Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

स्पंदन ग्रामीण व्यथेचे

Main page content

By SatishDeshmukh | 8:04 PM IST, बुध November 25, 2026
कथा

स्पंदन ग्रामीण व्यथेचे

‘चार तास झाले, अजून कशी आली नाही र तुझी एस्टी? किती येळ झाला’, सुभद्राबाईंनी संग्रामला विचारले. संग्राम घडाळ्याकडे पाहत बोलला, ‘अगं आई इकडून कमी बसेस आहेत, येईलच आता.' बर्‍याच शिवशाही, शिवनेरी (विना कंडक्टर) बसेस, काही एक्सप्रेस एस.टी. न थांबता धुळ उडवीत जात होत्या. ‘आई, सध्या मी रुम घेऊन दोन मित्रांसोबत राहत आहे. कंपनीने मला वर्षभरात नोकरीत कायम केल्यावर छोटा फ्लॅट भाड्याने घेतल्यावर तुला संभाजीनगरला नेईन’. सुभद्राबाई संग्रामच्या रुबाबदार व्यक्तीमत्व व अप्टुडेट पोशाखाकडे अभिमानाने न्याहळत होत्या. त्यांनी मोठ्या मेहनीतीने त्याला शिकवून इंजिनियर केले होते व त्याला आता मोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागली होती. इतक्यात एक जुनाट एस.टी. खडखड आवाज करीत थांबली. संग्राम बस मध्ये चढला. ‘कधी पर्यंत पोंहचशील?’ सुभद्राबाई. ‘आई, काही सांगता येत नाही. बीड वरुन दुसरी बस मिळाली की फोन करतो.' खिडकीतून अर्धवट दिसणारा संग्रामचा चेहरा पाहत हात वर करुन, वळणावर बस दिसेनाशी होईपर्यंत सुभद्राबाई तिथेच थांबल्या. स्वप्नपुर्तीच्या आनंदाने तर काही खिन्न मनाने अशा मिश्र भावनेने त्या घराकडे परत निघाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर मागील काळातील जीवनपटाच्या आठवणी उलगडू लागल्या. ................................................ सुभद्राचे लग्न 15 व्या वर्षीच अशोक बरोबर झाले होते. नवीन घरात प्रवेश करताना पडक्या घराची दुरावस्था, घरातील मोजकीच जुनाट व धान्यांनी अर्धवट भरलेली भांडी, वर पत्र्यातून पावसाळ्यात गळणारे पाणी पाहून सुरुवातीलाच ती निराश झाली होती. पण लगेचच पदर खोचून संसाराला सावरण्यासाठी उभी राहीली. अशोक रात्रंदिवस काबाडकष्ट करीत असे. पण अडीच एकर शेतात पाण्याची सोय नसल्यामुळे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत होते. लहरी निसर्गामुळे कधी पावसा अभावी तयार होत आलेली पिके वाळून जात तर कधी अतीवृष्टीमुळे भुई सपाट होत. एके दिवशी पोस्टमनने सुभद्रेला घरी एक पत्र आणून दिले. तिला वाचता येत नसल्यामुळे तिने पोस्टमनलाच पत्र वाचून दाखविण्याची विनंती केली. ‘बाई, बँकेची नोटीस हाय, चाळीस हजाराची थकबाकी आहे. 30 तारखेपर्यंत भरा म्हणतायेत. नाही तर घर व शेताचा लिलाव करु.' अशोक घरी आल्यावर तिने सांगितले ‘अहो, बँकेची नोटीस आलीया. काही तरी करा की.’ ‘अगं मी आताच सावकाराकडून 10 हजार रुपये घेऊन बँकेचा हप्ता भरुन आलोया. काळजी करु नगस’.
...................................
असेच हालाखीचे दिवस चालले होते. त्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले. संग्रामच्या बाललिलामुळे ती दोघे सर्व दु:ख विसरुन जात. सुभद्राने मनात ठाम विश्‍वास केला होता, काही झाले तरी चालेल पण संग्रामला शिक्षणापासून वंचीत ठेवायचे नाही.
एके दिवशी शेजारचे पठाण घरी येऊन सुभद्रेला म्हणाले, ‘ताई, जरा अशोककडे लक्ष असू दे. जरा विक्षीप्तपणे तुटक तुटक वागतो आहे. निराशेपोटी अभद्र बोलत आहे.'
सुभद्रा काळजीत पडली. काही तरी निमित्त काढून शेताकडे जाऊ लागली. सगळे झोपल्यावर किलकिल्या नजरेने अशोकची अस्वस्थता, घालमेल बघु लागली.
‘झोपाल नव्ह आता. काळजी करु नगा. हे बी दिस जातील या. म्या हाय नव्ह.' असे समजाऊ लागली.
सुभद्रा एकदा गाईला चारा आणायचे निमित्त करुन शेताकडे निघाली. रस्त्यात कॅनॉलच्या पुलावर बरीच गर्दी दिसली. तिने जिवाच्या आकांताने पळत पुढे धाव घेतली व पुढे जाऊन कॅनॉलमध्ये वाकून पाहिले. कोणी तरी नुकतेच जन्मलेले गोर्‍हे पाण्यात सोडून दिले होते. पुढे शेतावर अशोक झाडाखाली न्याहरी करताना पाहून तिने अंबाबाईचे आभार मानले.
एके दिवशी सावकार घरी आला अशोकला अपमानास्पद बोलला. धमकी दिली. ‘माझे थकलेले 25 हजार रुपये दे’. ‘अहो पर म्या दहा हजारच घेतल व्हत.' - अशोक
‘वरचे व्याज काय तुझा बा भरल? तो पर्यंत मी गाय नेतो आहे’- सावकार म्हणाला.
आवडत्या गाईला नेल्यामुळे संग्रामने रडून घर डोक्यावर घेतले. दैनंदिन खर्च भागण्याचा व दुध भाकरी खाण्याचा मार्गही आता बंद झाला होता.
..................................
शेतामध्ये कापसाचे सोने चांगलेच फुलले होते.
‘यंदा पीक चांगल आलया. ह्या वरसी तुला नव लुगडं घेईन’, अशोक आनंदाने सुभद्राला म्हणाला, ‘उद्या टेम्पो भरुन तालुक्याला सरकारी केंद्रावर जातोया.'
दोन दिवस उलटले तरी अशोक घरी परतला नाही म्हणून सुभद्रा काळजीत होती. तिसर्‍या दिवशी परत येऊन नैराश्याने अशोक म्हणाला ‘लाईनमध्ये दोन दीस मुक्काम केल्यावर नंबर आला. ते म्हणाले, कापसाला ओल फार आहे. घेतला नाही. शेवटी व्यापार्‍याला फक्त 3000 रुपये क्विंटलने विकून आलोया. त्यातलेच टेम्पोवाल्याला काही दिले.'
...............................
एके दिवशी पठाण धापा टाकत घरी येऊन म्हणाला, ‘ताई मन घट्ट कर. अशोक आपल्याला सोडून गेला. त्याने शेतात झाडाला फास लटकवून आत्महत्या केली.'
सुभद्राने आक्रोश करीत जमीनीवर हात आपटले. बांगड्यांचा चुरा झाला. लहानगा संग्राम विचारत होता, ‘आई, बाबा कुठे गेले गं?’
दुपारी सुभद्रेचा भाऊ भेटायला आला. त्याने सुभद्रेला सांत्वन करत दहा हजार रुपये देऊ केले. सुभद्रेने अश्रु ढाळत नम्रपणे नकार देत म्हणाली, ‘दादा आता नको. गरज लागल्यास मागते.'
भावाला पक्के माहिती होते की आपली बहीण इतकी स्वाभिमानी आहे की ती कोणाकडेही मदत मागणार नाही. आपल्या बहीणीला ऐन तारुण्यात, वयाच्या 25 व्या वर्षीच वैधव्य आल्याचे त्याला फार वाईट वाटले.
..................................................
सुभद्रा दुसर्‍यांच्या शेतात कामाला जात होती व आपल्या शेताकडेही लक्ष देत होती. तिने संग्रामच्या शिक्षणासाठी काही कमी पडु दिले नाही.
एक दिवस संग्राम म्हणाला, ‘आई आपली साबरखेडाची शाळा पटसंख्येअभावी बंद झाली आहे.'
सुभद्रेने शेजारच्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाडी शाळेत त्याचा प्रवेश घेतला व दोन वर्षे उन्हातान्हात, तर कधी पावसात त्याला सोडायला व घ्यायला ती जायची.
एकदा बिकट प्रसंग आला. रात्री झोपेत संग्राम किंचाळून उठला. त्यामुळे सुभद्रेने कंदीलची वात मोठी करुन पाहिले तो काय? एक मोठा साप सळसळ करुन बाथरुमच्या फटीतून बाहेर निघून गेला. तिने पाहिले की संग्रामच्या पायाला सापाने दंश केला आहे. तिने घाईघाईने घराला कुलुपही न लावता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे अनवाणी धाव घेतली. तिथे कोणीही डॉक्टर, सिस्टर नव्हते. तिथल्या कंपाउंडरने सांगितले की सापाच्या विषावरील उपचाराचे औषध आपल्याकडे नाही. त्यासाठी तालुक्याला जावे लागेल. सुभद्रा जीवाच्या आकांताने त्याला कडेवर घेऊन तालुक्याच्या दिशेला निघाली. पायाचा तो भाग थोडा काळानिळा पडत चालला होता. दवाखान्यात पोंहचेपर्यंत पहाटेचे सहा वाजले. तिथल्या नर्सने सांगितले, 'आमच्याकडील औषधाचा साठा संपला आहे.' इतक्यात पठाणला कोणीतरी सांगितल्यामुळे तोही मोटारसायकलवर तिथे पोहचला.
त्याने सांगितले, ‘बीडच्या सरकारी दवाखान्यातून औषध घेऊन येतो तो पर्यंत ह्याच्यावर काहीतरी प्राथमिक उपचार करा.'
कसेबसे सकाळी नऊ वाजता औषध मिळाले. संग्रामचा जीव वाचला.
परत घरी पोहचल्या नंतर पठाणने सांगितले, ‘ताई, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारची एक लाख रुपयाची मदत मिळते, तो आपला अर्ज नामुंजर झाला आहे. त्यांनी बर्‍याच त्रुटी काढल्या आहेत.'
................................................
संग्रामला एस.टी. मध्ये बसवून घराकडे परत येताना सुभद्राबाई जुन्या आठवणींच्या स्मृतीत गेल्या होत्या. अचानक दवंडीचा आवाज ऐकून त्यांची तंद्री भंगली.
तो दवंडी देत होता, ‘उद्या ग्रामसभेच्या मिटींगमध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहा हो~’. ते ऐकल्यामुळे सुभद्राबाई सकाळी मिटींगला गेल्या.
मिटींगमध्ये गिरीधरपंत म्हणाले, ‘मी सर्वांचे आभार मानतो की आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नवीन मंदीर व बहुउद्देशीय सभाग्रहासाठी सर्वांनी देणग्या दिल्या. एकंदर 13 लाख 25 हजार रुपये रक्कम गोळा झाली आहे. आपण मंदिरासाठी टाईल्स् राजस्थानवरुन मागविणार आहोत’’.
सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. सुभद्राबाई उभे राहून म्हणाल्या, ‘मला असे वाटते, मागच्या उन्हाळ्यामध्ये आपली शाळेकरी विद्यार्थ्यीनी योगीता पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटर जाऊन येऊन, तीन चार चकरा मारल्यामुळे उष्माघाताने मृत्युमुखी पडली होती. आपल्या गावात एक सरकारी विहीर आहे. त्यात झाडे काढल्यामुळे त्याची पडझड होऊन, ढासळून गाळाने भरली आहे. जुने लोक सांगतात की दुष्काळात सुद्धा ती विहीर कधी कोरडी पडत नाही. आपण त्या विहीराचा जिर्णोध्दार करुन, एक नवीन टाकी बसवून, पंप-मोटार व पाईपलाईन करण्यासाठी ह्या पैशाचा उपयोग करुया. आम्हाला घराचा उंबरठा न ओलांडता पाणी मिळाल पायजे. नाहीतरी त्या सभाग्रहात हरीनाम, पठण, किर्तने किंवा खर्चीक लग्नच होणार आहेत’.
सर्वजण अवाक झाले. पण उपस्थित महिलांनी त्यांच्या सुचनेला पाठींबा दिला. सरपंचही महिला असल्यामुळे तसाच ठराव मंजूर करण्यात आला.
उपसरपंच मारोतराव म्हणाले, ‘ठीक आहे पुढच्या आठवड्यात काम सुरु करुया. सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की, सर्वांनी आपापले कुदळ, फावडे, टोपली घेऊन या. श्रमदान करुन लोक सहभागातून हे काम करुया.'
सुभद्राबाईंनी सुचवले, ‘शेतात कामे करुन आम्ही अगोदरच थकतोया. शासनाच्या ‘मनरेगा’ का काय त्या योजनेच्या अंतर्गत ही कामे करुन घ्या की. मजुरांनाही चार पैशे मिळतील’. सर्वांना सुभद्राबाईंचे म्हणणे पटले.
...............................................
एके दिवशी संग्रामला अचानक घरी आलेला पाहून सुभद्राबाई आनंदल्या. संग्रामने सांगितले की बाजारपेठेत मंदी असल्यामुळे, कोरोना काळात बर्‍याच लोकांना नोकरीवरुन कमी करण्यात आले. त्यात त्यालाही नोकरी गमवावी लागली आहे.
त्यांनी संग्रामला समजावले, ‘‘अर, काळजी करुन नगस, दुसरी नोकरी लागल. तोपर्यंत तु मला शेतात मदत कर की.'
संग्राम आईला म्हणाला, ‘आई, बरेच दिवस झालेत, पठाण चाचांना भेटलो नाही. मी त्यांना भेटून आलोच.'
सुभद्राबाई म्हणाल्या, ‘अरे आता काय उपयोग नाही, मागच्या आठवड्यात रात्री पिकाला पाणी द्यायला गेले तवा बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला व फरपटत ओढून नदी किनार्‍यावर सोडले, ते आता नाही राहीलेत.'
ते ऐकून संग्राम सुन्नच झाला.
‘संग्राम, तीन दिवस झालेत अंगात कणकण हाय. खोकला बी येतोय, काही तरी औषध आण मला’.
‘अगं आई, मला अगोदर फोन का नाही केला, असे ह्या काळात अंगावर आजारपण काढू नगस नेहमीसारखे.'
शेवटी भिती होती तेच झाले. त्यांची टेस्ट पॉझीटीव्ह आली. संग्रामने त्यांना तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात हलवले. तिथे बेडस् शिल्लक नसल्यामुळे एका हॉलमध्ये गाद्या टाकून दाटीवाटीने (गैर) सोय करण्यात आली होती.
सुभद्राबाईंची तब्येत खालावत चालली होती. त्यांनी संग्रामला फोनवर क्षीण आवाजात सांगितले, ‘संग्राम, अरे मला जगायच हाय, नातवाचं तोंड पहायचं हाय. ते कुठले रेडीमेडस इंजेक्शन आणून दे न!
संग्रामने खुप धावपळ केली की उपचारामध्ये आईला काही कमी पडु देणार नाही. पण त्याला यश आले नाही व सुभद्राबाईंची प्राणज्योत मालवली. आयुष्यात एकामागून एक येणार्‍या दु:खद प्रसंगाला झेलणारी आणि वारंवार येणार्‍या संकटांच्या आघातांना कष्टाने व जिद्दीने दिलेल्या झुंजीची अखेर हार झाली.
.............................................
पाच वर्षाचा कालावधी उलटला होता. संग्रामने आईच्या इच्छेप्रमाणे खर्चाची उधळपट्टी न करता गावात छोटा मंडप टाकून, सुमीतीशी साधेपणानेच लग्न केले. त्यांच्या घरात नवीन पाहुणीचा, वैशालीचा प्रवेश झाला होता. पडद्यामागे राजकारण झाले होते. गावात भव्यदिव्य मंदिर झाले होते. सुमीतीला अजुनही पाणी आणण्यासाठी दोन किलोमीटर दुर जावे लागत होते. एके दिवशी शेजारचा सय्यद धापा टाकत आला आणि म्हणाला, ‘सुमीतीताई, मन घट्ट करा. संग्राम आपल्याला सोडून गेला. आठवडाभर इलेक्ट्रीशियन न आल्यामुळे डी.पी. चा फ्युज बघण्यासाठी संग्रामने प्रयत्न केला व शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.' सुमीतीने आक्रोश करीत जमीनीवर हात आपटले, बांगड्यांचा चुरा झाला. लहानशी वैशाली विचारत होती, ‘आई, बाबा कुठे गेले गं?’

सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518

ग्रामीण व्यथा
  • Log in or register to post comments
  • 3 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 8 सदस्य उपस्थित आहेत.
  • SatishDeshmukh
  • प्रतीक
  • RANGNATH TALWATKAR
  • admin
  • sandip-7829
  • Manjusha sanja…
  • Rashin@123
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 88 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    37 minutes 27 seconds ago
  • धन्यवाद
    38 minutes 19 seconds ago
  • खूप खूप धन्यवाद
    55 minutes 1 second ago
  • धन्यवाद
    1 hour 2 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    2 hours 30 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
रे नववर्षा 6
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 6
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४) 6
उजेडाचा पाठलाग.. 6
कवितेची जन्मकथा- विठ्ठल वाघ ह्यांची तिफन 6
उद्देश आणि भूमिका 6
त्रैमासिक अंगारमळा : अंक - २ 6
माझा शेतकरी बाप 6
आईचं छप्पर ।।१०।। 6
फास 6
छंदमुक्त कविता- धावपट्टी 5
शहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 5
(ब) छंदमुक्त कविता 5
४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन 5
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 5
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 5
झोपेच्या घाती 5
आता उठवू सारे रान 5
दुःख वावराचे 5
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 5
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,995
कान पकडू नये 25,882
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,748
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,572
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,349
माय मराठी स्तवन git 25,345
एवढा मोठा नांगूर... 25,087
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,073
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,961
कापसाचा उत्पादन खर्च 24,490
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,421
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,030
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,982
शेतकरी पात्रता निकष 23,950
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,948
शेतकरी प्रकाशन 23,934
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,900
हे गणराज्य की धनराज्य? 23,834
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,745
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini