Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

नियतीला हे मंजूर नसावे...

Main page content

By Chitra Kahate | 9:23 PM IST, सोम October 14, 2019
लेखाचे समीक्षण
पण नियतीला हे मंजूर नसावे...
 
        शेतीमातीशी आपली नाड जोडणारे, शेती-शेतकरी-शेतीसमस्या या त्रिसूत्रीला बांधील असणारे, उच्चविद्याविभूषित असूनही नोकरी ना करता आपल्या काळ्या आईच्या सेवेचे आणि बळीराजाच्या विकासाचे व्रत हाती घेतलेले श्री. गंगाधर मुटे लिखित 'गंधवार्ता एका प्रेताची' हा लेख म्हणजे वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा, त्यांना विचारप्रेरीत होण्यास प्रवृत्त करणारा लेख आहे. हा लेख त्यांच्या शेतीनिष्ठ जीवन जाणिवांच्या प्रामाणिक अभिव्यक्तीचे एक जिवंत उदाहरण आहे.

 
        'गंधवार्ता एका प्रेताची' या लेखाच्या शिर्षकावरूनच या लेखात दडलंय तरी काय? अशी जिज्ञासा मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. पुढे काय? यापुढे काय? असे करत शब्द न शब्द हृदयाचा ठाव घेत राहातो. त्यामागील कारण म्हणजे वाचकांना खिळवून ठेवण्याची लेखकाची हातोटी असेच म्हणावे लागेल. 'सरळ साधी परंतु वैविध्यपूर्ण भाषा आणि वाचकांच्या थेट मनापर्यंत पोहचण्याची अभिलाषा', हेच या उत्कृष्ट लेखाचे गमक आहे.

 
        या लेखात दोन मित्रांच्या भिन्न जीवनप्रवासाचे वर्णन मोठ्या खुबीने करून दोन जीवनप्रवाह वाचकांच्या समोर लेखकाने प्रस्तुत केले आहेत. भरत गव्हाणकर हा एक उच्चविद्याविभूषित असूनही सुसंस्कारित तरुण असून केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर गलेलठ्ठ पगाराची शासकीय नौकरी सोडून गावात राहायला येतो आणि शेतीचा व्यवसाय पत्करतो. शेतीत नवनवीन प्रयोग करून आपले इच्छित साधण्याचा प्रयत्न करतो परंतु निराशा पदरी पडते. सर्व वडिलोपार्जित संपत्ती शेतीत खर्च करूनही हाती काही लागत नाही. इतिहास बदलविण्याकरिता टाकलेलं पहिलं पाऊल इतिहासाचा पार भूगोल करून जातो. सर्व बँकांची थकबाकी, सावकाराची कर्जबाकी यामुळे त्याची हालत हलाखीची होते. कर्जाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसून त्याला स्वस्थ बसू देत नाही. पण तो नियतीचे वार झेलत न डगमगता मार्ग काढीत पुढे जात राहातो. आपल्या कौशल्याच्या जोरावर टीव्ही, रेडिओ दुरुस्तीचा जोड व्यवसाय स्वीकारतो.
       त्याचवेळी कधीकाळी भरतचा वर्गमित्र असलेला, स्वभावाने खंबीर असलेला, खूप उन्हाळे पावसाळे सोसलेला, निधळ्या छातीचा अर्जुन प्राप्त परिस्थितीशी हतबल होतो.

 
         या लेखातून श्री. गंगाधर मुटे यांनी दोन भिन्न मतप्रवाहाचे दर्शन आपल्या प्रवाही आणि प्रभावी लेखणीच्या साहाय्याने घडविले आहे. दोन भिन्न व्यक्तिरेखा प्राप्त परिस्थितीशी कसा सामना करतात याचे दर्शन घडविले आहे.

 
        दोन मुलींचा बाप असलेला अर्जुन आर्थिक विवंचनेने पोखरलेला, कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाने गांजलेला, अगदीच हतबल झालेला. त्याच्याजवळ आठव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीला शालेय गणवेश घ्यायलाही पैसे नाहीत. आज उद्याच्या कालचक्रात तो पुरता फसलेला. लेखकाचे हा गणवेशाचा प्रसंग चित्रित करतानाचे लेखन कसब वाखाणण्यासारखे आहे. तो प्रसंग अंगावर शहारे उभे करतो, प्रत्यक्ष आपल्यासमोरच घटना घडतेय की काय असे वाटत राहते, छोटया मुन्नीची त्या ड्रेसमुळे झालेली अडचण डोळ्याला धारा लावल्याशिवाय राहात नाही.

 
        अर्जुन सव्वीस जानेवारीकरिता मुन्नीसाठी ड्रेस आणायला तालुक्याच्या गावी जातो. पण नियतीला ते मंजूर नसावे. सारे प्रयत्न विफल ठरतात. गेलेला अर्जुन रिकाम्या हाताने परत येतो. आणि आपण किती हतबल आहोत हा आघात त्याला गळफास घ्यायला प्रवृत्त करतो .घराच्याच अंगणातील बोरीवर अर्जुनचा लटकता मृतदेह पाहून त्याची पत्नी नीलिमा ही सुद्धा गतप्राण होते. आपल्या माघारी दोन चिमुकल्या मुलींना सोडून दोघेही इहलोकीच्या यात्रेला रवाना होतात .
        आपले आईबाबा आता या जगात नाहीत हा कसलाही गंध नसणारी केवळ अकरा महिन्याची त्याची छोटी मुलगी भरतचा हंबरडा ऐकून रडायला लागते.

 
        या शोकांतीकेचे कारण म्हणजे अर्जुन अडत्याला मुलीचा गणवेश घेण्याकरिता उसनवार पैसे मागतो परंतु त्याचे कर्ज यंदाचे पूर्ण पीक त्याला देऊनही फिटलेले नसते. बँका आणि सावकाराची कर्जबाकी तशीच असते. दुकांदारानेही किराणा थांबवलेला असतो, कारण गेल्या वर्षी कोरडा दुष्काळ आणि या वर्षी ओला दुष्काळ एवढाच काय तो फरक असतो.
        पुन्हा एका कुटुंबाने कर्जाच्या विळख्यात गुदमरून आपल्या सर्वांचा निरोप घेतलेला असतो. आणि पुन्हा एका अध्यायाची समाप्ती होते.
        हा लेख वाचताना हा लेख नसून  बळीराजाच्या जीवनावरील अख्खी कादंबरी वाचकांच्या पुढ्यात अवतरते. हीच लेखकाची खरी किमया आहे.
        'गंधवार्ता एका प्रेताची' या लेखाच्या माध्यमातून श्री.गंगाधर मुटे यांनी समस्त समाज आणि शासनव्यवस्था यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. वाचकांना वाचनाभीमुख करणारा तसेच प्रत्येक वाचकांच्या अंतरंगाचा ठाव घेणारा, त्यांना विचार करायला भाग पडणारा हा लेख लेखकाच्या यशस्वितेची पावती देतो. मा.श्री गंगाधर मुटे यांच्या लेखणीला सलाम.
        
        चित्रा कहाते
        22, शिवगिरी हाऊसिंग सोसायटी
        ओमनगर नागपूर - 30



लेखाची लिंक - http://www.baliraja.com/node/1309  - गंधवार्ता एका प्रेताची
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, October 15, 2019 - 21:45
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
*congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5808 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Nilesh
  • Subhash.patil

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 40 *
Who's new नवीन सदस्य
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    16 minutes 6 seconds ago
  • शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी'
    25 minutes 35 seconds ago
  • मस्तच
    4 hours 37 minutes ago
  • हार्दिक आभार
    7 hours 21 minutes ago
  • छान रचना
    13 hours 56 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
बळीराजा मोबाईल अ‍ॅप 3
देवा गरीबाच्या घरी ..... कवा कवा येत जा.... 3
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 3
शेतमालाचा भाव 3
उपयोग काय सांगा 3
पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही - भाग १२ 3
शेतकऱ्याचा गळफास 2
गज़ल : सीमेवरी जराशे जाऊन या तुम्ही. 2
शेतकरी पात्रता निकष 2
फुलू दे शिवारी 2
शुभहस्ते पुजा : अभंग ।।५।। 2
शहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 2
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी 2
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 2
बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका 2
वाचकांना अंतर्बाह्य चिंब करणारा मेनका धुमाळे यांचा 'कोरडा पाऊस' कथासंग्रह. 2
वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन 2
अंदाजपत्रक - डोंगर पोखरला, उंदीर कोठे आहे? 2
बाप वावर पेरते 2
इरसाल पाऊस 2
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,993
कान पकडू नये 25,879
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,748
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,570
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,349
माय मराठी स्तवन git 25,345
एवढा मोठा नांगूर... 25,083
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,073
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,490
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,421
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,029
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,981
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,948
शेतकरी पात्रता निकष 23,946
शेतकरी प्रकाशन 23,934
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,900
हे गणराज्य की धनराज्य? 23,833
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,745
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini