Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



मायचं सपन

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
कथा

*मायचं सपन*
************
'अल्लाह हुsss अकबर अल्लाssssह हु अकबरsss' इंदिरा नगरातल्या झाकटीतल्या अजानच्या सूराईनं शिता आथरनात खळ्कन उठून बसली. 'हुत माय...बुहा-या वानाची झप तं! आज काहून का जनं चेवच नाई आला...माह्या लेकीचा लेक!' आंगावर पांघरलं हुवं लुगळं संगीच्या आंगावर टाकलं.मोकाट केसाईचा जुळा
घालता घालता शिता सोताशीच वटवट करु लागली. 'आता कायचा भेट्टे एखांदा शेनाचा पवटा ?...थे सलमायाची बायको; सकीनी अजानच्याई आगुदर सावळून नेते सगळं शेन...खाय माय शयरात शेनाचीई नवाई ! कार्ल्यात नोतं माय असं!'
"येसोंताsssओ बाबू येसोंताsssउठ बाबू.उठ रे माह्या बापा sss दिवस उजाळून राह्यला. झाकटीत अभ्यास केला की धानात राह्यते म्हंतात. तोंड-मोंड धुय अन् बस अभ्यासाले.उठ बरं बापा." तिच्या पोटाशी झोपेल येसोंताच्या केसाईत हात फिरवत,त्याले चोफलचाफल करत ते त्याले उठऊ लागली.
एवळं चोफलचाफल केल्यावर बाबू,बाप्पा म्हनूनई येसोंतानं 'ऊंsss' म्हनत फक्त कळ फेरला.
"याईले तं झपीनं खाल्लं जसं... झपीत तं याईले कोनं कापून टाकलं तरी चेव याचा नाई! अल्लालठ्ठी कहॉं गयी न् दो रोट्या खा गयी... सट्ट खानं न् सट्ट पसरनं! नेट नाई ना काई जीवाले...ना कोन्या गोठीचा घोर! बायको धावतेच आपली ढोरावानी अन् मानसावानी मानूस हायेस आयत्या बिळात नांगोबा!
येसोंताच्या बाजूनं भितीजोळ झोपेल भिकूवर नजर रोखून शिता आग पाखळू लागली. तसं भिक्यानं तावं तावं आंगावरचं धोतर फक्त थुत्तर दिशीन एवळंच बाजूनं केलं न् आता खाते का ठुते असा डोये-मोये काळून तोंडाचा पट्टा सुरु केल्ला.
"काह्यची व्हय वं तुही भादरकथा दिवसई नाई निंघाला तं? मंगापासून आयकूनच राह्यला मानूस तिची वटवट...आता मुकी राईन, मंग मुकी राईन...चामळ्याचं हाये तं लामतेच लामते थुत्तर...धोतराले अन् पासोळीलेई आवरुन नाई राह्यलं एवळं हिव! अन् त्यात मले उठऊन राह्यली झाकटीतच! कुठी धाळते कायजन कुंदा खंद्याले ! " एवळं तावं-तावं बोलून भिक्यानं धोतर थुतरावर वळ्लं.
'अख्ख्या मुलखातली थंडी तं जशी यायच्याच आंगावर इऊन पळ्ली ! जाग्यावरच गोठून मेल्ले जशे मानसं हिवानं...' कळक हिवायातई भिक्याचा पारा गरम हाये ओयखून शितीनं मनातलाया मनातच वटवट केली.
या कळाचा ताया कळावर इतक्या वारखोळ करनिरा येसोंता आता तळकन् उठला.
इकून-तिकून कोयसा दातावर घासला.दोन-तीन गुयल्या टाकल्या न् बसलाई अभ्यासाले.
शितीनं चूल पोथारली.पराट्याची मूठ लावली. त्यांच्यावर एक जाळं, एक बारीक लाकूळ आल्लादी ठून खालून कागद घळीपुळी करुन अंगारडब्बीची काळी चेतवली. कागदाले उमटी लावली.हिवायात चूल धळधळ चेतली. जसं शितीवानी चुलीलेई सारं गठलं व्हतं. 'येसोंताsss जो-यानं वाचना रे बाबूsss खळखळ वाचलं पाह्यजे,' मंदातच येसोंता जागी हाये का निजला याची तिनं परचिती घेतली.
कालचीच वली गवरी मोळून आंगनात तितक्या झाकुयल्यात सळा टाकला.पान्यात चार बोटं हालव-हुलव करुन शितीनं पानी कोयमट झालं काय ते पाह्यलं. बटलयी घिऊन न्हानीत गेली. भळंभळं आंगावर पानी घेतलं.कसंबसं लुगळं गोयलं. बातच वळ्यायची भाजी केली न् उल्यावर चळवली.
चुलीवर तावा ठुयला न् ताव्यावर अंदन! कोपरात पिठाच्या आव्यात मंधात ते वतलं. सराट्यानं कालवलं. त्याचा डोंगर उजव्या बाजूनं केला. त्याले खसवून त्यात पानी टाकून त्याची तयहातानं मस्त मालीस केली. गोलगुटूंग गोया केला. मंग चाकावानी गोल चकोली. डावा हात खालून न् उजवा हात वरतून दाबत-दाबत मोठी केली.दोन्ही तयहातानं दाबत-दाबत एकसारखी पतली भाकर रांधली.एक, दोन,तीन,चार,पाच...भरंभरं भाकरी रांधल्या.बोटानं वळ्या दाबून पाह्यल्या,तेई शिजल्या व्हत्या.
आता भिक्याई उठला व्हता.कोयश्यानं दात घाशाले बाहीर तापाजोळ गेला.तवलीत पानी घिवून वक-या काळ्याले लागला.तसं शितीनं बकरी दोयली.च्या मांडला.
'अsssय, काई सकाय काळजा.च्या शिजला.गायतो.बाबूsss त्या डब्ब्यातली डबऱरोटी घे.तुयासाठी लावून ठुयली व्हती."
तिनं येसोंताले बोटानं डब्बा दाखोला. येसोंता च्या-डबऱरोटी खाल्ली.शितीनं च्या बशीत वतला.गटागटा गिटकला. भिक्यानंई च्या घेतला.
शितीनं तीचं लुगळं घास-पिव केलं. चुलीजोळचे सब्बन भांडे-कुंडे बाहीर नेले. घास-घूस करुन आनून ठुयले. चुलीजोळचं सप्पा केलं.काचाच्या कोरात पाऊन एकाच हातानं मोळ बराबर केली. बोटायनंच केसं दोन बाजूनं केले.कपायावर ठसठशीत कुकू लावलं.संगीले उठोलं... तिचा शेंबूळ दोन बोटाच्या चिमटीत घिऊन भितीले पुसला.नाक पदराले पुसलं.
आठक वाजले असतीन.फळक्यात भाकर न् भाकरीवर भाजी,त्याच्यावर एक उबळी भाकर ठुयली. शिदोरी बांधता-बांधता नव-याले सांग्याले लागली.
"अsssय, कामाले तं तुमी जात नाईच;घर सोळून कुठीसा जाऊ नोका.संगीले पाह्यजा.तिले मीठ लावून भाकरगिकर देजा.निजू घालजा पायन्यात. नाई तं
तुमचं हायेच ते शेवकराम मामाजीसंगं आकळे लावनं.एक नं दोन अन् दोन नं चार! अन् आकळा लागला की तेवळ्याई रुपयाची आन्ता आंगात!" यावक्ती भिक्यानं मुक्यानंच आयकून घेतलं. जसा दिवसभरातला त्याच्या मनातलाच टाईमटेबल सांगतला.
"बाबू sss जेऊन जाजो रे शाळेत.घरी राऊ-गीऊ नोको बाप्पा! जीव लाऊन अभ्यास कर." ते वावरात जायाले निंघेलोक येसोंताले काईना काई सांगतच व्हती.वठ्ठीनबुडी दिसली तशी शितीनं टायवरी पायात सरकोली. जनी मांगीनई आली. तिघीई रामेसोर पाटलाच्या गोंदनच्या वावरात जायाले निंघाल्या.
"बिचारे! साहामाई परीक्षेत येसोंताचा पह्यला नंबर आला ना. काल त्यानं सांगतलं तवा त्याले कुठी ठिऊ न् कुठी नाई...असं झाल्तं मले.इतका हरीक आल्ता की काय सांगू तुले ! त्याले पोटाशी धरुन म्या पटापट मुकेच घेतले नि-हा.बरं का वंsss,तुवा मानक्या जाते शाळेत रोज?" शितीनं जनीले इचारलं.
"नाई ना बिचारेsss शिताsss शाळेत जायाच्या नावानं तं त्याले काटेच येतात! तो सुदा भावजीचा गोल्या...तो रामकुस्ना टेलरचा पिंट्या...चिचिखालचा 'डोम्या' या पोट्ट्यायची टोयच हाये ना!...दिवसभर थे गोया,गिल्लीदांडू, आबादुबी, आंब्याच्या गुठल्या अन् काय पुसतं?...मी तं बेज्जा हैरान झाली. मारल्यानंई आईकत नाई बिचारे...आजून जब्बरपना करते.नि-हा वाया गेला त्या पोट्ट्यायसंगं! कसं व्हईन तं होवो माय! देवानं देवाव तं सुदी देवाव माय जनपत! नि-हा जीवाले घोर!" जनी सारा वैताग एका सासात बोलून मोकयी झाली.
"मारुगिरु नोय लेकराले...त्यानं उलटं बारबंड व्हते लेकरु" शितीनं समजावलं. गोठीमाठीत वावर आलं.
सयसंध्याकाय झाली.पाचची अजान झाली.बायायनं उरकतं घेतलं.सगळ्यायचे पावलं घरच्या दिशेनं झपंझपं पळू लागले.
"काय माहित बुहारा मानूस...घरी व्हता की गेला व्हता मूत पियाले? पळ्ला की काय कोन्या सांदीबेब्टीत?" आता शितीले घरचे इचार सताऊ लागले.
शितीनं ताटी उघळ्ली तं येसोंता न् संगी खिऊन राह्यले व्हते.भिक्या कुठी दिसला नाई तिले.पायातली टायवरी फेकली.दोन तीन डब्बे पानी पायावर वतलं. तोंडाऊन हात फिरवला.दोन गुयल्या टाकल्या घाईघाईत.संगीले जोळ घिऊन चोफलचाफल करता करता येसोंताले इचारलं,"तुवा बाप नाई दिसून राह्यला कुठी?" येसोंता काईच बोल्ला नाई.
"बाबूsss,आला माय शाळेतून?" आता तिनं सरकंच इचारलं.येसोंतानं मान खाली घातली. तेवळ्यात भिक्या पुळून येताखेपी दिसला.पुरा रस्ता त्याच्याच बापानं खरेदी केला जसा अन् त्याच्याच मालकीचा हाये असा झोकांड्या खात घरी येऊन राह्यला व्हता.शितीले हे सगळं तं जसं सकिऊनच समजलं होतं.आता आपली माय आपल्याले कितिक मारतेन् कितिक नाई या इचारानं येसोंता थर्र भेला.
भिक्या ताटी लोटून अंदर आला.तसं शितीनं पोट्टीले खाली ठुयलं.कंबरीले शेव खोसला.
भिक्या ताटी लोटून अंदर आला.तसं शितीनं पोट्टीले खाली ठुयलं.कंबरीले शेव खोसला.
"निंघा माया घरातून!...चालते व्हा!...अर्धी उम्मर झाली तरी कवळीची अक्कल नाई आली अजून! गेलेच व्हते मूत पियाले...तिकळेच राहाव लागत व्हतं...'हे' पैदाच केले फक्त...तेवळाच कोचम आला!... माह्या जिंदगीचं तं मातेरं झालं तुमच्यापायी; पन मी लेकरायचं तसं होऊ देनार नाई...आजपासून तुमी मेले आमाले! मानसावानी धावीन तरी माह्या लेकराईले शिकवीन"
शिती कंठातला लळू गिवत व्हती...
तिच्या डोयातल्या धारा थांब्याचं नाव घेत नोत्या. तिनं येसोंताले पोटाशी धरलं. त्याच्यापुळे मेट्यावर बसली.
" मी जिती हावो तवरोक तुह्या जिंदगीची बरबादी होऊ देनार नाई...सकायपासून संगीले मी वावरात नेतो माह्यासंगं; पन त्वा शाळेत जायाचं.लय शिक.लय लय शिक.शिकून लय मोठ्ठा व्हय बाप्पा...तुह्या बापाच्या खानोटीवर नोको जाऊ.बाबासाह्यबावानी लय शिक माह्या बाप्पा...लय शिक..." येसोंचा चेहरा आपल्या आंजोयीत धरुन ते सांगत राह्यली.तिच्या डोयात येसोंताले मोठ्ठं सपन दिसलं व्हतं.ते असं वाहून जाऊ द्यायचं नाई असं त्यानं त्याच दिवशी मनाशी ठरोलं...
"टीऱरींग टीऱरींग..."
फोनच्या खनखनाटानं खुर्चीवर डोये लावून बसलेला येसोंता खळ्कन वर्तमानात आला.
"हैलोsss कलेक्टरसाहेब...इपल्या तुच्छ बहिणीची आठवण येते की नाही समाजकल्याण करताना?"
"तुच्छ इन्कम ट्याक्स अॉफिसर संगीता भिकाजी माने!...आय वील सी यू सून.ये चपटे..." दोन्ही बाजूनं फोनवर लयवारखोळ हाश्याचं उधाण आलं!
..
मायचं सपन, आता सपन राह्यलं नोतं!

-संघमित्रा खंडारे
साई नगर,दर्यापूर
४४४८०३

Share

प्रतिक्रिया