठ्यात एका मुलीचा जन्म झाला. ना कुठला दवाखाना ना डॉक्टर ,ना नवरा,ना आई

भारतीय संस्कृतीत गाय ही मायेचं ,ममतेने प्रतिक मानली जाते .तिच्या गोठ्यात, कुणाच्याही मदती शिवाय चिंधीच बाळतंपण सुखरूपपणे झालेलं होतं. या मदतीची व ममत्वाची आठवण म्हणून तिने आपल्या बाळाचं नाव "ममता" असे ठेवले.
दुःख माणसाला जगायला शिकवतात. अस्तित्वाची लढाई दुःखाचा डोंगर किती मोठा असला तरी अस्तित्वाची लढाई लढाईच लागते .

असंच " व्याघ्र प्रकल्प" या भारत सरकारच्या अति महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत सिंधूताईंनी
दिलेली लढाई महत्वपूर्ण ठरली.

त्या परिसरात वनवासी आदिवासी ,भलाई ,कोरकू गवलान ,गोंड या सर्वांच पूनर्वसन होणं नियोजित होतं.

सिंधुताईं या अन्याया विरूद्ध
त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत दिल्लीत जाऊन हक्काची लढाई लढाई लढल्या.

" जंगल के बच्चे अगर तुम्हारे बच्चे है, तो ये भी आपके बच्चे है |इन की तरफ एक बार देखो मॉं...इनके बारे में जरा सोचो |" अशा वाक्यांत माई माननीय पंतप्रधानांना बोलल्या आणि त्यानंतर अधिकाराचा योग्य वापर इंदिराजींनी सगळीकडे धडाधड फोन फिरवले आणि आदिवासींच ८२ गावातील पुनर्वसन रद्द झालं.

तारू ,बांधा ,सेमाडोह ,हरी साल कोलकाझ, चिखलदरा या ठिकाणची सर्व गाई जनावर जी शाहपुरात कोंडून ठेवली होती. त्यांचे आदेशावरून मुक्तता केल्या गेली आणि पुन्हा एकदा चिखलद-यातील आदिवासींना सिंधुताई मुळे न्याय मिळाला.

पद्मश्री डॉक्टर सौ मी ताई सपकाळ म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या माई .

माईंचा जीवन प्रवास उलगडायचा असल्यास १९४८ते १९७३ असा एक आणि १९७३ असा दुसरा असे पूर्वार्ध व उत्तरार्ध बघावे लागतील.

आयुष्याच्या पूर्वार्धात या मायमाऊलीने किती दुःख झेलले ,किती संकटांना सामोरी गेली त्यावर मात केली . अशा अफाट व्यक्तिमत्त्वाचं हे तोकड परीक्षण आहे .लेखिकेने सुंदर शब्दात याची बांधणी केली आहे.
खानदेश ते पुणे असा प्रवास. सावित्रीबाई फुले मुलींची वसतीगृह
अमरावती ,ममता बाल सदन कुंभारवळण सासवड ,पुणे ,संन्मती बालनिकेतन मांजरी बुद्रुक पुणे ,शैक्षणिक वसतीगृह
मांजरी बु . पुणे , गोपिका गाय रक्षण केंद्र माळेगाव ठेका वर्धा ,श्री मनःशांती छात्रालय शिरूर (घोडनदी )पुणे
अशा सिंधूताईंच्या संस्था.ज्यांना अथक परिश्रमातून व मदतीतून उभ्या राहिल्या.

अनेक निराधार लेकरांच्या आयुष्याचा सोनं केलंय माईंनी.त्यांना आधार दिला अशातलाच दिपक,विनय.त्यांना आधार देत पंखाखाली घेतले . त्याच मायची संघर्षगाथा म्हणजे हे पुस्तक .

आणि त्यांना पद्मश्री २०२१ मध्ये भारताचे राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ गोविंद गोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले २०२१ वर्षाच्या मेघे युनिव्हर्सिटी कडून डॉक्टर ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. २०१३मध्ये भारताचे राष्ट्रपती माननीय श्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आयकॉनिक मदर हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. १९९७ महाराष्ट्र शासनाकडून सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
१९९३ इचलकरंजी मधून दिला जाणारा फाय फाउंडेशन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले त्यामध्ये २०२३ चा इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डस लंडन
२०१८ -२१ फरवंट ग्लोबल लव्ह ऑफ लाईव्ह
याप्रमाणे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा १०००हून अधिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले .

पुस्तकाचे शेवटी " देवा आम्हाला असायला शिकव! परंतु ...आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस ....!"यावेळी खूपच मार्मिक आहेत.अशा स्त्री व्यक्तिमत्वाचे परीक्षण.

अजित नरेंद्र सपकाळ
सरस्वती नगर अकोट जि अकोला

  • Log in or register to post comments
  • 5 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Manjusha sanja…
  • admin
  • भालचंद्र डंभे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 42 *
Who's new नवीन सदस्य
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप खूप धन्यवाद
    2 minutes 16 seconds ago
  • धन्यवाद
    9 minutes 54 seconds ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    1 hour 37 minutes ago
  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    5 hours 35 minutes ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    7 hours 46 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कवितेची जन्मकथा- विठ्ठल वाघ ह्यांची तिफन 6
उद्देश आणि भूमिका 6
त्रैमासिक अंगारमळा : अंक - २ 6
माझा शेतकरी बाप 6
आईचं छप्पर ।।१०।। 6
फास 6
छंदमुक्त कविता- धावपट्टी 5
शहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 5
(ब) छंदमुक्त कविता 5
४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन 5
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 5
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 5
झोपेच्या घाती 5
आता उठवू सारे रान 5
दुःख वावराचे 5
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 5
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 5
भुई 5
कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत 5
गझल : मरण्याशिवाय आहे? पर्याय का तरी..... 5
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,995
कान पकडू नये 25,882
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,748
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,572
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,349
माय मराठी स्तवन git 25,345
एवढा मोठा नांगूर... 25,087
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,073
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,961
कापसाचा उत्पादन खर्च 24,490
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,421
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,030
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,982
शेतकरी पात्रता निकष 23,950
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,948
शेतकरी प्रकाशन 23,934
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,900
हे गणराज्य की धनराज्य? 23,834
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,745
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini