Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

नाटकी बोलतात साले!

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:02 AM IST, गुरू April 25, 2013
नाटकी बोलतात साले!



कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे

नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे



भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;

तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!



राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर

तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे



रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय

भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे



देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे



मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू

त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे



                                                   - गंगाधर मुटे

----------------------------------------------------------------------------------------------------------

बटू वामन - शेतकर्‍यांना आत्महत्तेस बाध्य करून पाताळात गाडणारे सर्व सत्ताधारी म्हणजे बटू वामनाचेच वारस होय.
बटू वामन हा हिंदूचा देव आणि त्यावरच मी फक्त टीका केली आहे असे समजून हिंदूव्देष्ट्यांनी निष्कारण हुरळून जाऊ नये. कारण सर्वच धर्मांनी शेतकर्‍याला पाताळात गाडण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही, यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. एका शेरात सर्वच धर्माच्या प्रेषितांचा उद्धार करणे मला शक्य नसल्याने अपरिहार्यतेपोटी मी ’दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने केवळ वामनाचाच उल्लेख करू शकलो, याची मला जाणीव आहे.

तसा मी आस्तिक, बर्‍यापैकी धार्मिक आणि देवपूजकही आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
ग्रामीण
शेतकरी
शेतकरी गीत
शेतकरी काव्य
shetkari
Farmer
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
मराठी गझल
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
माझी गझल निराळी
कविता
काव्यधारा
देशभक्ती गीत
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
मुटे सर, श्रमिकांच्या,

Kamalakar Desale (-)

गुरुवार, April 25, 2013 - 19:51
Permalink
New

मुटे सर, श्रमिकांच्या, कष्टकर्‍यांच्या, शेतकर्‍यांच्या बाजूने इतकी स्पष्ट वैचारिक भूमिका - जी अनेकांना गद्द्य लेखनातही घेता येत नाही - आपण कवितेतून घेतली,

हा शेतकर्‍याचा नवा आसूड आहे.

अभिनंदन . सलाम !!!!!!!!!!!!

  • Log in or register to post comments
फेसबूकवरील प्रतिक्रिया

Kanthak Boudha (-)

गुरुवार, April 25, 2013 - 19:57
Permalink
New

आवडली.
अगदी बरोबर.

  • Log in or register to post comments
भन्नाट.

Devdatta Sangep (-)

गुरुवार, April 25, 2013 - 19:59
Permalink
New

भन्नाट.

  • Log in or register to post comments
अद्वितीय

Raj Pathan (-)

गुरुवार, April 25, 2013 - 20:12
Permalink
New

अद्वितीय.

  • Log in or register to post comments
फेसबूकवरील प्रतिसाद

संपादक

शुक्रवार, April 26, 2013 - 23:13
Permalink
New

Marathi Kavita - मराठी कविता समूह वरील प्रतिसाद.

    Yogita Patil, Suryakant Dolase, Shivaji Sawant and 16 others like this.





   Sudhakar Kadam

            jabaradast..................................



  Prabhakar Patki 

          मताच्या ठोशांनी सत्ता उलथविली पाहिजे..........



  Prashant Panwelkar 

           surekh............



   Renu Khatavkar 


          देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

          क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे



          मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू

          त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे....    kya bat hai!



   Jayant Patwardhan 

           nice



   Kalpi Shyam Joshi 


          रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय

          भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे....................वाह



   Kalpi Shyam Joshi 


          देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

          क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे.........तडका



   Shivaji Sawant 


          चांगले लिहिले आहे. आवडली रचना.



  Suryakant Dolase 


          नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे



   Prakash Redgaonkar 


          surekhch aavdli



   Yogita Patil 


          khas ,khas ,khas


  • Log in or register to post comments
फेसबूक लिंक - २२/१२/२०१४

गंगाधर मुटे

मंगळवार, December 23, 2014 - 09:56
Permalink
New

फेसबूक लिंक - २२/१२/२०१४

https://www.facebook.com/gangadharmute/posts/936360563055299

  • Log in or register to post comments
Apratim... Pn yaach

दीपक

गुरुवार, December 25, 2014 - 00:57
Permalink
New

Apratim... Pn yaach shetkaryansathi ladhayla Wamanrao Chatap aale aahe... Jyanche Katy adarniy shared Joshi saranmule fault aahe... Jay jaw an jay kisan

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 14601 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • प्रतीक
  • Giridhar kachole

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 18 *
Who's new नवीन सदस्य
  • KIRAN PRABHAKA…
  • प्रतीक
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 11 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 11 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 11 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 11 hours ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    2 days 12 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 49
आजचे शेतमालाचे बाजारभाव 26
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 23
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 21
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 20
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 20
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 19
किती चाटणार भारतपुत्रा? 17
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 15
कापला रेशमाच्या सुताने गळा 13
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 11
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 9
किसान क्रांती 7
हॉट चिप्स 4
आम्ही शेतकरी... 4
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 3
शेतकरी बाबाची आरती 3
माणसाचा नव्हे साधनांचा विकास - भाग ४ 3
गझल 3
धरेचे लेकरू आपण 2

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,979
माझे फेसबूक स्टेटस-1 180,846
शुभारंभ 134,900
रानमेवा - भूमिका 109,384
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,382
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,247
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,530
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,774
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,576
उद्देश आणि भूमिका 77,434
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,422
विचारपूस 71,693
गणपतीची आरती ॥३५॥ 67,710
सत्कार समारंभ : वर्धा 66,721
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,278
किती चाटणार भारतपुत्रा? 61,404
जात्यावरची गाणी 55,996
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,368
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,037
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,344

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini