पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
गझल :अस्तित्व भारताचे
व्यवसाय हा कृषीचा झाला जुगार आहे. झाली असून मोडी पेरा दुबार आहे.
हा कोणत्या तऱ्हेचा सांगा उतार आहे. मी फेडतो तरीही वाढत उधार आहे.
कृषिकर्म एक हुकमी पत्ता असून देखील, खेळात मिळकतीच्या त्याचीच हार आहे!
मरण्याशिवाय नाही पर्याय कोणताही, जगण्यास पण तरी मी करतो पुकार आहे.
सर्वत्र इंडियाचे प्राबल्य आज असुनी, अस्तित्व भारताचे देशात ठार आहे.
घाट्यात कास्तकारी गेली तरी इथे या, खात्यात शेतकीच्या भारी पगार आहे.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.