Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 7:37 PM IST, मंगळ October 21, 2014
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी



आयुष्यभर संसारात "दिवे" नाही लावता आले,

मग आजच भरमसाठ पणत्या लावल्याने

असा कोणता प्रकाश पडणार आहे?

प्रपंच्याच्या रहाटगाडग्यात "उजेड" नाही पाडता आला,

मग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने

असा कोणता गगनचुंबी "उजेड" पडणार आहे?



लक्ष्मीपुजनाचे विचारताय?

मग ऐका,

आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी

"बॅंकेच्या मालकीची" आहे.

तीची पूजा केली काय नाही काय,

तिलाही तसा काय फ़रक पडणार आहे?

तिचा "मालक" तिची पूजा करेलच की!

शिवाय

माझ्यावाचून लक्ष्मीचे तरी

कधी काही अडले आहे काय?



आणि तरीही मला

"लक्ष्मीपूजन" करावेसे वाटते, पण;

माझे दैवत माझे श्रम आहे

आणि

लक्ष्मीदेवीला "श्रमाच्या घामावर" किंवा

"घामाच्या श्रमावर" प्रसन्न व्हायची

भलतीच अ‍ॅलर्जी दिसतेय.



* * *

शेतकऱ्यांचा राजा बळीराजा

बळीला पाताळात गाडल्याचा आनंदोत्सव

साजरा करणे म्हणजे दिवाळी!

बरोबर?

वर्षभर शेतीला लुटून मिळवलेल्या "संचयाची"

पूजा करणे म्हणजे दिवाळी!!

बरोबर??

नव्या खातेवहीची औपचारीक पूजा करून

नव्या दमाने शेतीला लुटण्यासाठी

नव्याने शस्त्र पाजवत नवा संकल्प 

म्हणजे दिवाळी!!!

बरोबर???

एका दाण्याचे हजार दाणे झाल्यानंतर

त्यातून निर्माण होणारी बचत लुटून

त्यातूनच निर्माण होणाऱ्या

ऐश्वर्याचे ओंगळवाणे प्रदर्शन

म्हणजे दिवाळी

बरोबर????

शेतकर्‍याच्या कमरेला धडूतही शिल्लक राहाणार नाही,

अशा सरकारी धोरणांच्या हिरिरीने अमलबजावणीसाठी

लक्ष्मीपुत्रांनी मांडलेले भव्यदिव्य प्रदर्शन म्हणजे दिवाळी!!!!

बरोबर?????

बळीराज्याच्या "बरबादी का जश्न"

म्हणजे बलिप्रतिपदा 

शेतीच्या "दिवाळखोरीच्या उत्सव" 
म्हणजे दिवाळी

बरोबर??????

* * *

बळीराजाच्या डोक्यावर यंदा

निसर्गानेच "फ़ुलझड्या" चेतवल्यात

आणि

सरकार बळीराजाच्या बुडाखाली

"फ़टाके" फ़ोडायला निघालंय.

* * *

कुठेतरी संपत्तीचे 
ऐश्वर्य उभे राहायला 
कुठेतरी गरिबीचा आणि 
दारिद्र्याचा खड्डा पडावा लागतो
म्हणून
इंडियाच्या शिरावर
समृद्धीचा डोंगर
भारताच्या उरावर
कर्जाचा डोंगर
म्हणून
इंडियात दिवाळी
आणि 
भारतात दिवाळखोरी

* * *

ईडा पीडा टळू दे 

बळीचे राज्य येऊ दे 

* * * 

गरिबीचा क्षय म्हणून 

गळफासाला अभय
भाजल्या कोंबडीला कुठे उरते 
विस्तवाचे भय?



तुमचे तुम्ही लावा दिवे

आणि करा आरास

आम्ही शोधतोय उकिरड्यावर

लेकरांसाठी घास



तसं हे आमचं बारमाही गार्‍हाणं

खणखणीत नसते कधीच नशीबाचं नाणं

सरून गेल्या आशा

मरून गेल्या इच्छा

तरीही मात्र म्हणावेच लागते....

.

.

.

सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!



- गंगाधर मुटे 'अभय'



*** **** **** **** **** ***



=====

दिवाळी
दिपावली
कविता
काव्यधारा
शेतकरी काव्य
कविता मनाला लागली

vinayak kadam

मंगळवार, October 28, 2014 - 21:49
Permalink
New

मुटे साहेब कविता वाचल्यावर लक्ष्मीपुजण करु वाटले नाही हो.

  • Log in or register to post comments
यंदा काही भागात भयावह स्थिती

गंगाधर मुटे

मंगळवार, October 28, 2014 - 22:17
Permalink
New

यंदा काही भागात भयावह स्थिती आहे हो.
लक्ष्मीच नाही तर काय दगडाचे पुजन करणार? :((

  • Log in or register to post comments

In reply to कविता मनाला लागली by vinayak kadam

फेसबुक पोस्ट

गंगाधर मुटे

सोमवार, November 5, 2018 - 19:24
Permalink
New

!!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!

फेसबुकवरील तमाम फुसक्या फटाक्यांना, चकव्या चकऱ्यांना, फॅन्सी फुलझाड्यांना, विनाबारुदीच्या टिकल्यांना, बिनावातीच्या सुतळी बॉम्बाना, गगनभेदी रॉकेटांना आणि मिणमिणत्या आकाश कंदिलांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

© गंगाधर मुटे

  • Log in or register to post comments
फेसबुक लिंक

गंगाधर मुटे

मंगळवार, November 6, 2018 - 11:56
Permalink
New

फेसबुक लिंक

शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी?

आयुष्यभर संसारात "दिवे" नाही लावता आले,
मग आजच भरमसाठ पणत्या...

Posted by Gangadhar Mute on Monday, November 5, 2018

  • Log in or register to post comments
फेसबुक लिंक

गंगाधर मुटे

बुधवार, November 11, 2020 - 10:53
Permalink
New

सहा वर्षांपूर्वी लिहिलेली हीच कविता दर दिवाळीला जशीच्या तशीच्या चालत असते. शब्दाचा एक बदल सुद्धा करण्याची गरज पडत नाही....

Posted by Gangadhar Mute on Tuesday, November 10, 2020

  • Log in or register to post comments
कविता रद्दबातल ठरून कालबाह्य व्हावी

गंगाधर मुटे

शनीवार, November 6, 2021 - 10:45
Permalink
New

सात वर्षांपूर्वी लिहिलेली हीच कविता दर दिवाळीला जशीच्या तशीच्या चालत असते. शब्दाचा एक बदल सुद्धा करण्याची गरज पडत नाही... शेतकऱ्यांच्या आयुष्यात लवकरात लवकर दिवाळी यावी आणि ही माझी कविता रद्दबातल ठरून कालबाह्य व्हावी, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

  • Log in or register to post comments
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक

गंगाधर मुटे

शनीवार, October 18, 2025 - 20:20
Permalink
New

सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 15839 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 27 *
Who's new नवीन सदस्य
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • हार्दिक आभार
    1 hour 43 minutes ago
  • छान रचना
    8 hours 18 minutes ago
  • मन: पूर्वक आभारी 🙏🏻
    8 hours 26 minutes ago
  • छान
    9 hours 19 minutes ago
  • छान रचना
    9 hours 20 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 20
पूर 19
गझल 19
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 16
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 16
गणपतीची आरती ॥३५॥ 15
अकाल पडेल 15
हंबरून वासराले चाटते जवा गाय 15
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 15
विलगीकरण 14
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 13
हिरवा आधुनिक धुरा 13
दुष्काळ... 13
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 13
शेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०११ 13
दुःख मातीतले.... 13
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 12
फुलू दे शिवारी 12
विचारपूस 12
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 12

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,512
नियमावली 44,831
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,176
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,829
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,775
शरद जोशी 40,760
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,125
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,067
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,575
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,057
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,057
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,805
गरीबी कशामुळे? 36,077
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,631
आईचं छप्पर ।।१०।। 34,544
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,502
रे नववर्षा 33,764
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,327
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,308
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,294

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini