Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

अंतरंग : अव्यक्त भावनांचा मुक्त आविष्कार

Main page content

By दत्ता वालेकर | 5:13 PM IST, बुध November 25, 2026
महिला कवी/लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण

पुस्तक परीक्षण

अंतरंग : अव्यक्त भावनांचा मुक्त आविष्कार

स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी व त्यांच्यासारख्या आणखी काही समाजसुधारकांनी घेतलेले कष्ट आपण विसरू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकार व हक्क याची जाणीव करून आजही द्यावी लागते. स्वातंत्र्यानंतर देशातील स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी स्त्रियांना चळवळी उभ्या कराव्या लागल्या; लढे उभारावे लागले. आजही स्त्रीमुक्ती चळवळी चालवल्या जात आहेत. साहित्यातून अनेक स्त्रियांनी आवाज उठवला. 'चूल आणि मूल' याच्या पलीकडे जाऊन, बऱ्याच अंशी आज स्त्री आणि पुरुष समानतेच्या पातळीवर आल्याचे पाहायला मिळते. आताच्या घडीला अनेक स्त्रिया लिहित्या झाल्या आहेत. त्या समाजापुढे साहित्याच्या माध्यमातून आपले विचार ठेवू लागल्या आहेत. त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना, प्रसंगांचे चित्रण त्या कथा, कादंबरी, नाटक व कवितेच्याद्वारे वाचकांपर्यंत तथा समाजापर्यंत मांडण्याचे काम आज धाडसाने करीत आहेत.

परळी वैजनाथ येथे वास्तव्यास असलेल्या कवयित्री सुनीता दिक्कतवार (कोंमावार) या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अनेक कार्यक्रमात त्यांच्या कविता ऐकायला मिळाल्या. त्यांच्या कवितांचा आणि त्यांचा परिचय झाला. नुकतीच त्यांची दोन पुस्तके लातूरच्या मुक्तरंग प्रकाशनाकडून प्रकाशित झाली. त्यामध्ये 'बाप माणसं' हे त्यांच्या सासरकडील कुळातील कर्तृत्ववान माणसांच्या व्यक्तिरेखांचे कर्तृत्व अधोरेखित करणारे कथात्म मांडणी असलेले पुस्तक आहे. तर 'अंतरंग' हा त्यांच्या अव्यक्त भावनांचा काव्यात्म मुक्त आविष्कार असलेले पुस्तक. आज मी तुम्हाला 'अंतरंग' या त्यांच्या कवितासंग्रहाचा परिचय करून देत आहे.त्यांना वाचकांना आपल्या काव्यात्म अनुभवांचे साक्षीदार करावे असे वाटले हे तुम्हा-आम्हांसाठी नक्कीच आनंदी क्षण आहेत.

अर्जुन कोंमावार व सुनीता कोंमावार यांनी रेखाटलेले 'अंतरंग' या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ शीर्षकाला समर्पक असे आहे. ज्यांनी त्यांच्या कवितेला उत्स्फूर्तपणे दाद देत त्यांना सदोदित प्रेरित ठेवले त्यांनी अशा त्यांच्या मेघ व श्रुती या दोन निरागस, गुणी आणि गोड मुलांना हा कवितासंग्रह अर्पण केला आहे. सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर व अरुणा दिवेगावकर यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. यात एकूण सर्व साठ कवितांचा समावेश आहे. विविधांगी विषयांवरच्या कविता या पुस्तकात वाचायला मिळतात. कुठलाच विषय वर्ज्य नाही. सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, शैक्षणिक, निसर्गरमणीय, काल्पनिक, अद्भुतरम्य, व्यथा-वेदना आणि आनंदाची उधळण करणाऱ्याही कविता या पुस्तकात आहेत.

रविकिरणांची बघून झळाळी
उत्साह मनी हा चेतवला
मंदिरातली काकड आरती
आवाज पहाडी दुमदुमला... (पृ.१३)

या शब्दांत कवयित्रीच्या मनात सकाळविषयी ओढ आणि उत्साह दिसून येतो. गर्द सावळ्या संध्याकाळपेक्षा विश्वात तेज भरणारी, रोमारोमात चैतन्य आणणारी प्रसन्न अशी सोनसकाळ यावी असे कवयित्रीला वाटते.
समाजात वावरताना स्त्रियांना अनेक संकटांशी सामना करत जगावे लागते. पदोपदी संघर्ष करावा लागतो. काटेरी कुंपणाच्या आत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागते. कुठल्याही परिस्थितीत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. कारुण्याने भरलेल्या नेत्रांत पाणी दाटून येते. बेगडी मुखवटे घालून तोंडदेखली सहानुभूती दाखवणारी फसवी माणसेच या दुनियेत वावरताना दिसतात. मनात नुसते प्रश्नांचे काहूर दाटलेले आहे; उत्तरे मात्र कुठेच मिळत नाहीत; हीच खरी शोकांतिका आहे. माणसाला माणसाची किंमत राहिली नाही. याविषयीची भावना व्यक्त करताना कवयित्री म्हणते,
पावलोपावली येथे
संघर्ष आहे
दिसतात फुले फक्त
पण काटेरी कुंपण आहे... (पृ.१५)

कुठल्याही प्रकारचे रूपसौंदर्य नसताना, गंधरहीत नाजूक 'अबोली' जशी फुलते, विनागंध दरवळते, आपल्या अबोलपणाने खूप काही सांगून जाते, अबोल राहूनच ती तिच्या मनातील अव्यक्त भावना व्यक्त करते त्याप्रमाणे आपणही आपल्या मनातील अव्यक्त भावना न झुकता, न सुकता व्यक्त करायच्या असे कवयित्रीला वाटते. त्यावेळी कवयित्रीच्या मनातील भावना खालील शब्दांत व्यक्त करण्यात आली आहे.
ठरवलंय का अबोलीने
नाही कधीच झुकायचं
सुकली जरी सर्व फुले
पण आपण नाही सुकायचं… (पृ.१६)

बहिणाबाई चौधरी यांच्या 'मन वढाय वढाय' या कवितेतून जशी मानवी मनाची स्थिती, अवस्था वर्णन केली आहे त्याप्रमाणे मनाच्या अवस्थेविषयी लिहिण्याचा मोह सुनीता दिक्कतवार - कोंमावार यांनाही आवरता आला नाही. मनाच्या विविध अवस्थांचा विचार करताना त्या म्हणतात,
मन हळुवार दवबिंदू
मन सागर करुणा सिंधू
किती वर्णावी मनाची ही रूपं
मन आहे अनंत स्वरूप... (पृ.१७)

यांसह वाऱ्याची झुळूक, तंबोऱ्याची तार, वढाळ वासरू, स्वच्छंदी फुलपाखरू, केवडा, निशिगंधी, सोहळा जास्वंदी, पाऊस चिंबचिंब, आरशातील प्रतिबिंब, अनुरेणूचे स्वरूप, विशाल महाकाय रूप, सद्गुणांची खाण, मंजुळ बासरीची धून, गंधित रातराणी, स्वतेजाची कहाणी, युगायुगांचे घाट, राजेशाही थाट, मातीचा दरवळ, गूढ रम्य सकाळ, विनोदी सुस्वर, कवितेची लकेर इत्यादी उपमा कवयित्रीने 'मन' या कवितेतून मानवी मनाला दिलेल्या दिसून येतात.

मराठी भाषेविषयीच्या भावना व्यक्त करताना त्या म्हणतात,
माझ्या माय मराठीचा
खूप अभिमान आहे मला
कारण जन्मापासूनच सोबत
केलीय तिने मला... (पृ.१९)

आपल्या पूर्वजांनी प्रेमाने, मोठ्या कष्टाने जपलेला मराठी भाषेचा वारसा आपल्याला मिळाला हे आपले भाग्यच आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, शांता शेळके, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, कुसुमाग्रज इत्यादी अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेला सातासमुद्रापार नेले असल्याची भावना त्या 'माय मराठी' या कवितेत व्यक्त करतात. 'पगडी आणि पायतान' या कवितेत कष्टकऱ्यांच्या अवमूल्यन कसे होत आहे आणि फुकटचा तोरा मिरवणाऱ्यांचाच कसा सन्मान केला जातो याची खंत व्यक्त केली आहे. निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे याबद्दल 'शिका निसर्गातून' या कवितेत वाचता येईल.

निसर्गातील निरीक्षणाने
जगण्याची रीत समजून घ्यावी,
नव्या सृजनांचा आनंद घेत
जीवनाची मांदियाळी व्हावी
(पृ.२१)

सामाजिक संघटन, मानवी मूल्ये, शिस्त, इमानदारी आणि त्यागाची भावना निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येईल असे कवयित्रीला वाटते. 'राहून गेले' या कवितेत कवयित्रीच्या मनात राहून गेलेली खंत व्यक्त केली आहे. त्याविषयी त्या म्हणतात, आपण आयुष्यभर विविध क्षेत्रांत कायम जिंकत येतो. मात्र आपल्या मनाला जिंकायचे राहून जाते. खूप काही सांगायचे असते. परंतु, सांगायचे राहून जाते. मनातल्या भावनांचा कल्लोळ आतल्या आत तसाच राहतो. त्यामुळे सारे काही मिळूनही आयुष्य अतृप्तच राहते.

'ऑडिट प्रेमाचे' या कवितेत कवयित्रीच्या मैत्रीच्या अनुबंधातून निर्माण झालेल्या नात्याचे 'बॅलन्स' इतर कोणाच्याही खात्यात नसेल एवढे भरभरून जमा झाले आहे. त्यांच्या स्वाभाविक मैत्रीचा त्यांना फायदाच होतो आहे. मैत्रीचे संबंध वाढतंच आहेत. हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

विनाकारण काळोख हा
बदनाम झालाय खरा
पण प्रकाशापेक्षा खरंच
अंधार वाटतो बरा... (पृ.२४)

या ओळी बरंच काही सांगून जातात. प्रकाशात सर्व काही दिसूनही न दिसल्यासारखे वागणारे लोक आपल्या भोवताली वावरताना दिसतात. आपापसात भेदभाव करून कुठला धर्म निभावतात? कुठे न्याय मिळतो? अन्याय, अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा काळोख असलेला बरा… असे कवयित्रीला वाटते. नकारात्मक विचार मनात ठेवून जगण्यापेक्षा सकारात्मक आनंदी जगायला शिकलेले कधीही चांगलेच! ही 'सकारात्मकता' कविता शिकवून जाते. कोणीही कोणाशी बोलत नसेल तर मनात व्यथांचा कचरा वाढेल आणि मग त्याचा निचरा होणार नाही असे 'कोंडमारा' कवितेतून कवयित्रीने सुचविले आहे. 'माझा उपवास' ही विनोदातून उपहासात्मक भाष्य करणारी कविता उपवासाच्या नावाखाली भरमसाठ पदार्थांची चव चाखणाऱ्या व्यक्तींवर तोंडसुख घेते. 'वेळच मिळत नाही', 'अवकाळी पाऊस', 'गुलमोहर', याही कविता कवयित्रीच्या भावनांना वाट मोकळी करून देतात. आता स्त्री अबला राहिली नाही. ती सबला झाली आहे. पुरुषांपेक्षाही सरस झाली आहे. तिच्या कर्तृत्वाचा ठसा तिने जगभर उमटवला आहे. ती आता विचारानेही समृद्ध झाली आहे. याविषयी लिहिताना कवयित्री म्हणते,

संसाराचा गाडा
समर्थपणे हाकला तिने
चूल-मूल, नोकरी,
सासुसासरेही सांभाळते
प्रेमळपणे.. (पृ.३१)

कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली तरी जीवनात हार मानायची नसते. आत्महत्येचा विचारही मनात आणायचा नसतो. जीवन हे जगायचे असते. असे कवयित्री आत्मविश्वास गमावून बसणाऱ्या, आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्यांना बळ मिळवून देण्यासाठी धीराने सांगते. खालील ओळी यासाठी नक्कीच वाचायला हव्यात.
जीवनात ह्या आहेत
अडचणीच अपार
तरीही, जीवनावर
प्रेम असते फार... (पृ.४३)

'ती एक स्त्री असते' या कवितेत स्त्रीच्या त्यागावर प्रकाश टाकला आहे.

आत एक बाहेर एक वागणाऱ्या लोकांच्या मनात काय चालले आहे ते कळत नाही. चेहऱ्यावर मुखवटे लावून ते या 'मुखवट्यांच्या राज्यात' बिनधास्त वावरतात. याविषयी लिहिताना सुनीता दिक्कतवार म्हणतात,
फार फसवी झालीय दुनिया
खरे, खोटे कळेना
प्रत्येक जण मुखवटा लेऊन
पारखच करता येईना... (पृ.५१)
याप्रमाणेच शाळेतील मैत्री, का रे दुरावा, ऋण निसर्गाचे, वुमन्स डे, भरारी, वारी पंढरीची, माझी संस्कृती, कधीतरी, जिणं कष्टाचं, कविता, रयतेचा राजा, माघार घ्यावी, लक्तरी जीवन, विरलेली माणुसकी, सुगंधी मन, फुलपाखरे, जादूची काठी, दोन ध्रुव, ऑनलाईन, पहिला पाऊस, पणती, कृष्ण, सुख, पिंपळपान, स्वप्नमयी सकाळ, आम्ही मध्यमवर्गीय, हुरहूर मनाची, खूप काही बदललं, जगणं, मी नाही होता आले, आयुष्याच्या वाटेवर, प्यादे, अल्बम, वजन, इत्यादी कविताही या संग्रहात समाविष्ट आहेत. कवयित्री सुनीता प्र. दिक्कतवार (कोंमावार) यांचा 'अंतरंग' हा पहिलावहिला कवितासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल याची आशा व्यक्त करतो. त्यांच्या पुढील साहित्य लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा!

- केशव बालासाहेब कुकडे
क्वार्टर क्र. डी-९८/४, ऊर्जानगर,
चंद्रपूर - ४४२४०४
जि. चंद्रपूर
मो.९८६०९८५९११
ईमेल : muktvihari@gmail.com

■ अंतरंग (कवितासंग्रह)
कवयित्री : सुनीता प्र. दिक्कतवार (कोंमावार)
प्रकाशक : मुक्तरंग प्रकाशन, लातूर
प्रथमावृत्ती : ०१ जानेवारी २०२१
मूल्य: १२०₹
पृष्ठे : ७२

  • Log in or register to post comments
  • 6 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Manjusha sanja…
  • admin
  • भालचंद्र डंभे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 37 *
Who's new नवीन सदस्य
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    1 hour 22 minutes ago
  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    5 hours 19 minutes ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    7 hours 30 minutes ago
  • शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी'
    7 hours 40 minutes ago
  • मस्तच
    11 hours 52 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
हंबरून वासराले चाटते जवा गाय 11
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 10
जात्यावरची गाणी 9
फुलू दे शिवारी 9
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 9
असा आहे आमचा शेतकरी 9
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 9
शरद जोशी 9
माझे फेसबूक स्टेटस - 2 8
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 8
शेती आणि माती 8
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 8
पुस्तक समीक्षण : बळीवंश 8
दुष्काळ - प्रवेशिका 7
४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई - ३१ जानेवारी २०१८ 7
मृगजळ 7
दुष्काळ... 7
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : वर्ष ९ वे 7
शेतकर्‍यांची प्रति विधानसभा 7
एवढा मोठा नांगूर... 7
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,513
नियमावली 44,834
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,181
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,830
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,779
शरद जोशी 40,771
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,129
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,070
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,578
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,061
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,058
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,806
गरीबी कशामुळे? 36,082
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,634
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,594
आईचं छप्पर ।।१०।। 34,551
रे नववर्षा 33,772
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,328
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,309
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,297
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini