Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

डोळे आभाळाकडे

Main page content

By Radhika | 9:32 AM IST, शनी September 07, 2019
पद्यकविता

डोळे लावूनी आभाळाकडे किती पाहू रे तूझी वाट
आतातरी ये अन वाहू दे माझ्या शेतात पाण्याचा पाट

आभाळी दिसेना एकही ढग शेताची बघ लागेल वाट
कसे कुणा सांगू भीतीने किती तट तट होतंय पोटात

घेतले व्याजी बी बियाणे पण कसा घालू पेरणीचा घाट
पाणी ना त्या विहिरीतही भेगाळली जमीन झाली ताठ

रूजणार कसे बियाणे पावसा का फिरवली अशी पाठ
तूच अमुचा अन्नदाता तुझ्याविना कशी लागेल ददात

मूल बाळं ती उपाशी गुरांचीही पोटाला लागली पाठ
सरकार दरबारी फिरलो पण ह्या नशिबाने केला घात

मृग नक्षत्र गेले कोरडे गेला कोरडा अवघा आषाढ मास
श्रावणात तर आशाच सोडली भादव्यात तर नकोच आस

शेतकरी राजाची नाही राहीली काहीच या देशात शान
उपाय ना अंमलबजावणी कसली, फुका घोषणांचा बाण

मातीतून रूजे ना एकही बियाणं कसे पूरवू देशाला अन्न,
ढेकळ झालेली सुकी जमीन पाहून माझं डोकं झालंय सुन्न

बैलपोळा कसला आता विसरावे लागले सगळेच सणवार
भुकेने कासावीस जीवांना पाहून जीव हा तुटतो वारंवार

देवास त्या विनवितो जाऊनी परत नको शेतकऱ्याचा जन्म
नको पाहणे ते दुःख कुटुंबाचे तीळ तीळ अन्नासाठी आजन्म

रूजले जरी धान्य, येतोस ऐन वेळी नसता काही आसभास
सोन्यामोत्याचीे कणसं मातीमोल धुळीस शेवटचीही आस 

कसे अवचित येऊनया तार तार करतोस माझी सगळी स्वप्न
कर्ज फेडण्या व्याकूळ मी, तू घेऊन जातोस तोंडातलही अन्न

बसलो आहे गुढग्यात खूपसून विचाराने भंगलेले सुन्नं डोकं
किती त्रास सहन करावा तुझ्याच आशेवर जगत होतं घरटं

आता एकच उपाय द्यावा हा जीव लावूनी गळ्याला मी फास
नाहीतर विष प्राशन करून संपवावा सगळ्याच जीवांचा त्रास

लाचार नको जगणे ते, हात पसरून थकलो आहे आता भारी
कर्जही माफ होईल थोडे, खाणारा एक जीव तरी होईल कमी

सोडून जातो पाठीमागे बायको मुले गुरं ढोर बिचारी बापुडी
दया दाखवून शासन देईल रक्कम मदत म्हणून तरी थोडी

© Kranti Patankar

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

रवीवार, September 8, 2019 - 15:08
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

  • Log in or register to post comments
very nice madam. keep it up..

Bhushan Sahade…

सोमवार, September 9, 2019 - 17:10
Permalink
New

very nice madam. keep it up.. khupach sundar.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6363 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Utpreksha Ahire
  • Rutuja Bane
  • Seema Bhamare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 32 *
Who's new नवीन सदस्य
  • Utpreksha Ahire
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    13 hours 58 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    14 hours 41 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 day 3 hours ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 18 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 18 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
पोट भरल्यावर लढाई संपते यार 4
दारिद्र्य 4
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 4
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल 4
शेतकरी बाप माझा 3
इथ बदललंय काय? 3
kawita 3
(ब) छंदमुक्त कविता 3
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 3
वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन 3
असा आहे आमचा शेतकरी 3
शेतकरी साहित्य संमेलन : एका तपाकडून दुसऱ्या तपाकडे : वाटचालीची दिशा 3
मढे मोजण्याला 3
बळीराजा की बळी जाणारा राजा? 3
कळली तर कळवा 3
धावपट्टी 3
विलगीकरण 3
बळीचे कर्तुत्व झाकले गेले 3
बरं झाल देवा बाप्पा...!! 3
शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,993
कान पकडू नये 25,877
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,747
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,565
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,344
माय मराठी स्तवन git 25,344
एवढा मोठा नांगूर... 25,074
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,073
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,490
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,418
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,028
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,977
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,946
शेतकरी पात्रता निकष 23,939
शेतकरी प्रकाशन 23,934
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,894
हे गणराज्य की धनराज्य? 23,831
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,742
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini