Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

कोलमाइन्स

Main page content

By roshankumarpil… | 4:51 PM IST, बुध November 25, 2026
कथा

कोलमाईन
***********************************

आकाश स्वच्छ निरभ्र होतं. उन्हाळा ऋतू असल्याने हवेत उकाळा होता. रात्रीचे नऊ वाजले होते. सर्व गावकरी जेवण करून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर एकत्र जमले होते. शाळेच्या ओट्यावर एक टेबल, साताठ खुर्च्या आणि एक साऊंड, माईक एवढेच साहित्य ठेवले होते.

साऊंड कमी आवाजात सुरु होता . त्यावर वाजणारी आधुनिक गाणी ऐकून पोरं सोरं
त्या तालावर नाचत होते. त्यांचा एकच गलका चालू होता.
काही म्हातारी माणसं त्यांचेवर खेकसत होती. शांत राहण्यासाठी आग्रह धरत होती.
पण ऐकतील तर ती मुलं कसली? थोडावेळ गप्प बसायची आणि लगेच धमाल धिंगाणा सुरु.

थोड्या वेळाने दोन कार शाळेच्या गेट बाहेर धुरळा उडवत येऊन थांबल्या. त्यातून साताठ जण बाहेर पडले. . त्यांची कापडं चमकदार आणि अंगाला गुलाबी अत्तराचा वास येत होता. ती खुर्च्यात बसली. तोवर गजाभाईंनी माईकचा ताबा घेतला. गजाभाई अंतरगावचे सरपंच होते. त्याने शिपायाला सांगून टेबलवर पाणी बॉटल ठेवायला सांगितलं.
" हॅल्लो, हॅल्लो... सर्वांनी बसून घ्या. बघा. ज्या कामासाठी आपण जमलो ते सायेब येती आले हायेत. आपापसात बोलत बसण्यापेक्षा ते काय मंतात ते आयकुन घ्या. मग तुमचे मत मांडा. "
सरपंच माईक वरून अधिकारवाणीने कोकलत होते.
तोवर गावकरी शांत बसण्यासाठी जागा शोधू लागले. हळूहळू काही स्त्रिया सुद्धा पटांगणात येऊन बसल्या. लहान मुले आपापल्या पद्धतीने आई , वडिलांजवळ गेले. बसले.
सरपंचांनी पाहुण्यांच्या स्वागतानंतर प्रास्ताविक सुरु केले .
" तुमाले मागच सांगल्यापरमाने आपल्या गावची जमीन आता कोलमाईन मंदी जाणार हाये. तं आता पुढं का कराचा , यासाठी सायेब मार्गदर्शन करतील . घ्या सायेब . " म्हणत माईक साहेबांकडे दिला.

" हॅल्लो .. सर्वांना नमस्कार. आपले सरपंच सायेबने जो सांगला आये तसा कोलमाईन होणार है. तो सरकार आपल्या गावचे शेती विकत घेनेवाला आये. मतलब पैसे, मिलेगा, नोकरी मिलेगी, पुनर्वसन होणार. ज्या गोष्टीला तुम्ही राजी असणार ते होणार. पुढे आपला सायेब आपको मराठी मे अच्चेसे बतायेगा , शुक्रीया. " आधीच कार्यक्रमाला उशीर झाला. त्यात नमनाला घडाभर तेल वाया घालवण्यापेक्षा साहेब थेट मुद्द्यावर आले .
हे कंपनीचे बडे साहेब होते. जोसेफ ब्रिगेंजा. उंच गोरापान, लांब नाकाचे आणि घाऱ्या डोळ्याचे त्यांनी आपल्या कंपनीचा मुख्य अजेंडा लोकांसमोर ठेवला होता. त्यानंतर पांढरपट्टे साहेब उभे झाले त्यांनी उपस्थितांशी मातृभाषेतून संवाद साधला होता .

" या भागातील शेतकऱ्यांची प्रगती साधायची असेल तर त्यांनी जमीन कोलमाईनला विकली पाहिजे. त्यातून तुमचे नुकसान होणार नाही. गावाचे पुनर्वसन करण्यात येत आहे. योग्य मोबदला देण्यात येत आहे. नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत . तुम्ही जसं म्हणाल तसं कंपनी ऐकायला तयार आहे. यातून तुमची प्रगती होईल. देशाचा ,राष्ट्राचा विकास साधला जाईल.
तेव्हा सहकार्य करावे अशी मी विनंती करतो . यानंतर आपल्या निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रीय आमदार वटवटे साहेब मोबाईलवर संवाद साधणार आहेत. ते आपण ऐकून घ्या. " अशी सूचना केली. पांढरपट्टे साहेबांनी आमदारांशी मोबाईलवर संवाद सुरु केला.. " हा बोला साहेब... लोकं ऐकत आहेत.. " त्यांनी मोबाईल फोन टेबलवर ठेवला. बाजूला माईक ठेवला. त्यामुळे त्याचा आवाज लोकांना ऐकू येत होता.
" सर्व गावकरी मतदार बंधू भगिनींनो मी आज येणार होतो पण मुंबईला एका महत्वाच्या मीटिंगसाठी बोलावणे आल्यामुळे त्याठिकाणी उपस्थित राहता आले नाही. आपल्या परिसरातील ह्या जमिनीत कोळसा असल्यामुळे सरकारने ह्या जमिनी खाली करण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात त्या ठिकाणी तुमचे पुनर्वसन केले जाईल. नोकऱ्या दिल्या जाणाऱ आहेत . पैसा दिला जाणार आहे. त्यामुळे ज्यांना जे काही लाभ घेता येतील ते अवश्य घ्या. पण ते खाली करावेच लागेल. त्याला विरोध करून जमणार नाही. कोळसा ही राष्ट्रीय संपत्ती आहे.
मी गावात भेट द्यायला येणार आहे. तुमच्या काही समस्या असतील तर मला सांगा. त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. येवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो. जय हिंद, जय विदर्भ. "

ते ऐकून एक तरुण उठला . शुभम त्याचं नाव. बी .ए . पर्यंत शिकलेला. सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. उंच पुरा सवळासा तरुण गावातील गजानन गायकीचा थोरला मुलगा. त्याला दोन एकर शेती आहे. स्वतःचं घर आहे. लहान भाऊ बारावी शिकतोय. शुभम भडकला. त्याने सायबाला खडे बोल सुनावले.
" साहेब , आम्हाला काही नको आहे तुमचे पैसे बियसे . शेती आमची माय आहे . मायले कोणी इकते का? तुम्ही आम्हाले बेघर करू नका . नोटांचे तुकडे दाखवून आमच्या तोंडाले पाणी सुटणार नाही . या भागाची प्रगती करायची असेल तर चांगल्या शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून द्या . चार वर्ग असलेली शाळा आहे . त्यात एकच शिक्षक आहे. तिकडे लक्ष द्या. गावात येण्यासाठी पक्का रस्ता नाही. तो बनवून द्या . दिवसातून ये -जा करणाऱ्या शेकडो ट्रकमुळे लोकायचे पिकांवर डस्ट साचते.पिकं उद्ध्वस्त होतात. त्याच्यावर उपाय योजना करायचा सोडून हा भलताच सोंग करू नका.नोटा दाखवून आम्हाला बेघर करू नका . या हातांनी मेहनत मजुरी करून जोडलेले आहेत ते घरं आम्हाला तोडायचे नाही साहेब . ही जागा तुम्हाला विकायची नाही ." शुभम पोट तिडकिने हे वास्तव सत्य मांडत होता. पण त्याचे कोण ऐकून घेतो ?

" याले का समजते. गपचीप बस मना , पुष्टी घालून. अबे, येवळा पैसा भेटते. नौकरी भेटते. अजून का झिंगा पायजे बे तुले ?" शत्रुघ्न त्याचेवर डाफरला.

" पण येवळूशा पैशाना धूप जरत नाई . एकरी तीस लाख रूपये तरी पायजे. एक्री एक सीट नोकरीची आणि पुनर्वसनचा प्लॉट . अशी आमची मागणी आहे. " पोलीस पाटील देशमुख यांनी हा मुद्दा रेटून धरला .
" पंधरा लाख रुपये एकर किंवा घरातील एका व्यक्तीला नोकरी ही किंमत आमच्या कंपनीने ठरवलेली आहे . त्यात वाढ करण्याचा अधिकार मला नाही . हे तुम्ही सांगितलेला आकडा कंपनीकडे प्रस्तावित करेल पण सध्या तरी माझ्या हातात काही नाही." पांढरपट्टे साहेबांनी आपले विचार स्पष्ट केले.

" ठिक आहे. कंपनीने आपल्यासाठी काही नाश्ता पाठवलेला आहे. त्याचा आस्वाद घ्यावा आणि सहकार्य करावे. "
सरपंचानी आपल्या शिपायांना सांगून कंपनीच्या चार माणसांसोबत नाश्त्याचा स्टॉल लावला . त्यात आणलेले समोसे आणि जलेबी घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली .

" खा भोसडीचेहो ! बापराजी खायले भेटलं नाही . आता खा. आवळा देऊन कोहळा घेण्याचा डाव आहे हा . लॉलीपॉप दाखवत आहे हे सरकार , या कंपनीच्या माध्यमातून. "
शुभम चिडला . जमलेल्या लोकांची खरडपट्टी काढत होता . त्यांना कंपनीचा आणि सरकारचा कावा स्पष्टपणे समजावून सांगत होता . पण त्याचे ऐकून घ्यायला कोणीच तयार नव्हते . सारेच कंपनीने आणलेल्या समोसे आणि जलेबीच्या स्टॉलभोवती गुळावरच्या मशांसारखे घोंगावत होते . काहींनी तर स्वतः हात घालून कटोऱ्यातून अक्षरशः हिसकावून घेतले होते .

सरपंच " शांततेने घ्या . सगळ्यांना मिळेल ." असं माईकवरून सांगून सांगून थकला होता. कंपनीचे साहेब मनातल्या मनात लोकांच्या लाचारीवर हसत होते .

शेवटी पाच दहा लोक सरपंचाकडे तक्रार घेऊन आलेच.
"सरपंच , आम्हाले नाही भेटले ना समोसे . " रमेश बोलला.
" आता या लोकायले किती सांगितलं तरी ऐकत नाही . बरं , जाऊ द्या रमेश पाटील , पुढच्या वेळी पाऊ . अजून बऱ्याच वेळा मीटिंगा होणार आहेत . पुडच्या टायमाले मटनचा जेवण आये . " सरपंचांनी रमेश पाटलांसह सर्वांची समजूत काढली . साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली होती .

हळूहळू गर्दी घराकडे वळली . काहींच्या मनात गुदगुल्या फुटत होत्या . भरपूर पैसा मिळेल. नोकरी मिळेल. पुनर्वसन होईल. काहींना मात्र त्या गावाविषयीचे जन्मापासून असलेले भावनिक बंध अस्वस्थ करत होते . आपलं गाव, आपली माणसं , आपली शेती सर्वकाही आपल्याला सोडून जावं लागेल . यामुळे त्यांचे मन व्यथित झाले होते .

सदा जड अंतःकरणाने घरात प्रवेशला . बाजूला म्हातारा बाप खोकलत पडला होता . बायकोने अंथरून टाकलं होतं . घरात दोन मुलं आपल्या खाटेवर झोपायला गेली होती . सदा शून्य नजरेने न्याहाळत घरभर फिरला. जुने सागवान लाकूड वापरून तयार केलेले ते जोडणीचे घर होते. त्यात त्याच्या बालपणीच्या आठवणींचा गोषवारा होता. डोळाभर बघून अंतर्मनात जणू अखेरचं साठवून घेत होता. घरातील प्रत्येक खांब, कवेलू, दारे खिडक्यांकडे बघत त्यांने दीर्घ सुस्कारा सोडला. मधल्या खांबाला पाठ टेकवली आणि हुंदके देत तिथेच बसला. पन्नाशीतला सदा अंगापिंडाने भरदार होता खरा . पण या संकटाने तो पुरता हतबल होऊन एखाद्या लहान लेकरासारखा रडत होता.

अंतरगाव परिसरात कोळसा खाण असल्याचे संशोधनात आढळून आल्यामुळे सरकारने गावकऱ्यांना योग्य मोबदला देऊन पुनर्वसन करायचे योजले होते. सरकारने ती जमीन कंपनीला विकली होती. कंपनीने आपल्या हालचाली सुरु करुन लोकांना सावध करायला सूरवात केली होती. आज त्या विषयाची दुसरी मीटिंग होती. वर्षभरात येनकेन प्रकारेण अंतरगाव परिसरातील लोकांचे पुनर्वसन करायचे होते. त्यामुळे सदा हवालदिल झाला होता.

सदाचे रडणे ऐकून त्याची बायको देवका उठली . सोबत दोन मुलेही . बायकोने विचारलं ," काय झालं रडायला ? " तो काहीच बोलला नाही . नुसता हमसत राहिला . आतल्या आत धुमसत राहिला.

" त्याले का होते. निव्वळ नौटंकी!" सुरज मोठा मुलगा तिरसटपणे बोलला.
" तू चूप राय. जा झोप बरं. " देवका त्याचेवर चिडली.

" या गावात जन्मापासून राहिलो . शेतीत राबलो . ते शेतीवाडी , हे घर सोडून मले नाही जायचं . " सदाने मनातील सल मांडली.

"मग राय येतीच ... भुतावाणी एकटा . चांगला पैसा भेटते तर तो नको वाटत असल . कोणाचं चांगलं होवावा असं वाटतच नाही या माणसाले ." सुरज परत चिडला.

" अबे तुमचं चांगलं व्हावा म्हणूनच जीव झुरते माणसाचा . त्या लहानशा शुभम्याले समजते पण तुमच्या अकलेचा लाईट लागत नाही त्याला मी का करू ?"
सदाच्या संयमाचा बांध फुटला. त्यानं सुरजची कानउघडणी केली.

" ते बह्याळ आये लेकाचं सुभ्या. त्याले का अक्कल न ढक्कल. चार बुकं शिकला मंजे मोठा तिस्मलखान समजते का सोताले ?" सूरज खोचकपणे उत्तरला.

" तुलेच बरी आहे दुनिया भराची अक्कल." आईने त्याचा समाचार घेतला. पण तो नमेल तर सूरज कसला? वेळ झोपेची झाली असली तरी हा सूरज मध्यान्हीच्या सूर्यासारखे आग ओकत होता.

" मले अक्कल आहे म्हणूनच सांगतो. बरं आपल्यालेच गाव सोडून जा लागते का? जे जगाचं होईल ते आपलं होईल . " सूरज इरेला पेटला.

" ते काई नाई मले डिवटी पायजेल मंजे पायजेल . तुम्ही पैसे घेत असाल तं घ्या. नाहीतर काई करा. " आत्ता पर्यंत बघ्याची भूमिका घेतलेला अजय मध्येच नागोबा सारखा फणा काढून उठला .

" तुमच्या बापाची कमावली आहे का बे ? मी कमावलो . पण मलेच कोणी विचारत नाही . " बोलता बोलता शिवा बुड्ड्याला दम दाटून आला. खोकल्याची उबळ आली. " आक... थू..ss" करून खाटेखाली असलेल्या घमेल्यातील राखेत घसा खाकरून ठसा थुंकला त्याने . त्याच्या डोक्यात अग्नी जाळ पेटला होता. शिवा हा सदाचा जन्मदाता. म्हातारपणामुळे खंगला होता.
" बईनचं बुड्ड लेकाचं , मराले टेकलं तरी माजं माजं करते . " सूरजने परत आगीत तेल ओतलं आणि भडका उडाला.
" माजं नाही तं का तुजं आहे का बे? कमाई नोको कवळीची अन् शेंग मांगते चवळीची . "
शिवा बुढ्ढा उठून उभा झाला. रागाने लाल झाला तो . आवाज वाढल्यामुळे त्याला खोकल्याची उबळ आली . म्हातारा झंडू फुटल्यागत कासावीस झाला . त्याला दम्याचा आजार होता. अजय धावत गेला. त्याला प्यायला पाणी दिलं .
" पे पाणी. नाई तं दम कोंडून गचकशील . "
म्हातारा पाणी पिऊन शांत बसला. त्याला बोलण्याची इच्छा होती पण तब्बेत साथ देत नव्हती म्हणून तो शांत बसला. थोड्या वेळाने सारं वातावरण निवळलं. सारे झोपेला जवळ करण्यासाठी अंथरुणात शिरले होते .

त्या रात्री सदाला झोप आली नव्हती . तो रात्रभर कूस बदलत नुसता पडून होता . सुरज आणि अजय दोघेही नोकरी, पैसा, गाडी यांचे स्वप्न पाहत गाढ झोपी गेले . शिवा आजोबा खोकत होता. त्याला म्हातार चळ लागली होती. अर्धवट झोपेत काही बाही पुटपुटत होता. सरकारला, आमदार, सरपंचाला शिव्यांची लाखोली वाहत होता. देवकी शांत पडली असली तरी अंतःकणातून अस्वस्थ होती.

अजय सदाचा लहान मुलगा. दिसायला वाडीलांसारखाच गोरापान उंचपुरा . त्याचे राजुऱ्याच्या काजोलवर जीवापाड प्रेम होते. तो तिला चांद्याच्या आझाद बागेत फिरायला घेऊन गेला . ती सुध्दा नाकीडोळी छान होती. राजुऱ्यातील कॉलेजमध्ये बारावीला शिकत होती.
काजोलचा मामा अंतरगावला राहतो. ती मामाकडे यायची तेव्हा या दोघांचे सुत जुळले होते.

" मले नौकरी लागणार आहे. " अजयने गोड बातमी देताच ती मनोमन हरकली.
" पण मले विसरू नको . "
शंकेने डोके उंचवल्याने तिने चिंता व्यक्त केली.
" विसरीन . तू आठवण करशील तं उचकी लागल. मग मी पाणी पेईन. " तिची खिल्ली उडवत अजय खळखळून हसला. तसा तिला राग आला. तिने त्याच्या हातातील स्वतःचा हात झटकन हिसकावून घेतला .
" अवं, कायले अशी नाक फुगवतस. नाई विसरत नं तुले . " त्याने बळेच तिचा हात हातात घेत राग घालवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यात दाटलेल्या श्रावण सरींना बांध फुटला होता. तो त्याने खिशातील रुमालाने अडवला .
" ते काई नाई. तुले नौकरी लागली की आपण लग्न करु. " ती रडत रडत बोलत होती .

" हा हा.. करु की . "
त्याच्या मधूर बोलण्याने तिच्या ओठांची कळी खुलली . रडणाऱ्या नयनात हसरे गुलाब फुलले .
" मले धोका देऊ नोको. नाईतं मी जीव देईन . "
त्याच्या मिठीत येत तिनं सुस्कारा सोडला.
" तुया शिवाय नाई जगू शकत मी. "
" मी बी!" तो तिला मिठीत घेत कितीतरी वेळ नुसता कुरवाळत बसला होता.

पावसाळा सुरू झाला. सदाने आपल्या शेतात कापूस पेरला होता.
सूरज नेहमी सारखा शेतात गेला. कापसाला फवारणी करत होता तो. सोबतीला त्याचा गाडी रामा होता. थोडं काम झाल्यानंतर सूरजला मित्र संदेशचा फोन आला. त्याने लगेच हातपाय धुतले आणि काढता पाय घेतला .
" आत्ता येतो पाय. तुझी बी सोयपाणी घेऊन येतो. " एवढंच सांगितले त्याने रामाला.
" लवकर या, मालक!"
" तू बापाले तेवळा सांभाळ. लगेच आलो मी. "
म्हणत तो किक मारून वायू वेगाने स्प्लेंडरचे अश्व उधळत निघाला होता . थेट वर्धा नदी किनारी असलेल्या जन्नत बारमध्ये येऊन थांबला तो . त्याचे चार दोस्त आधीच त्याची वाट बघत बसलेले होते.
" अरे या सावकार!"
वीरू आणि बाकी तिघांनी सूरजचे स्वागत केले.
"
" नमस्कार पाटलांनो! तुम्ही सावकार म्हणून माझ्या चिंध्या करता राव. " सूरजचा चेहरा पडला.
" ते जाऊ दे . काय घेणार ते बोल ?" संदेशने विचारले.
" मटण फ्राय आणि आपला रोजचा ब्रँड आरएस. " संत्या बोलला.
त्यांनी वेटरकडे ऑर्डर दिली. वेटर पाच ग्लास, चखणा म्हणून भाजलेले चणे, वाफाळलेला शेंगदाणे घेऊन हजर झाला .
" बॉईल अंडे घेऊन ये तोवर. " अक्षयने ऑर्डर दिली. ते विशीतील अजून भरदार मिशीत न आलेली पाच तरुण पोरं स्वतःचं आयुष्य प्याल्यात बुडवून घेत होती .
" आता काय? ल्याट्री लागली बापू तुमाले. मजा आहे तुमची. " वीरू त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत होता.
"आमाले शेती नाई न वाळी नाई. " लगेच त्याने रडगाणे गायला सुरुवात केली.
त्याच्या वडीलांनी दारूपाई शेती गहाण केली होती. स्वतःच्या किडन्या फेल झाल्यामुळे आरोग्यासाठी विकून सुध्दा खाल्ली होती. अखेरीस ना माणूस वाचला ना शेती. दारूपाई सोन्यासारख्या जीवाची माती करणाऱ्या किस्ना मामाचा वीरू सुध्दा आयुष्य मातीत कालवत बसला होता. केवळ फुकट खायला आणि प्यायला मिळते म्हणून या चांडाळ चौकडीचा साथीदार झाला होता. त्याला शहाणपण आलं नव्हतं. वडिलांच्या जाण्याचे वाईट वाटत असते तर दारूच्या प्यालाला स्पर्श सुध्दा केला नसता त्याने. पुढच्यास ठेच लागल्यावर आपसूक मागचा शहाणा झाला असता. पण येरे माझ्या मागल्या..
" परवा आमदाराकडं गेलते लोकं . २२लाख एकर परमाने भाव ठरला. " संत्याने सांगितले.
" आता काय पैसाच पैसा. मालामाल ! थार घेतो तिच्या माय बईन. " प्याला रीचवतांना संदेश उन्मत्त होऊन बोलत होता .
" मी तर दोन नोकरीच्या जागा विकणार आहे. पस्तीस लाख रुपये सीट!" अक्षय बोलला.
" जबरदस्त. आपल्या गावात तूच एक सर्वात जास्त पैसा कमावणार आहे, अक्ष्या . "
" नाई बे, तो मास्तर आहे. सर्वात जास्त जामीन आहे त्याची. त्यानं कोरपना रोडवर जागा घेतली. प्लॉट पाडून विकत आहे. खतरनाक बिजनेस माईंड आहे बापू त्याचा. पाच सीटा विकणार आहे. नौकरीचा पैसा वेगळाच . व्याजानं पैसा देते. तो पाच सा करोड कमावणार आहे. "
" त्याचा जाऊ दे . माय बईन. तो गुवातील कवडी वेच्या सावकार आहे. पण तू आपला जिग्री यार. कोनालेबी मदत करते. माणूस राऊ दे बाई राऊ दे. " म्हणत सूरज हसला.
सर्वांनी त्याच्या बोलण्याचा रोख ओळखला होता.
" काय मग आज नाईट शिफ्ट आहे का नाही?"
संजयने फिरकी घेतली.
" आज कोणता दिवस आहे ?"
" मंगळवार!"
" मग आज पार्टी फुकट देत आहो का मी ? बरोब्बर रात्री आठ वाजता तिच्या नवऱ्याची नौकरी,तो कंपनीत आणि मी तिच्या घरी. सकाळी चार वाजता आपण आपल्या वावरी... मायबाप मंतेत पोरगं शेतीत प्रयोग करते ..... मले सुचते हरी हरी ! " दारूचा घोट घेत अक्षय मिटक्या मारत हड्डीचा आस्वाद घेत होता. त्याच्या डोळ्यातील मादकता उजागर होतांना दिसत होती. त्याच्या बोलण्यावर सारेच हसत होते.
" बाकी माल एक नंबर गटवलास पैसा काई लागो. "
" पैस्याले कोण विचारते बापू. सोताच्या नवऱ्याला जेवळा जीव नसल लावत तेवळा मले लावते. "
" या गोष्टीवर चिअर्स... !!" म्हणत पाचही ग्लास ग्लासाला भिडले गेले . जवळ पैसा आला की नीतिमत्ता, नैतिकता, प्रामाणिकपणा कसा विसरायला लावतो याचे हे उत्तम उदाहरण होते. अक्षयने पैश्याचे आमिष दाखवून घुग्गुसच्या विवाहितेला नादी लावलं होतं. बाहेरख्यालीपणाच्या अशा कित्येक आवई परिसरात ऐकू येत होत्या पण त्या दबक्या आवाजात.

अंतरगाव कोलमाईन्स कंपनीने खरेदी केले होते . सगळीकडे एकच चर्चा. पैसेवाले गाव म्हणून अंतरगाव पंचक्रोशीत प्रसिद्धीस पावले होते .

कंपनीने आता संपूर्ण गाव खाली करण्याचे सर्व ग्रामस्थांना आदेश दिले . काहींनी सहजरित्या तर काहींनी काळजावर दगड ठेऊन आपली घरं स्वतःच पाडायला सुरवात केली होती . काहींनी रोजीची माणसे केली होती घरे पाडायला. आठवडी बाजारात सकाळी आपल्याच हातांनी पाल ठोकायची, दुकानांची आरास मांडायची आणि सायंकाळी मात्र त्याच हातांनी ते चित्रं विस्कटायचं. असंच काहीसं झालं होतं.

गाव ओकंबोकं वाटत होतं. सगळीकडे तोडलेल्या घरांचे सांगाडे पडले होते. विटांचा खच, लाकूड, सिमेंटमध्ये जंगलेल्या सळाखी, धूळ माती यांचा नुसता ढीग. कंपनी नावाच्या भूकंपाचा हादरा इतका भीषण होता की स्वतःच्याच हातांनी स्वतः बनवलेले घरटे उद्ध्वस्त करावे लागत होते.
पाडत आलेल्या घरातील महत्वाचा लाकूडफाटा, विटा, दगड जे काही पुनर्वापर करता येईल असे साहित्य बाजूला गोळा करून ठेवत होते. छन्नी हातोड्यांचा खण खण आवाज कानठळ्या बसवत होता. कोळसा खाणीसाठी चाललेली ही तोडफोड पाहताना सदाच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
गावात दोनच वास्तू अजुनही तग धरून उभ्या होत्या. एक सदाचे घर, दुसरी जिल्हा परिषद शाळा. एकाने वास्तू विकली नव्हती तर दुसरी वास्तू तयार झाली नसल्यामुळे जुन्या शाळेला कंपनीने हात लावला नव्हता. शाळेत फक्त शिक्षक उपस्थीत राहायचे. विद्यार्थी कोणीच येत नव्हते. कोलमाईनमुळे गावातील शाळा ओस पडली होती.
सदाचं घर अजूनही तोडले नव्हते. त्याने ते कंपनीला विकले नव्हते. त्याला योग्य तो मोबदला मिळाला नव्हता. त्याच्या मनाजोगे झाले नव्हते. खरे तर त्याच्या चार एकर जागेला आणि घराला सोडून त्याला जायचं नव्हतं . त्याचा जीव अजूनही अंतरगावात गुंतला होता . त्यामुळे तो तिथेच ठाण मांडून बसला होता . लोक त्याला ' बिनडोक, वेडा पीर ' म्हणून हिणवत होते. सूरज आणि अजय वडिलांच्या हेकेखोरपणाला वैतागले होते.
काय करावं आणि काय नको असे त्यांना झालं होतं . प्रॉपर्टी आजोबाची असली तरी वडील निर्णय घेणार होते . बाकी पोरांची चाललेली ऐश बघून यांच्या मनाची घालमेल होत होती.
घरात रोज खटके उडत होते.

" मले गाडी घेऊन दे!" अजयने बापाकडे टुमनं लावलं.
" कायले गाडी पायजे तुले ? अभ्यास कराचा सोडून लोकायच्या पोरी फिरवत बसतेस. तो भळवा दारू पेवाले जाते . बाप राबते नं तुम्ही ऐश करता, लाज वाटते का बे काई?" सदा डाफरला.

" तू पैसे देत नाहीस . माझे दोस्त पाजतेत . " सूरज डोळ्यात डोळे भिडवून बोलला.
" मग त्यायच्याच घरी जाऊन राय . येती येवाचा नाई. "
" कोणाला येऊशा वाट्टे या भिकार वाड्यात. "
" मग जा ना , मर ना तिकडे.,, "
" तेच वेळ येणार आहे. पण मी मरणार नाई . तू मरशील कुत्र्याच्या मौतीन . " सूरजने बापाला टाकून बोलल्याने सदा भडकला. त्याचा पारा चढला. त्याने ताडदिशी सूरजच्या कानशिलात लगावली. सूरज कासावीस झाला. त्याची सगळी नशा उतरली. त्यानेही बापावर हात उगारला. दोघांची हमरी तुमरी झाली. आई मधे पडली. तिलाही सूरज अद्वातद्वा बोलू लागला.
अजय मधे पडला. त्यालाही ढकलून दिले.
छन्नी हातोड्यांच्या आवाजात त्यांच्या घरात चाललेला कालवा कोणाच्याच कानाला ऐकू आला नव्हता. त्यांचा तंटा सोडवायला कोणीच मध्यस्ती केली नव्हती. सदाने कधी स्वतःच्या वडिलांचा मार खाल्ला नव्हता परंतु आज त्याच्या जन्म दिलेल्या मुलाकडून मार खावा लागल्याने तो अंतर बाह्य हादरला. गलितगात्र झाला होता. तो कंपणीपुढे नाही तर आपल्या रक्ताच्या नात्यापुढे हतबल झाला होता.

" हरामखोरा, तुले का कराचा ते कर . सप्पा कंपनीले इक अन् मांगत बस भीक . मी चाललो वावरत. तेतीच घर बांधून राईन. "

सदा रागारागात पायतान घालून पुढे निघाला. बायकोने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो तिला न जुमानता थेट शेतात निघून गेला . चार एकर शेतातील रस्त्याची धूळ बसून काळवंडलेली पराटी बघून त्याच्या डोळ्यांत सागर दाटून आला होता . आज त्याने शेतातील कोपरानकोपरा हिंडून घेतला. संपूर्ण शेत डोळ्यात साठवून घेतलं . अखेर थकून भागून शेतातील झोपडीत येऊन विसावला तो .

दुपारी आपला मालक शेतातून घरी आला नाही. त्याचा राग शांत झाला नसेल म्हणून त्याचेसाठी देवका जेवण घेऊन गेली . दुपारचे बारा वाजले होते. दिवस हिवाळ्याचे असेल तरी सूर्य मस्तकावर तळपत होता. ती घामाघूम झाली होती. सदा शेतातील खोपीत विसावला होता. तिनं डोक्यावरचं टोपलं खाली उतरून ठेवलं. मालकाला हाक दिली. तो काही उठला नाही. त्यामूळे तिने सदाला हाताने हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचेवर काहीच परिणाम झाला नव्हता. तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले होते . तिला आजूबाजूची परिस्थिती बघून संशय आला. बाजूला उलटीचा घाणेरडा वास येत होता. फवारणीचं रोगर औषधं सांडलेले होते. तिच्या पायाखालची जमीन सरकली.

तिने हंबरडा फोडला. रस्त्यावर येऊन आक्रोश करायला लागली. आज शेतात त्यांचा गडी रामा सुद्धा नव्हता.
आजूबाजूची बायका माणसे तिथे धाऊन आली होती. त्यांनी गावात वार्ता पोहचवली . कामात गुंतलेले सारेच हात थांबले होते. त्यांनी सदाच्या शेताकडे धाव घेतली. सूरज आणि अजय तत्काळ हजर झाले होते. पण सारंच संपलं होतं. सदाने स्वतःचा आत्मघात केला होता. सदाने फवारणीचे औषध प्रशासन करून स्वतःला संपवलं होतं.
कोलमाईन्सच्या पैशाने नाती, नीतिमत्ता, नैतिकता हिरावून घेतली होती.

*************************************
रोशनकुमार शामजी पिलेवान
मु. पो. लेक व्ह्यू रेसिडेन्सी , गोडोली नाका सातारा पिन कोड 415001
मो. 7798509816
*************************************

  • Log in or register to post comments
  • 1 view

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,276 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,172 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,233 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,014 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,488 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,382 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,215 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,837 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,106 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 8,999 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,157 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,247 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,243 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,638 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,972 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,264 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,365 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,624 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,433 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 4 सदस्य उपस्थित आहेत.
  • roshankumarpil…
  • खुशाल दादाराव …
  • admin
  • spatil

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 49 *
Who's new नवीन सदस्य
  • roshankumarpil…
  • Utpreksha Ahire
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    16 hours 19 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    17 hours 2 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 day 5 hours ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 21 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 21 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 191
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 73
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 73
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 64
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 63
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 62
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 60
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 57
आजचे शेतमालाचे बाजारभाव 46
किती चाटणार भारतपुत्रा? 38
कापला रेशमाच्या सुताने गळा 33
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 32
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 26
माझे फेसबूक स्टेटस-1 23
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 21
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 20
किसान क्रांती 20
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 19
अर्धा जोडीदार 15
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 14
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,008
माझे फेसबूक स्टेटस-1 180,985
शुभारंभ 134,915
रानमेवा - भूमिका 109,388
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,400
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,616
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,542
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,831
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,580
उद्देश आणि भूमिका 77,448
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,618
विचारपूस 71,736
गणपतीची आरती ॥३५॥ 67,750
सत्कार समारंभ : वर्धा 66,732
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,315
किती चाटणार भारतपुत्रा? 61,727
जात्यावरची गाणी 56,013
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,423
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,045
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,353
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini