Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

आयुष्याची दोरी : कविता ॥३४॥

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 8:43 PM IST, मंगळ March 15, 2011
आयुष्याची दोरी : कविता ॥३४॥
 
हे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो,
कधीही, कुठेही आणि कसेही
आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे
तुझे अधिकार मान्य आहेत आम्हाला
पण सन्मानाने मरण्याचे अधिकार
आम्हालाही असावेत की नाही रे?
 
हे “जीवन” तुझे असले तरी
“आम्ही” तर “आमचे” आहोत ना रे?
 
हे बघ 
तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी
आम्ही मात्र उरणारच आहोत 
आणि म्हणून…
आमची तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी
एक छोटीशी नाराजी मात्र आहेच
 
आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण…
पण असा देहाला का छाटतोस रे?
तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे?
कधी चिंध्या, कधी लगदा,
कधी खाद्य मासोळ्यांचे
आणि कधीकधी तर आरपार
उमटतात छेद गोळ्यांचे
थांबायला नकोत काय हे
प्रताप तुझ्या सापळ्यांचे??
 
हे ऐकून
मृत्यू थोडा भांबावला
मग हळूच हसून म्हणाला
 
“ही तुमची तक्रार की कांगावा?
प्रथम विचार करा की
सल्ला कुणी कोणास सांगावा?
अरे! कृती तुम्ही करता
आणि विकृती माझी म्हणता?"
 
“एक्सलेटर” दाबण्याआधी 
“ब्रेक” मारणे शिका
वेगासोबतची थांबवा 
फालतू अहमिका
ज्याचे हक्क त्याला द्यावे, 
लूट थांबायला हवी
नाहीतर अटळ आहे 
संघर्ष व यादवी
स्वावलंबी झाडावर बहरल्यात 
परावलंबी वेली
परावलंबीने स्वावलंबीची 
काय गत केली?
सभ्यतेची उत्क्रांती दिशाहीन गेली
म्हणूनच मी आता शस्त्रंपालट केली"
 
"अरे माणूस म्हणून जन्मलात
तर माणसावाणी वागा
जरा तरी फुलवून पाहा
सौजन्याच्या बागा……!! ”
 
 - गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
पंधरा/तीन/दोन हजार अकरा
मुक्तछंद
माझी वाङ्मयशेती
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
गंगाधर मुटे
माझी कविता
मार्ग माझा वेगळा
कविता
काव्यधारा
खुप छान.

Malubai

सोमवार, September 5, 2011 - 17:22
Permalink
New

खुप छान.

  • Log in or register to post comments
फेसबूक लिंक

गंगाधर मुटे

मंगळवार, August 30, 2022 - 08:07
Permalink
New

फेसबूक लिंक

https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0EEeJWZiobU7Yn5829mBX…

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 15767 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 5 सदस्य उपस्थित आहेत.
  • Nilesh Turke
  • Rutuja Bane
  • प्रतीक
  • डॉ ज्ञानेश भाऊ…
  • Madhuri_123

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 69 *
Who's new नवीन सदस्य
  • Anand kadam
  • डॉ ज्ञानेश भाऊ…
  • KIRAN PRABHAKA…
  • प्रतीक
  • Rutuja Bane

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप छान अप्रतिम कविता आहे…
    6 hours 31 minutes ago
  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 19 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 19 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 19 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 19 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
वरूणा थांब जरासा 4
मातीतून येणारा शब्दरूपी दरवळ - काळी आई 4
॥सांगा तुकारामा : अभंग॥ 4
पाऊस 4
बळीराजा सुखी केव्हा होणार 4
पीक 4
काळजाची खुळी आस तू 4
भूमी अधिग्रहण कायदा - २०१३ व २०१४ 4
स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका 4
​​​​जिद्द...... 4
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 4
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 4
शेतकरी बाबाची आरती 4
शेतकरी आत्महत्या आणि वास्तव 4
गझल: राजसत्ता 4
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 4
माणसाचा नव्हे साधनांचा विकास - भाग ४ 4
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : वर्ष ६ वे 4
फुलू दे शिवारी 3
रूप सज्जनाचे 3

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,988
कान पकडू नये 25,873
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,742
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,546
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,339
माय मराठी स्तवन git 25,332
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,068
एवढा मोठा नांगूर... 25,061
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,030
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,487
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,410
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,024
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,974
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,943
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,921
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,890
हे गणराज्य की धनराज्य? 23,822
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini