Main page content
आयुष्याची दोरी : कविता ॥३४॥
हे सजीवसंख्येचे नियमन करणार्या मृत्यो,
कधीही, कुठेही आणि कसेही
आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे
तुझे अधिकार मान्य आहेत आम्हाला
पण सन्मानाने मरण्याचे अधिकार
आम्हालाही असावेत की नाही रे?
हे “जीवन” तुझे असले तरी
“आम्ही” तर “आमचे” आहोत ना रे?
हे बघ
तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी
आम्ही मात्र उरणारच आहोत
आणि म्हणून…
आमची तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी
एक छोटीशी नाराजी मात्र आहेच
आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण…
पण असा देहाला का छाटतोस रे?
तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे?
कधी चिंध्या, कधी लगदा,
कधी खाद्य मासोळ्यांचे
आणि कधीकधी तर आरपार
उमटतात छेद गोळ्यांचे
थांबायला नकोत काय हे
प्रताप तुझ्या सापळ्यांचे??
हे ऐकून
मृत्यू थोडा भांबावला
मग हळूच हसून म्हणाला
“ही तुमची तक्रार की कांगावा?
प्रथम विचार करा की
सल्ला कुणी कोणास सांगावा?
अरे! कृती तुम्ही करता
आणि विकृती माझी म्हणता?"
“एक्सलेटर” दाबण्याआधी
“ब्रेक” मारणे शिका
वेगासोबतची थांबवा
फालतू अहमिका
ज्याचे हक्क त्याला द्यावे,
लूट थांबायला हवी
नाहीतर अटळ आहे
संघर्ष व यादवी
स्वावलंबी झाडावर बहरल्यात
परावलंबी वेली
परावलंबीने स्वावलंबीची
काय गत केली?
सभ्यतेची उत्क्रांती दिशाहीन गेली
म्हणूनच मी आता शस्त्रंपालट केली"
"अरे माणूस म्हणून जन्मलात
तर माणसावाणी वागा
जरा तरी फुलवून पाहा
सौजन्याच्या बागा……!! ”
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
पंधरा/तीन/दोन हजार अकरा
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 78 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 1 hour 24 minutes ago
- 16 hours 40 minutes ago
- 16 hours 48 minutes ago
- 16 hours 59 minutes ago
- 17 hours 1 minute ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पोळ्याच्या झडत्या | 217,992 |
| माझे फेसबूक स्टेटस-1 | 180,939 |
| शुभारंभ | 134,905 |
| रानमेवा - भूमिका | 109,385 |
| नागपुरी तडका - ई पुस्तक | 107,387 |
| आजचे शेतमालाचे बाजारभाव | 92,299 |
| सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता | 87,534 |
| कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! | 82,776 |
| भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा | 79,577 |
| उद्देश आणि भूमिका | 77,438 |
| विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह | 73,480 |
| विचारपूस | 71,700 |
| गणपतीची आरती ॥३५॥ | 67,713 |
| सत्कार समारंभ : वर्धा | 66,725 |
| शेतकरी संघटना लोगो, बिल्ला | 63,290 |
| किती चाटणार भारतपुत्रा? | 61,576 |
| जात्यावरची गाणी | 56,000 |
| माझे फेसबूक स्टेटस - 2 | 49,403 |
| महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात | 47,037 |
| हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। | 46,345 |

खुप छान.
Malubai
खुप छान.
फेसबूक लिंक
गंगाधर मुटे
फेसबूक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0EEeJWZiobU7Yn5829mBX…