खरा खेळ राजकारणाचा जेव्हा थाटतो आम्ही
महापुरुषांना तेव्हा जाती जातीत वाटतो आम्ही
उभारले पुतळे आम्हीच ज्यांचे दारोदारी
विचार विसरून कुठली उंची गाठतो आम्ही
धरुनी झेंडे उराशी एकवटले होते ज्यांना
मतासाठी त्यांना वेगळ्या गटात छाटतो आम्ही
शिकवतो काय भविष्याला कळले न आम्हाला
पुढच्या पिढीला जन्मजात जात दाटतो आम्ही
नोंदविली ही खंत सर्व काळजावर संदीप
महापुरुषांच्या विचारांनी सुद्धा बाटतो आम्ही
संदीप
9049143654
