Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

छंदमुक्त काव्य

Main page content

झुंज

By Gauspasha Shaikh | 10:28 PM IST, मंगळ November 17, 2026
छंदमुक्त कविता

मोडीला असा अर्ध्यात जरी डाव तुम्ही
उरलेली बाजी मी मातर खेळणार हाय,
झुंजलात भर ज्वानीत मरणाशी तुम्ही
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय

रातीच्या अंधारात जर चिमणी विझली
बंद दाराआड बी मनात भीती रुजली,
भूत बीत चोर बीर काई नसतंय म्हणत
लेकराईला घट्ट आवळून झोपणार हाय...
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय

  गोठ्यातली गुरं जरी हंबरू हंबरू पुसली
  धन्याची हसरी काया काऊन नाई दिसली,
  बाजारा गेला अन घराला इसरला म्हणत
  आसवं पुसून लटकंच रागावणार हाय...
  धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय

नांगरणी वखरणी कापणी समदं करीन
काळ्या शिवारी बैलासंग बैलावानी राबीन,
दुष्काळ हामच्या पाचवीलाच पूजला म्हणत
वावराची दुबार पेरणी पण करणार हाय...
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय

पोरा पोरीचं शिक्षण लगीन समदं करीन
मायच्या दवेखान्यासाठी पय पय जुळविन,
माझ्याशिवाय आता कोण करणार म्हणत
घरावरची खापरं बी मीच फेरणार हाय...
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय

दिवाळीत पोरं रुसतील का कापडासाठी
हट्ट करून बसतील का गोड जेवणासाठी,
मनाच्या वाकळीला संयमाचं ठिगळ लावत
ईचाराच्या इंगळीची इजा सोसणार हाय...
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय

बारा गावचं प्यायली पाणी जरी लेकरं
शिकूनसनी झाली लई शानी जरी लेकरं,
आत्महत्या पाप असती पोरांनो म्हणत
आयुष्याचा धडा त्यांना शिकविणार हाय..
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय

ग्रामीण
शेतकरी
महिला
संघर्ष
मराठी कविता
छंदमुक्त काव्य
झुंज
  • Read more about झुंज
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 23 views

प्रतिसाद (1)

अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना!

डॉ. मीरा पंडित

बुधवार, November 18, 2026 - 20:21
Permalink
New

अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना! पतीच्या अकाली निधनानंतरही खचून न जाता, आपल्या कुटुंबासाठी आणि लेकरांसाठी जिद्दीने उभ्या राहणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीच्या अदम्य इच्छाशक्तीचे या कवितेत अत्यंत प्रभावी दर्शन घडते.
अस्सल मातीचा सुगंध असलेली ग्रामीण बोलीभाषा आणि 'धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय' ही काळजाचा ठाव घेणारी ओळ या कवितेचा खरा आत्मा आहे. रात्रीच्या अंधारातील भीतीवर मात करणे असो, गोठ्यातील मुक्या जनावरांची लटक्या रागाने समजूत घालणे असो, किंवा दुष्काळाच्या संकटातही दुबार पेरणी करण्याचे धैर्य असो; या प्रत्येक कडव्यातून कवीने एका सोशिक पण तितक्याच खंबीर स्त्रीचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे केले आहे.
कवितेतील 'मनाच्या वाकळीला संयमाचं ठिगळ लावत' यांसारख्या उपमा थेट मनाला स्पर्श करतात आणि कवीच्या संवेदनशील प्रतिभेची साक्ष देतात. शेवटच्या कडव्यातून दिलेला 'आत्महत्या हे पाप असून संकटाशी लढूनच जगायचे असते' हा संदेश संपूर्ण समाजाला जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा देणारा आहे. या अत्यंत जिवंत, संवेदनशील आणि प्रेरणादायी कलाकृतीबद्दल कवीचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप कौतुक!

  • Log in or register to post comments
Subscribe to छंदमुक्त काव्य

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 69 *
Who's new नवीन सदस्य
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam
  • डॉ ज्ञानेश भाऊ…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • प्लास्टिकच्या पिशव्यांवर…
    1 hour 28 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 hour 29 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 hour 40 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    14 hours 46 minutes ago
  • (विषय दिलेला नाही)
    14 hours 54 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 69
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 24
किती चाटणार भारतपुत्रा? 21
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 21
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 19
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 19
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 19
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 17
कापला रेशमाच्या सुताने गळा 15
किसान क्रांती 8
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 6
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 4
महा गड्या ! महा रड्या !! 4
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 4
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 3
माझा शेतकरी देव...! 3
माझे फेसबूक स्टेटस - 2 3
माझे फेसबूक स्टेटस-1 3
आधुनिक वामन आणि आधुनिक बळीराजा 3
मराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह 3

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,991
माझे फेसबूक स्टेटस-1 180,919
शुभारंभ 134,903
रानमेवा - भूमिका 109,385
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,386
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,289
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,534
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,776
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,577
उद्देश आणि भूमिका 77,437
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,458
विचारपूस 71,700
गणपतीची आरती ॥३५॥ 67,713
सत्कार समारंभ : वर्धा 66,725
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,289
किती चाटणार भारतपुत्रा? 61,557
जात्यावरची गाणी 56,000
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,397
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,037
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,345

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini