मायेचा उद्धार
बाप मेला हिलगुन
शेत कसते माऊली
उभा दुष्काळ कोरडा
दुःख पावलो पावली
भेग भुईची पाहता
अख्खं काळीज चिरते
पिल्यांच्या घासासाठी
माय ओरड करते
प्राण लाऊनी पणाला
सारा दुष्काळ सोसते
पोट भरण्या विश्वाचे
कर्ज डोंगरी पोसते
खर्च वजा करूनही
नाही उतरला बोजा
किती कराल शोषण
यात काय दोष माझा
आता कष्टाच्या हाताले
देऊ लेखणीची धार
न्याय मिळवूनी करू
काळया मायेचा उद्धार
- रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपुर जि.वर्धा
7387439312
