शेती हा विषय माझ्यासाठी फक्त लिखाणाचाविषय नाही,तर माझ आयुष्यच शेती आहे.कारण मी एका शेतकऱ्याची मुलगी आणी शेतकऱ्याची बायको आहे.महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्य़ातील बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्यातील मी शेतकरी आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे.'जय जवान जय किसान'हा आपला नारा आहे.देशातील जवळजवळ निम्म्याहून अधिक लोक आजही उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत.मालकीची शेती असणारा लहानमोठा शेतकरी,शेतीत राबणारा शेतमजूर हे सगळे शेतीवर अवलंबून असतात.ज्याला काहीही कामधंदा नाही तो शेती करतो अशी धारणा ग्रामीणभागात आहे.जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी ऊन ,वारा ,पाऊस अंगावर झेलत काळ्या आईची सेवा करतो. आज शेतात राहताना अनेक नैसर्गिक तर कधी कृत्रिम समस्यांना तोंड द्यावे लागते.शेती हा केवळ व्यवसाय न राहता ,एक बेभरवशाचा खेळ ,(जुगार) बनली आहे. जुगारामधे जसे सर्व नशिबावर अवलंबून असते तशीच अवस्था आज शेतकऱ्यांची आहे.वाढत्या प्रदूषणामुळे ,प्रगतीच्या नावाखाली होणारी वृक्षतोड आणी अनेक मानवनिर्मित बाबींमुळे निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतीचे भयानक नुकसान होते. आर्थिक आणी मानसिक गणित कोलमडते. शेतीला लागणारी बीज -बियाणे ,खते ,मजुरीचे दर तर अगदी गगनाला भिडले आहेत . वाढत्या महागाईमुळे शेतमजूरीचे भाव वाढतच आहेत.
निसर्गाच्या सगळ्या संकटांचा सामना करून पीक जरी वाचवले तरी बाजारपेठेतील अनिश्चितता पाठ सोडत नाहीत.पीक तयार होउन बाजारात नेल्यानंतर त्याला योग्य हमी भाव मिळेलच याचा भरवसा नसतो.
एखाद्या वर्षी ननिसर्गाने साथ दिलीच आणी पीक भरपूर आले तरी भाव इतके कोसळतात की माल रस्त्यावर ओतून द्यावालागतो. याउलट कधी निसर्ग कोपलयामुळे पीक कमी आले तर साठेबाजीमुळे आणी सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. उत्पादन खर्चापेक्षा कमी उत्पादन मिळणे भरपूर पीक येऊनही भाव न मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही न निघणे हा जुगारातील तोटा नाही तर काय?
शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतीला जुगाराच्या स्वरूपातून बाहेर काढून शेती शाश्वत व्यवसाय काळाची गरज आहे. त्यासाठी शेती सिंचनाच्या सुविधा ,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणी हवामानाचा अचूक अंदाज
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.पीकविमयाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
जोपर्यंत शेती निसर्गाच्या लहरीवपणावर आणी सरकारच्या शेती धोरणांवर अवलंबून आहे ,तोपर्यंत शेती हा जुगाराच आहे.
शेतकर्याला जगाचा पोशिंदा म्हणता तर मग जीवनातीलही अनिश्चितता दूर होणे गरजेचे आहे.शासन आणी समाज आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
चालू वर्षी तर पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारली आणी काढणीचया वेळी अतिवृष्टी गारपीटीमुळे संपूर्ण पीक खराब झाल हवामान बदलामुळे कीड आणी रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणी उत्पादनआत घट होते. प्रत्येक हंगामात शेतकरी निसर्गाशी 'जुगार खेळत असतो .
निसर्गाच्या संकटावर मात करून जरी पीक पदरात पडले तरी बाजारपेठेतील मालाचे अस्थिर भाव त्याला नफा मिळूच देत नाही.सरकारची आयात निर्यात धोरणांमुळेच शेतकऱ्यांवर अन्याय होतो .
सततचा तोटा आणी नापिकी यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतो .शेती बेभरवशाचा व्यवसाय झाल्यामुळेच ग्रामीण भागातील तरूण शहरात स्थलांतरित होतो आहे.शेतकरी आत्महत्या ही एक चिंताजनक बाब आहे.शेतकऱ्यांचया मुलांना कमी लेखू जात .शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न देखील होत नाहीत.उत्तम शेती अशी ओळख असलेल्या शेतकऱ्यांची सामाजिक प्रतिष्ठा ही कमी होते आहे.शेतकरी मुलांची लग्न न होण ही सध्या खूप मोठी सामाजिक समस्या बनली आहे.
ह्या आणी अश्या समस्यांचा विचार करता ग्रामीण भागातील जीवन पूर्वीच्या जीवनाचा विचार करता खूप बदलले आहे.ग्रामीण भागातही प्रगतीचे वारे वाहू लागले आहेत. ग्रामीणभागात शेतमालावर प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून अनेक संधी निर्माण होऊ शकतात.म्हणूनतरूण शेतकऱ्यांनी शेती बरोबरच छोटी मोठी प्रक्रिया उद्योग निर्मिती केली पाहिजे.महाराष्ट्र शासनाच्या 'उमेद योजनेंतर्गत गावोगावी बचतगटांची उभारणी महिला शेतकरी ना प्रोत्साहन देऊन स्वयंरोजगाराच्या दिशा मिळू शकतील.ह्या सगळ्या माध्यमातूनशेतकरी महिलांना आर्थिक बळकटी मिळू शकते.आपोआपच शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून शेती हा जुगार नसून शाश्वत अर्थार्जनआचेवर साधन म्हणून बघितले जाईल .तुम्ही आम्ही आपण सगळ्यांच्या एकजुटीने हे शक्य आहे
शेतीप्रधान देशातील शेतकरी सुखी समाधानी प्रगतीशील होईल.
Main page content
वैचारिक लेख
बळीराजावरील विनोदी लेखन
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
खाते बनवा आणि लॉगिन करा
| प्रकाशन दिनांक | लेख/कविता/गझलेचे शीर्षक | वाचनसंख्या | प्रतिसाद संख्या | साहित्य प्रकार | अंतिम अद्यतन |
|---|---|---|---|---|---|
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,276 | 4 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,172 | 8 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पराक्रमी असा मी | 17,232 | 1 | रानमेवा | 4 years 4 months | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-२ | 13,014 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-१ | 11,488 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका | 14,382 | 5 | नागपुरी तडका | 8 years | |
| मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! | 11,214 | 3 | माझी कविता | 9 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग- १ | 21,836 | 3 | माझे गद्य लेखन | 10 years 4 months | |
| शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) | 9,105 | 2 | माझी मराठी गझल | 12 years | |
| उद्दामपणाचा कळस - हझल | 8,999 | 2 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 32,151 | 1 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग-३ | 17,247 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| अशीही उत्तरे-भाग - २ | 15,243 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत | 4,638 | 0 | माझी कविता | ||
| राखेमधे लोळतो मी (हजल) | 7,972 | 0 | माझी मराठी गझल | ||
| मग हव्या कशाला सलवारी | 10,264 | 0 | रानमेवा | ||
| छातीचं झाकण बोम्लीवर आलं | 11,365 | 0 | रानमेवा | ||
| मांसाहार जिंदाबाद ...!! | 16,622 | 0 | रानमेवा | ||
| आंब्याच्या झाडाले वांगे | 11,433 | 0 | रानमेवा |
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 44 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 14 hours 30 minutes ago
- 15 hours 12 minutes ago
- 1 day 4 hours ago
- 1 day 19 hours ago
- 1 day 19 hours ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पोळ्याच्या झडत्या | 218,008 |
| माझे फेसबूक स्टेटस-1 | 180,977 |
| शुभारंभ | 134,914 |
| रानमेवा - भूमिका | 109,388 |
| नागपुरी तडका - ई पुस्तक | 107,396 |
| आजचे शेतमालाचे बाजारभाव | 92,610 |
| सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता | 87,542 |
| कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! | 82,831 |
| भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा | 79,580 |
| उद्देश आणि भूमिका | 77,447 |
| विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह | 73,614 |
| विचारपूस | 71,736 |
| गणपतीची आरती ॥३५॥ | 67,750 |
| सत्कार समारंभ : वर्धा | 66,732 |
| शेतकरी संघटना लोगो, बिल्ला | 63,312 |
| किती चाटणार भारतपुत्रा? | 61,716 |
| जात्यावरची गाणी | 56,012 |
| माझे फेसबूक स्टेटस - 2 | 49,422 |
| महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात | 47,045 |
| हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। | 46,353 |
