आले नभ गेले नभ
आले नभ गेले नभ दाटली निळाई
तहानेले मन माझे शुष्क ओठ बाई ॥ धृ. ॥
धरा पुसे मज बाई
कोरडे का तळे ?
कसे फुलवावे सांगा
जिव्हाळे नि मळे ?
बोल बोल तूच आता
बोल वरदाई ... ॥ १ ॥
उरी भेगा पडल्या गे
मने भेगाळली
दूर देशी पाखरांची
झेप ओढावली
थेंब - थेंबासाठी जीव
आसुसला होई ... ॥ २ ॥
- मुक्तविहारी

प्रवेशिकेचे मनपूर्वक
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :congrats: :congrats: