Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




शेतकरी साहित्य संमेलन मला का आवडले

12वें अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन मला का आवडले.

1.अतिशय सुंदर व सुनियोजित संमेलन
2. हॉल व व्यासपीठावरील सुंदर व्यवस्था
3. उत्कृष्ट रांगोळी. ताईचे नाव माहीत नाही
4. अकोल्याच्या तायडे काकांचा भारतमातेच्या सुंदर देखावा
5. अत्युष्कृष्ट भोजन व्यवस्था. मी आयुष्यात जेव्हढी संमेलने बघितली त्या एकातही अशी भोजन व्यवस्था नव्हती. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकदम जैन धर्मीय पद्धतीचे सात्विक जेवण. तारकेश्वर व धर्मगौडा यांचे अभिनंदन.
6. कुंजवनची उत्तम निवास व्यवस्था. स्नानाला गरम पाणी मिळाले. सहसा संमेलनात गरम पाणी मिळत नाही. याबद्दल जैन बांधवांचे विशेष अभिनंदन
7. टापटीपीची वाहन व्यवस्था. याबद्दल आमचे चक्रधर मित्र रोशन, राहुल व भरत ह्यांचे अभिनंदन
8. वर्तकांचा सुगम संगीत कार्यक्रम
9. उत्कृष्ट ग्रंथ दिंडी
10. लेझिम पथकाच्या सुकन्या, कृषी महाविद्यायातील प्राध्यापक, प्राध्यापिका यांचा विद्यार्थी गण यांचे अभिनंदन

शेवटी संमेलन यशस्वी केल्याबद्दल बोरुळकर वकील साहेब, बबन यादव सर, राहुल पाटील सर आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व नावे मला माहित नाहीत. क्षमस्व. ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे आभार
आ. यड्रावकर पाटील साहेब आपले विशेष आभार. लोकाश्रय असल्याशिवाय असे कार्यक्रम होऊच शकत नाहीत.

मुटेभाऊ व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानणार नाही कारण आपल्या माणसांचे आभार मानावयाचे नसतात!
माझे हे पहिलेच शेतकरी संमेलन आहे, तरी यात काही चुकल्यास क्षमस्व.

- किशोर देशमुख, परभणी

Share