पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
गझल : शेती चरून गेली
शेती पहा किती ही धाकी भरून गेली. विळख्यात ती ऋणाच्या बघ गुदमरून गेली.
न्यायालयातही हो मी न्याय मागला पण, बकरीच कायद्याची शेती चरून गेली.
मज वाटले असे की मिळणार दाम माझे, फुकटात पण व्यवस्था मज वापरून गेली!
म्हणताच फक्त द्यावा मज भाव या पिकाला, कुत्र्यापरी व्यवस्था ही कावरून गेली.
दुष्काळ सोसतांना मग याचना फुलांची, वाटेत शेत्कऱ्यांच्या काटे करून गेली.
"सर्वास पोषणारा बेजार शोषणाने" पाहून या व्यथेला नयने भरून गेली.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.