Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***माझे फेसबूक स्टेटस

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 15/01/2015 - 19:36. वाजता प्रकाशित केले.

  Negative Subsidy

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 15/01/2015 - 19:37. वाजता प्रकाशित केले.

  http://www.youtube.com/attribution_link?a=XJ3k9OVY7Yw&u=%2Fwatch%3Fv%3Dp...

  अत्यंत दिशाभूल करणारी बातमी.
  इतका गणीताचा लवलेश नसलेला बेहिशेबी मनुश्य कदाचित हजार वर्षापूर्वी सुद्धा अस्तित्वात नसेल.
  जंगली अवस्थेतला किंवा आदिमानवच इतका निर्बुद्ध बेहिशेबी असू शकतो.
  म्हणे ८ एकराचा उत्पादन खर्च पन्नास हजार फ़क्त आणि साडेचार लाखाचा निव्वळ नफ़ा...!
  कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना ते यालाच!! 

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 15/01/2015 - 19:41. वाजता प्रकाशित केले.

  "तीळ गूळ घ्या आणि गोडगोड बोला!"

  च्यायला! गोड बोलण्याच्या बदल्यात फ़ुकटात वाटायला तीळ आणि गूळच म्हणजे शेतमालच सापडतो व्हय?
  डिझेल, पेट्रोल, रॉकेल, टीव्ही, कॅमेरा, मोबाईल, चप्पल, शूज, टेबल, पंखा, घड्याळ, एसी, कूलर, बाईक, पुस्तके, सिलिंडर या पैकी संक्रांतीनिमित्त कुणीतरी फ़ुकटात वाटायला घेऊन या हो आमच्याकडे. बदल्यात आम्ही पण तुमच्याशी गोडगोड बोलू.  Smile

  मी ठरवलंय. संक्रातीला तीळगूळ घ्यायचा नाही आणि संक्रांती संपल्याशिवाय गोड तर अजिबातच बोलायचं नाही!!

  - गंगाधर मुटे
  ------------------------------------------------------------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 17/01/2015 - 04:06. वाजता प्रकाशित केले.

  Buldana

       आज कवी संमेलनात भाग घेण्यासाठी बुलडाण्याला जात आहे.

    वर्धेत गझलरंगचा गझलमुशायरा कार्यक्रम होतो आहे, हे आजच कळले. आधी कळले असते तर मी बुलडाण्याच्या कवी संमेलनाचे निमंत्रण स्विकारले नसते. इथेच वर्धेला गझल ऐकण्याचा आनंद लुटता आला असता. काव्याचा आनंद घेण्यासाठी ५०० किमी जायची गरज नव्हती.

       आता पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे वर्धेत उपस्थित राहून दिग्गज गझलकारांच्या गझलेचा आनंद घेता येणार नाही याची खंत वाटत आहे.

       १७ जानेवारी हा फ़ारच भाग्यवान दिवस दिसतो. या दिवसाला असे काय ऐतिहासिक महत्व आहे माहीत नाही पण आज एकाच दिवशी जालना, बुलढाना, उमरखेड येथे साहित्य संमेलने तर डोंबीवली आणि वर्धा येथे गझलमुशायरा आहे. कदाचित ही यादी यापेक्षाही मोठी असू शकेल.

  साहित्यिकांना फ़ारच चांगले सोन्याचे दिवस येत आहे असे दिसते.

         मात्र यातून मराठी साहित्याला चांगले दिवस येतील की त्याऐवजी साहित्यिकांच्या कळपांच्या संख्येत वाढ होईल, हे सांगणे कठीण आहे. मी या क्षेत्रात नवीन आहे. अजून अभ्यास व्हायचा आहे व अनुभव यायचा आहे, त्यामुळे सध्यातरी माझ्यासाठी या प्रकारावर भाष्य करणे कठीण आहे.

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 20/01/2015 - 18:41. वाजता प्रकाशित केले.

  चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू होत असल्याची बातमी वेदनादायी आहे. वर्ध्याच्या पाठोपाठ आता चंद्रपूरचा नंबर लागला आहे.

  हा निर्णय अत्यंत अविवेकी आणि भित्रेपणाचा आहे. मी शासनाचा निषेधच नव्हे तर धिक्कार करत आहे......!!

  वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेनेच असे कोणते पाप केले आहे की केवळ त्यांनाच ही सजा दिली जात आहे? मी कधीही मद्यपान करत नाही पण इतरांची/माझ्या शेजार्‍यांची निष्कारण होत असलेली गळचेपी बघून मी असूरी आनंद मिळवू शकत नाही.

  दारू जर वाईट असेल तर पूर्ण देशात दारुबंदी लागू करण्याचे धाडस दाखवावे. कोणतेही शासन भित्रेच असते आणि संपूर्ण देशात दारुबंदी करण्याचा निर्णय घेण्याची कोणत्याच शासनाची ऐपत नसते म्हणून असे बौध्दीक दिवाळखोरी प्रदर्शित करणारे निर्णय शासनाकडून घेतले जातात,

  देशात शासनाकडून सर्वांना वागणूक समानच मिळाली पाहिजे. केवळ त्या जिल्ह्यात थोर पुरुष जन्माला आले किंवा वास्तव्य होते, या कारणासाठी त्या जिल्ह्यापुरता निर्णय घेण्याचे काहीही औचित्य तर नाहीच उलट त्या महापुरुषांना संकुचित भौगोलिक प्रदेशात बंदिस्त करून ठेवण्यासारखे आहे.

  ज्यांना स्वत: दारु पिणे आणि दुसरा पितांना पाहणे जर आवडत नसेल तर पूर्ण देशात दारुबंदी करण्याची त्यांनी मागणी केली पाहिजे. पण जर अशा दारुबंदी समर्थकांची दारुबंदीची भाषा जर केवळ विशिष्ट भौगोलिक प्रदेशाकरिता असेल तर अशा सर्व "पोटदुख्या" व "जळकुकड्यां"साठी एक वेगळा "दारुमुक्त" जिल्हा निर्माण केला जावा आणि त्यांचे त्या जिल्ह्यात सरकारी खर्चाने सन्मानजनक स्थलांतरण व पुनर्वसन केले जावे, अशी मी एक नवी मागणी करत आहे. Wink

                                                                                                                                 - गंगाधर मुटे
  ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
   

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 24/01/2015 - 20:03. वाजता प्रकाशित केले.

  १९८० पासून शेतीक्शेत्रात काही अत्यंत क्रांतीकारी बदल झाले आहेत. काही बाबतीत उलटापालट झाली आहे.
  उदा.
  भारतात मनुष्य
  पुरुषांमध्ये सर्वात जास्त कष्ट करणारा शेतकरी पुरुष
  महिलांमध्ये सर्वात जास्त कष्ट करणारी शेतकरी महिला
  हेच उरले आहेत.
  तर
  प्राण्यामध्ये सर्वात जास्त कष्ट वाट्यास येणारा शेतीतला बैल हाच प्राणी आहे.
  अनेक कारणामुळे इतरांचे कष्ट कमी झाले आहेत.
  हे खरे आहे का? तुम्हाला काय वाटते? 

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 24/01/2015 - 20:12. वाजता प्रकाशित केले.

  प्राण्यामध्ये जास्त कष्ट करतो बैल
  अन्न पिकवतो बैल
  मरमरमरतो बैल
  आणि
  कौतुक व पूजा होते गाईची
  .
  .
  .
  उलटी गंगा वाहे, पूर आकाशी आला
  एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला
  से संत एकनाथ महाराजांनी भारुडात भविष्यकथन करून ठेवले आहे.


  ते या संदर्भात सुद्धा लागू पडते काय हो!  Smile

  ----------------------------------------------
  २२/०२/२०१५ ची फेसबूक पोस्ट

  वर्ल्ड कप लोणच्या सारखाच असतो.

  माणसाची पहिली भूक अन्नाची असते. ज्यांच्या आयुष्यात अन्नाची भ्रांत हा शब्दच नसतो व अन्नाची समस्या ही समस्याच राहिलेली नसते तेव्हा अशा माणसांना अन्नाव्यतिरिक्त अनेक तर्‍हेच्या भूका लागायला लागतात.

  मग स्वत:चे अन्य चोचले पुर्ण करून घेताना वर्ल्ड कपचा देखील लोणच्या सारखाच उपयोग होतो.
  अन्नाची अजिबात भ्रांत नसलेले चिक्कार लोक ग्रामिण भागात सुद्धा आहे. मी गेल्या ३० वर्षापासून क्रिकेट पाहतच आहे. हा खेळ माझ्या आवडीचा आहे.

  ज्यांची अन्नाची समस्या सुटलेली नाही ते कोणताच खेळ पाहात नाहीत, हे दुर्दैव आहे.
  मी खेळाचा विरोधक नाही, समर्थकच आहे. पण सामाजिक वास्तव आहेच तसे त्याला पर्याय नाही.
  खेळाने उर्जा मिळते. खेळ बघण्याने उत्साह येतो व आनंद मिळतो. पण ही उर्जा फ़क्त काही टक्के लोकांच्याच वाट्याला येते, ही दु:खद बाब आहे.

  सर्वांची म्हणजे १०० टक्के लोकांची अन्नाची भ्रांत मिटावी व तमाम जनतेला खेळातून उर्जा मिळवण्याइतपत उसंत मिळावी, अशी अपेक्षा आहे.
  -----------------------------------
  ०६/०३/२०१५ ची फेसबूक पोस्ट

  हिरव्यांना हिरव्या रंगाच्या
  निळ्यांना निळ्या रंगाच्या
  भगव्यांना भगव्या रंगाच्या
  गुलाबी हृदयांना
  गुलाबी रंगाच्या
  महाभयंकर शुभेच्छा.!!
  * * *
  बाकी उरलेल्यांना
  तिरंगी व सप्तरंगी
  मनपूर्वक शुभेच्छा..!!
  - गंगाधर मुटे
  ----------------------------------------
  बुरा ना मानो होली है!
  ----------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 30/01/2015 - 23:49. वाजता प्रकाशित केले.

  विदर्भ राज्य आंदोलन समितीची जनजागरण यात्रा

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 08/03/2015 - 23:24. वाजता प्रकाशित केले.

  Punynagari

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 09/03/2015 - 13:29. वाजता प्रकाशित केले.

  गोवंश हत्त्या

  * * *

  गोवंश हत्याबंदी कायदा म्हणजे शेतकर्‍यावरची ’साडेसाती’

  केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला आणि नव्या सरकारांनी एकापाठोपाठ एक शेतकरीविरोधी धोरणांची अंमलबजावणी सुरू केली. कांदा आणि बटाट्याला जीवनावश्यक वस्तू यादीत घातले, शेतकर्‍यांना आयुष्यातून उठवून देशोधडीस लावण्याची विकृत क्षमता असलेला भुसंपादन व अधिग्रहण कायदा दुरुस्ती केली आणि त्याच सोबत तब्बल १९ वर्षांपासून रखडलेल्या गोवंश हत्या बंदी लागू करून शेतकर्‍याला पूर्णत: नागडे करण्याचा चंगच बांधलेला दिसत असल्याने मोदी सरकार म्हणजे शेतकर्‍यांसाठी ’साडेसाती’ ठरू पाहत आहे.

  गाय, बैल वा या प्रजातीतील गुरे आजारी किंवा वृद्ध झाल्याचे कारण करून कत्तल करण्यासाठी विकणाऱ्यांना व विकत घेणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. याशिवाय गोवंश हत्या करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे त्यामुळे आधीच आर्थिकस्थितीने घायकुतीस आलेल्या शेतकर्‍यांनी लेकराला चड्डी घेतली नाहीतरी चालेल पण भाकड जनावरांना पोसण्याचे व सांभाळण्याचे काम करावेच लागणार आहे. शहरी धर्ममार्तंडांनी गोपूजनाच्या गोलमाल गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकर्‍याने घ्यायचे अशी व्यवस्था निर्माण होणार आहे.

  गोवंश हत्या बंदी कायदा चांगला कि वाईट यापेक्षा शेतकर्‍यावर आणखी फ़ालतू खर्चाचा बोझा वाढणार आहे, हेच शेतकर्‍यांचे मुख्य दुखणे ठरणार आहे.

  भाकड जनावरे पोसण्याचा भुर्दंड शेतकर्‍यावर पडू नये म्हणून सरकारने खालीलप्रमाणे तातडीने निर्णय घ्यावे;

  १) सर्व भाकड जनावरे शेतकर्‍याकडून बाजारभावाने खरेदी करण्याची व्यवस्था करून गोप्रेमींकडे पालन-पोषण करण्यासाठी सुपूर्द करावीत.

  २) भाकड जनावरांची शिरगीनती करून भाकड जनावरांना ’पेन्शन’ योजना सुरू करावी. तसे केल्यास भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड शेतकर्‍यावर पडणार नाही.

  सरकारने काहीही उपाययोजना न केल्यास शेतकरी भाकड जनावरे मोकाट सोडून देतील. या मोकाट जनावरांचा उपद्रव शेतशिवारासोबतच नागरी वस्तींनाही होईल. अशा मोकाट जनावरांची चारापाण्याची व्यवस्था न झाल्यास या जनावरांचे अन्नावाचून कुपोषण होऊन ते अल्पावधीच मृत्यूमुखी पडतील. किंवा अशी मोकाट जनावरे चोरूनलपून कत्तलखाण्यात पोचतील व कसाबांचा धंदा आणखी तेजीत येईल.

  योग्य उपाययोजना न झाल्यास हा गोवंश हत्या बंदी कायदा म्हणजे शेतकर्‍यासाठी आणि गोवंशासाठी ’साडेसाती’ ठरणार आहे, हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

  - गंगाधर मुटे
  -----------------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 31/03/2015 - 23:39. वाजता प्रकाशित केले.

  विज्ञान -अध्यात्म, जुनं - नवं, सनातनी - पुरोगामी, ज्ञानी - अज्ञानी, श्रद्धा - अंधश्रद्धा, डावा - उजवा अशा अथवा तत्सम अशा तर्‍हेच्या कोणत्याही भेदाभेदात मी स्वत:ला गुरफ़टून घेत नाही.

  स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी उपयोगाचे असेल ते सारेच मला हवेहवेसे असते. Wink Smile Bigsmile

  - गंगाधर मुटे

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 02/04/2015 - 13:40. वाजता प्रकाशित केले.

  गजलगंधर्व सुधाकर कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या नव्या गजल अल्बमची ही नवी टीम.

  Album

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 09/04/2015 - 22:22. वाजता प्रकाशित केले.

  गारपिटीच्या अंगसंगाने गर्भपातल्या रानी
  अश्रू होऊन हवेत विरले पाटामधले पाणी

  - गंगाधर मुटे ’’अभय”
  ==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=

  Garpith

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 09/04/2015 - 22:27. वाजता प्रकाशित केले.

  किसी इन्सान को
  रोटी खिलाकर
  आप एक दिन के
  लिए उसका पेट
  भर देंगे!

  उसी इन्सान को
  रोटी कमाने का तरिका
  बताने के लिये
  आप लंबा चौडा भाषण भी
  ठोक देंगे!

  लेकिन....

  अगर वह कोई काम
  करता है, तो उसका उचित
  मुबावजा देना आप कतई
  स्विकार नही करोगे..!
  आपको उसका पसिना
  सस्ते मे चाहिये...!!
  चाहे वह भुखा मरे
  या
  सुसाईड करे....!!!

  है ना? जरा अपने गिरेबानमे झांककर
  तो देखिये भाईसाब,
  कही मै गलत तो नही लिख बैठा??

  - गंगाधर मुटे
  ----------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 09/04/2015 - 22:34. वाजता प्रकाशित केले.

  Mushayara

  Mushayara

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 09/04/2015 - 22:38. वाजता प्रकाशित केले.

  modi
  --------------------------------------------
  अरे, ह्या मोदीभाऊला कोणी तरी सांगा रे की
  * शेतकर्‍यांना सक्षम करणे बॅंकाच्या हातात नाही.
  * बॅंका वाढीव वित्तपुरवठा करू शकतात; व्यवसाय फ़ायद्याचा करणे बॅंकांच्या हातात नाही.
  * मात्र बॅंका सक्तीची कर्जवसूली करून शेतकर्‍यांना देशोधडीस लावू शकतात.
  * बॅंका कर्जवसूली करताना शेतकर्‍यास अपमानास्पद वागणूक देवून शेतकर्‍यांना आत्महत्तेस बाध्य करू शकतात.
  * वित्तपुरवठा वाढल्याने नैसर्गीक आपत्ती न आल्यास उत्पादन वाढू शकते पण उत्पन्न वाढेल याची खात्री नसते.
  * शेतकरी मुळत: उत्पादक आहे. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी भरपूर शक्यता असल्याने व उत्पादन वाढीसाठी जीवाचा आटापिटा करणारी जनुके त्याच्या रक्तात जन्मजातच असल्याने तो मिळेल तेवढे कर्ज काढण्यास कायमच उत्सूक असतो. पण जर शेतमालाचे भाव गडगडले तर "स्मशानघाट दूर नसतो"
  * शेतकर्‍यांना सक्षम करणे न करणे, हा विषय केवळ, फ़क्त आणि फ़क्त शासनाच्याच अखत्यारीत येतो.
  अरे, जारे कुणी तरी! आणि समजावून सांगा जरा त्या मोदीभाऊला ....!!

  - गंगाधर मुटे
  --------------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 09/04/2015 - 22:45. वाजता प्रकाशित केले.

  मुंबई येथून प्रकाशित होणार्‍या उर्दू टाइम्स दैनिकात रविवारी माझा अनुवादित लेख प्रकाशित झाला आहे. माझ्या लेखाचा अनुवाद प्रा. डॉ. ज़िया ताजी यांनी केला आहे.
  माझा लेख उर्दूमध्ये अनुवादित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने याला विशेष महत्व आहे.
  धन्यवाद प्रा. डॉ. ज़िया ताजी साहेब!

  urdu

  urdu

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 11/04/2015 - 20:45. वाजता प्रकाशित केले.

  मी RCC च्या घरात दुसर्‍या मजल्यावर निवांत बसलेलो आहे.

  बाहेर वादळाने असामान्य वर्तणूक सुरू केलेली आहे.

  गराडाने गरुडझेप घेत गडबड सुरू केलेली आहे.

  हवा गार वाटत आहे कदाचित गारपिठीचे आगमन होऊ शकते.

  पण;

  मी निश्चिंत आहे. असले किरकोळ बदल RCC च्या घराला धक्का लावू शकत नाही अर्थात माझे फ़ारसे वाकडे होण्याची शक्यता नाही.

  मात्र;

  ज्यांची घरे RCC ची नाहीत त्यांचे काही खरे नाही. त्यांची घरटी उध्वस्त होऊ शकतात. आयुष्य देशोधडीला लागू शकते.

  तात्पर्य एकच;

  याला निसर्गाचा कोप म्हणणे चक्क मुर्खपणा आहे. हा केवळ "RCC चे घर असणे किंवा नसणे" एवढाच फ़रक आहे. दोष निसर्गाचा नसून मानवनिर्मित सुल्तानी व्यवस्थेचा आहे.

  जर काही उद्या अघटीत घडलेच तर इतरांची घरे RCC ची व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्चाचा प्रयत्न करेन. त्यासाठी एकमेव उपलब्ध असलेला पर्याय "शेतमालाला रास्त भाव" हा लढा लढण्यासाठी आणखी जोमाने स्वतःला राजी करेन.

  उगाच त्यांचेप्रती निष्कारण कणव दाखवून आसू ढाळत बसणार नाही.

  त्यांच्यासाठी धोतर, लुगडे, धोंगडे वगैरे देण्याचे किंवा तत्सम कोणतेही प्रकार करणार नाही, कारण मला "थोर पुरुष" बनायचे नाही अथवा पद्मश्री मिळवायची नाही.

  - गंगाधर मुटे
  ---------------------------------------------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 23/04/2015 - 19:50. वाजता प्रकाशित केले.

  Facebook

  शेतकरी तितुका एक एक!

 • admin's picture
  admin
  रवी, 10/05/2015 - 11:20. वाजता प्रकाशित केले.

  आजच्या लोकसत्तेत रानमेवा प्रकाशन सोहळ्याचा फ़ोटो.

  Loksatta

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 16/05/2015 - 21:54. वाजता प्रकाशित केले.

  विषय वैविध्याचा विचार करता आजची गझल खूप दर्जेदार आहे. गंगाधर मुटे नावाचे विदर्भातील कवी गझल सारख्या विलक्षण काव्य प्रकारातून शेती, शेतकरी, त्यांचे प्रश्न, शेतकर्‍यांचे शोषण, शासकीय धोरण असे विषय सातत्याने लिहून गझल या प्रकाराची वेगळीच ओळख निर्माण करताहेत. फक्त शेती आणि शेतकरी हा विषय किती वेगळ्या प्रकारे गझलेतून मांडता येतो हे गंगाधर मुटे यांची गझल वाचल्यावर कळते.
  ***********
  (दिनांक १० मे २०१५ च्या अग्रोवनने पान १३ वर प्रकाशित झालेली कमलाकर आत्माराम देसले यांची मुलाखत )

  नव्या जगातला खरा कुबेर शेतकरी असायला हवा.

  1) आपला लेखन प्रवास...

  मी कुणब्याचा मुलगा . माझे वडील आत्माराम (बाबा) डोंगर देसले हे शेतकरी. झोडगे ता. मालेगाव ( नाशिक) हे आमचे गाव . आमच्याकडे चारपाच एकर शेती , आणि तीही कोरडवाहू . आम्ही ज्या गावात रहातो त्या भागाला ' माळमाथा ' असे म्हटले जाते.आमचे गाव उंचीवर म्हणजे माथ्यावर आहे. म्हणून माळमाथा . पावसाचे प्रमाण फार नाही. अधून-मधून दुष्काळ ठरलेला. माझ्या लहानपणी पडलेले दुष्काळ मला स्पष्ट आठवतात. पैकी सर्वात भयानक दुष्काळ बहात्तरचा . या काळात घरातील धान्य संपले होते. ज्वारी - बाजरी उसनवार मिळायची , पण देणार्‍याकडेच संपली म्हटल्यावर कसे मिळणार धन्य ? सरकार रेशन दुकानावर ' अडगर ' नावाची निकृष्ट लाल ज्वारी शेतकर्‍यांना पुरवत होते. बेचव अशी ती अडगरची भाकरी नको वाटायची , पण पोट भरण्यासाठी खावी लागायची. मध्येच कधी बाजरीची भाकर मिळाली की अमृत मिळाल्याचा आनंद व्हायचा. वडील शेतीसोबत शिलाइकाम करत. आई घरकाम आणि शेतात जायची . चार भाऊ दोन बहिणी असा मोठा परिवार .
  श्रम हाच आई-वडिलांचा श्रीराम होता. बाबांना वाचायची खूप आवड होती.आई निरक्षर आहे , पण प्रतिभावंत आहे.जात्यावर पहाटे पहाटे खंडी-खंडी दळण दळतांना ती अहिराणी भाषेतल्या ओव्या गायची.

  अस्तुरी जलम देव घालून चुकना
  सकाय उठूनी बैल घानीले जुपना

  स्त्रीच्या वेदनेचा उद्घोष करणार्‍या अशा अनेक अर्थपूर्ण आणि वाङयीन मूल्य असणार्‍या ओव्या ती गायची. ( असे काहीतरी आपण वाङ्ग्मयीन मूल्य असणारी कविता आपण गातो हे आईच्या गावीही नसायचे.) दुपारी जेव्हा ती दळायची तेव्हा आम्ही तिच्या मांडीवर डोके ठेवून पाहुडायचो. जात्याची लयबद्ध घरघर नि आईच्या गळ्यातून ओवी ऐकायचो . आईच्या ओव्यांची लय नकळत मनात , हदयात कशी झिरपली कळलेच नाही. १९८५ साली जेव्हा कविता सुचू लागली तेव्हा कळले की कवितेचा अनुग्रह आईकडून आपल्याला मिळाला आहे. आणि वाचनाचा अनुग्रह बाबांकडून .

  नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात दरवर्षी होणार्‍या साहित्यिक मेळाव्याला मी जावू लागलो. सटाण्याच्या साहित्यायन संस्थेच्या एक दिवशीय साहित्य समेलनाला मी अनेक वर्ष नियमितपणे जात आलो. या दोन संस्थांनी लिहिणारा म्हणून मला ओळख दिली. नाशिक मेळाव्यात कुसुमाग्रजांसारखा महाकवी सहजपणे समोर बसून आम्हा नव्यांच्या कविता ऐकायचे. शाबासकी द्यायचे . हे आठवले तरी खूप भरून येते. प्राचार्य म.सू.पाटील यांनी सटाण्याच्या समेलनात कविता ऐकल्यानंतर पाठीवरून हात फिरवून ' तू छान लिहितोस , पण छान लिहिण्याला शेवट नसतो . कवितेला जीवनाची साधना समजून लिही.' असे सांगून आजपर्यंत आणि इथून पुढे पुरेल इतके बळ दिले . मी लिहू शकतो हा विश्वास दिला . आणि मी अखंडपणे लिहिता राहिलो. चेतश्री प्रकाशनाचे वा. रा. .सोनार यांनी माझ्या ' ज्ञानिया तुझे पायी ' हा अभंगांचा संग्रह काढला. त्याला गो. नी. दांडेकरांनी आशीर्वाद लिहिलेत. अनुष्टुभ , कवितारती सारख्या दर्जेदार अंकातून कविता छापून आली. मला माझा सुर गवसत होता. कविवर्य खलील मोमीन यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मला कवितेच्या प्रवासात लाभले. डॉ. तुषार चांदवडकर यांच्या कुसुमाग्रज प्रकाशनातर्फे ' काळाचा जरासा घास ' हा गझल संग्रह प्रकाशित झाला. गझल नवाज भीमराव पांचाळे यांसी प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. कवितेला जीवनदर्शनाची साधना समजून सतत लिहत आहे. तत्वज्ञान , संत साहित्य मला आवडते. वैचारिक गद्य मी सतत लिहत असतो.

  2 ) मराठी कवितेची, गझलेची सद्यस्थिती, वाटचाल या विषयी काय सांगाल? आपले आवडते कवी, गझलकार यांच्या विषयी..

  काळ ही सर्वात प्रवाही घटना आहे. काळासोबत सर्व काही बदलत असते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. साहित्यालासुद्धा हा नियम लागू पडतो. प्राचीन साहित्य , मध्ययुगीन साहित्य आणि अर्वाचीन साहित्य यात कालौघात बदल होत गेले. संतांची कविता , पंतांची कविता , शाहीरांची कविता हे सगळे बदलाचे टप्पे आहेत . केशवसुतांनी आणि त्यांच्या समकालीन कवींनी कवितेला आधुनिक केले. विषय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगाने कविता विकसित होत गेली. तीचे हे विकसित होणे आजही चालू आहे. विकासाच्या प्रक्रियेत नवे शिरते तसे सनातन असे चांगले कायम शिल्लक राहते.

  कविता आजही मोठ्या प्रमाणात लिहिली जाते आहे. शिक्षणातून ( पाठ्यपुस्तकातून ) हळूहळू वृत्तकविता तिचे व्याकरण गायब होते आहे. ही फार नुकसानकारक गोष्ट आहे. पुढे पुढे पाठ्यपुस्तकातून छंदोबद्ध कविता तिचे व्याकरण जर शिकवले गेले नाही तर नव्या लिहिणार्‍यांना कवितेचे अंकुर कसे फुटतील ? स्वाभाविक आणि प्राकृतिक प्रेरणेने कवितेचे वृत्त , छंद जीवंत रहातीलच. छंदोबद्ध , वृत्तबद्ध कविता लिहिली जाईलच. पण तिचे प्रमाण कमी असेल . कवितेच्या सृजनशीलतेसाठीतरी पाठ्यपुस्तकातून छंद , वृत्त हद्दपार होवू नयेत .

  अलीकडे मुक्तछंद या प्रकारात कविता लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय दर्जेदार मुक्तछंद लिहिला जातो आहे. नव्या प्रतिमाविश्वासह नवे कवी सकस कविता लिहीत आहेत. मात्र दुर्बोधतेमुळे कवितेचा आस्वाद घेणेही कमी होतांना दिसते आहे. कविवर्य सुरेश भट यांनी खांद्यावर घेतलेली गझलेची पालखी मात्र अनेक समर्थ खांदे पुढे नेत आहेत. वेगळा विचार म्हणजे ' खयाल ' हा गझलेचा आत्मा असतो. शिवाय तो अपरिहार्यपणे तंत्रात अभिव्यक्त व्हावा लागतो. या दोनही निकषावर आजची गझल अतिशय दर्जेदार आहे.अवघ्या दोन ओळींच्या शेरात ग्रंथभर आशयाचा स्फोट करण्याची क्षमता गझलेच्या सुट्या शेरात असते. विषय वैविध्याचा विचार करता आजची गझल खूप दर्जेदार आहे. गंगाधर मुटे नावाचे विदर्भातील कवी गझल सारख्या विलक्षण काव्य प्रकारातून शेती , शेतकरी , त्यांचे प्रश्न , शेतकर्‍यांचे शोषण , शासकीय धोरण असे विषय सातत्याने लिहून गझल या प्रकाराची वेगळीच ओळख निर्माण करताहेत. फक्त शेती आणि शेतकरी हा विषय किती वेगळ्या प्रकारे गझलेतून मांडता येतो हे गंगाधर मुटे यांची गझल वाचल्यावर कळते.

  माझे आवडते कवी खूप आहेत . ज्यांच्या कवितेत माउली ज्ञानोबांसारखे ' विश्वाचे आर्त ' आहे . आणि ज्यांच्या कवितेत तुकोबांच्या अभंगातील ' बुडता हे जन न देखवे डोळा ' नंतर येणारा खराखुरा ' कळवळा ' आहे असे सर्व कवी मला आवडतात. रमेश इंगळे उत्रादकर हे एक प्रातींनिधिक नाव मी आदराने घेईन . कवी खलील मोमीन , डॉ. श्रीकृष्ण राऊत , नितीन देशमुख , सतीश दराडे , प्रशांत वैद्य , किशोर मुगल ,हेमंत जाधव , वीरेंद्र बेडसे , रावसाहेब कुवर , मारोती मानेमोड , वैभव कुलकर्णी , रूपेश देशमुख , अमित वाघ , प्रशांत पोरे, नि:शब्द देव , शुभानन चिंचकर , गोंविंद नाईक , जनार्दन म्हात्रे ,योगिता पाटील , पूजा फाटे , पूजा भडांगे , शर्वरी मुनीश्वर , राजीव मासरूळकर , गौरवकुमार आठवले , लक्ष्मण जेवणे , प्रफुल्ल भुजाडे , विद्यानंद हाडके, नितीन भट , प्रकाश मोरे , अरुण सोनवणे असे अनेक उत्तमोत्तम गझल लिहिणारे हात गझलेचे उज्ज्वल भविष्य घडवित आहेत.

  3) सद्यस्थितीत शेतीसमोर, ग्रामीण भागा समोर कोणते प्रश्न उभे राहिलेत असे आपल्याला वाटते ?

  सातत्याने येणारे दुष्काळ , अवकाळी पाऊस , शेतकर्‍यांच्या उभ्या पीकाचे होणारे लाखोंचे नुकसान, निसर्गातील नुकसानकारक बदलांचे वेध न घेवू शकणारी असमर्थ यंत्रणा , शेतीमालाला न मिळणारा हमी भाव , उपजावू शेतीचे होणारे बीनशेतीकरण , वसाहतीकरण, शेती आणि शेतकर्‍याच्या उरावर बसलेला भूमी अधिग्रहण कायदा , शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा कितीतरी समस्या शेतीसमोर आणि ग्रामीण भागासमोर आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याच्या साठीनंतरही शेती आणि शेतकर्‍यांच्या संदर्भात हे प्रश्न असावेत याहून स्वातंत्र्याची चेष्टा नाही.

  4 ) प्रश्नांवर कोणते उपाय आपण सुचवाल ?

  शिक्षण आणि जाणीव जागृती झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. " सैद्धांतिक ज्ञान हाच मुक्तिरथाचा पाया आहे . " असे कार्ल मार्क्स म्हणतो. कुठलीही गोष्ट जेव्हा स्वच्छपणे कळलेली असते तेव्हा त्यामागील भय संपते. शेतकर्‍यांच्या बाबतीत सांगायचे तर त्याच्यासाठी सर्वच गोष्टी अनिश्चित आहेत. पावसाची , बाजारभावाची, निसर्गाची कशाकशाची खात्री नाही. काहीही होवू शकते. या अनिश्चिततेच्या सावटाखाली शेतकरी सतत वावरत असतो. कवी ग्रेस म्हणतात ते ' भय इथले संपत नाही ' या कवितेचा आशय शेतकर्‍यांना अधिक तीव्रतेने लागू पडतो. भयाच्या बुडाशी फक्त अज्ञान आहे. अज्ञान आहे याची जाणीव सुद्धा खूप शुभ घटना आहे. त्यामुळे त्या अंधारातून प्रकाशाकडे जावेसे वाटण्याची इच्छा तरी होईल. शेतीचाच माल जेव्हा व्यापार्‍याच्या हातात जातो तेव्हा त्याचे मूल्य कोसळत नाही. कारण व्यापार्‍याला बाजाराचे नियम कळतात. त्याच्याकडे माल सांभाळणारे प्रचंड स्टोरेज असते. बाजाराचे नियम कळणे . हवा तसा भाव मिळेपर्यंत माल सांभाळण्याचे तंत्र हातात असणे , योग्य वेळी बाजाराचा अंदाज कळणे , त्यानुसार माल मोकळा करणे किंवा दाबून ठेवणे हे सर्व बाजाराचे नियम शेतकरी ज्या दिवशी समजून घेईन म्हणजे त्याला आपल्या क्षेत्रातले वितरण तंत्र कळेल . त्यादिवशी तो स्वतंत्र आणि स्वावलंबी होईल. आस्मानी आणि सुलतानी दोनही सत्ता शेतकर्‍याच्या ताब्यात नाहीत , पण शेती तंत्राविषयी नवी ऊपयुक्त माहिती , नवी बाजार नीती , व्यापारी मनोवृत्ती थोडीतरी कळायला हवी शेतकर्‍याला . त्याने हे सगळे जाणून घ्यावे. अन्न धान्याची निर्मिती तो मुबलक करतो खरा , पण उपवाशी तोच रहातो . हे भयंकर नाही का ? शेतकरी हा इथला ईश्वर आहे. त्याला शेतमाल निर्माण करता येतो , तसा सांभाळता यायला हवा. आणि योग्य वेळी तो वितरीत करता यायला हवा. यासाठी शेतकरी नव्या ज्ञानाने समृद्ध हवा. शेतीविषयक ज्ञानानेच शेतकरी स्वतंत्र होईल आणि समस्यामुक्त होईल. ' सत्तेला विठ्ठल समजून त्याने फक्त एक आषाढी वारी मंत्रालयावर न्यावी .' असे आमचे एक कथा लेखक मित्र मनोहर विभांडीक सांगतात . त्यांच्या या विचारात तथ्य आहे. भोळ्या शेतकर्‍याच्या वारीची दिशा वळायला हवी. पंढरपूरचा नाही तर सत्तेचा विठ्ठल शेतकर्‍यांचे कल्याण करू शकतो. सत्तेच्या छाताडावर शेतकरी नावाच्या नव्या भृगुने लाथ मारायला हवी. माझ्या एका गझलेतला एक शेर आहे.

  सत्तेच्या छाताडावर हे कुणीच मारत नाही ;
  गळफास तुझ्या घेण्याने रे कुणी शहारत नाही..

  5) सद्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला दयाल?

  महात्मा फुले म्हणतात तेच खरे आहे. ' विद्येविणा मती गेली '. नवे ज्ञान , नवे तंत्र , नवी बाजारनीती याविषयी जर तरुण शेतकरी जागरूक झाला तरी बरेच प्रश्न कमी व्हायला मदत होईल. हार न मानता आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जायला हवे. व्यसन आणि आत्महत्या यापासून सांभाळायला हवे . निवडणुकीच्या राजकरणात सत्तेची निवड डोळसपणे करावी . नव्या जगातला खरा कुबेर शेतकरी असायला हवा. या संदर्भात माझी एक शेतकर्‍यांच्या संदर्भातील गझल अशी आहे.

  नको तुकोबा शेत सोडुनी निघून जावुस ;
  तुझी पंढरी जळतांना तू नकोच पाहुस ..

  तुझ्या मळ्याचा असा उन्हाळा बघता बघता ;
  चिल्यापिल्यांच्या डोळ्यांमधला रडेल पाउस ..

  भले करावे सत्तेने हा नियम संपला ;
  म्हणून नाही भाव उसाला जळला कापुस ...

  बिना दुधाचे थाने हे तुज कळेल केव्हा ?
  तू सत्तेच्या वांझ म्हशीला नकोच पाळुस ..

  कुरूप काळ्या समर्पितेशी लाव लग्न , पण -
  नको देखण्या प्रश्नांना तू कुंकू लावुस ...

  - कमलाकर आत्माराम देसले
  झोडगे ता. मालेगाव ( नाशिक)

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 16/05/2015 - 22:11. वाजता प्रकाशित केले.

  Apulki
  ****
  Apulki
  ****
  Apulki
  ****

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 16/05/2015 - 22:18. वाजता प्रकाशित केले.

  गोहत्याबंदी कायद्यामुळे सर्वात जास्त आनंद गोचिडांनाच झाला असेल.
  आता ते गोचिड गाय नैसर्गिकरित्या मरेपर्यंत यथेच्छ रक्त पिऊ शकतील.
  या कायद्याने गोचिडांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे.
  म्हणून सारे गोचिड़ फडणविसांना आशीर्वाद देत असतील. नाही का?
  तुम्हाला काय वाटते?
  – गंगाधर मुटे
  -------------------------------------------------------------------
  गोचीडाना आनंद !

  आमचे मित्र Gangadhar Mute यांनी गोहत्या बंदीचा गोचीडाना त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी संपल्याने खूप आनंद झाल्याचे म्हंटले आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की याचा आनंद त्या लिबलिबीत गोचीडानाच झाला असे नाही तर हाडामासाच्या गोचीडाना देखील झाला आहे. गो-रक्षणाच्या नावावर सरकार कडून मोक्याची जागा . मोठे अनुदान आणि फुकटच्या गायी मिळून यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न सुटणार आहे !
  https://www.facebook.com/sudhakar.jadhav.5
  ---------------------------------------------------------------------
  @Sunny Pawar
  एक गंभीर प्रश्न ?
  गोवंश हत्याबंदीनंतर या दोन तीन महिन्यातच जर्सी गोर्हयांचा प्रश्न निर्माण होतोय ! काही ठीकाणी
  मृत जर्सी गोर्हे व जीवंत गोर्हे रस्त्यावर सोडुन दिलेली आढळली आहेत ..त्या निमित्त प्रश्न .
  गाभण गायीची सोनोग्राफी करून लिंगनिदान शक्य आहे का ?
  कितव्या महीन्यात हे लिंगनिदान करता येईल ? त्या महीन्यात (गर्भ नर असेल तरच ) गायीचा सुरक्षित गर्भपात शक्य आहे का ?
  असा गर्भपात नैतिक निशचित ठरतो ,कारण गर्भधारणा ही कृत्रिम रेतनानेच होते .
  गोर्हयांचा संवर्धन प्रश्नावर अभ्यासू मित्रांशी गंभीर चर्चा करीत असताना एका प्रश्नावर चर्चा थांबली व मी निरूत्तर झालो .शिवाय मित्रांनासुध्दा याचे उत्तर माहीत नाही . मुटेसर आपले मार्गदर्शन बहुमुल्य ठरेल असे वाटते ?
  या विषयी चर्चा होने गरजेचे वाटते का ?
  ---------------------------------------------------------------
  Gangadhar Mute

  लिंगनिदान अणि गायीचा सुरक्षित गर्भपात हा मार्ग शेतकरी स्विकारणाच नाहीत कारण शेतकरी समाजावर भूतदयेचा प्रभाव आहे.

  त्यामुळे या प्रश्नावर वेगळे उत्तर शोधावे लागेल.
  जसे की,,

  १) सरकारला हे बछडे विकत घ्यायला भाग पाडणे.
  २) मुख्यमंत्र्यांच्या नावे विक्रीपत्र लिहून बछडे कलेक्टरच्या कॅबीन मध्ये नेऊन सोडणे आणि रकमेची वसूली क्ररणे.

  इत्यादी इत्यादी...

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 24/05/2015 - 20:09. वाजता प्रकाशित केले.

  Khadase

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 24/05/2015 - 20:11. वाजता प्रकाशित केले.

  Khadase

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 24/05/2015 - 20:12. वाजता प्रकाशित केले.

  Khadase

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 28/05/2015 - 16:10. वाजता प्रकाशित केले.

  मैत्रीण
  मी माझ्या जीवलग मैत्रिणीसोबत रायचूर - हैद्राबाद रोडवर.
  या मंडळी सरकीच्या तेलातील भजे खायला. :gift:
  (25/05/2015)

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 28/05/2015 - 16:35. वाजता प्रकाशित केले.

  आजचा सकाळ
  भाजपने विदर्भाची दिशाभूल केली

  सकाळ

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 30/05/2015 - 20:33. वाजता प्रकाशित केले.

  पावसाळा जसाजसा जवळ येत आहे तसेतसे पर्जन्यमानाचे यंदाच्या पीकपाण्याच्या उत्पादन शक्यतेचे वेगवेगळे शास्त्रीय/अशास्त्रीय अनुमान वर्तवणे सुरू झाले आहे.

  पाऊस सरासरी एवढा पडेल, सरासरी पेक्षा जास्त पडेल किंवा कमी पडेल याचीही भाकिती वर्तविली जाऊ लागली आहेत.

  पण पाउस सरासरी एवढा पडतो, सरासरी पेक्षा जास्त पडतो किंवा सरासरी पेक्षा कमी पडतो याचा शेतीच्या उत्पादनाशी संबंध नसून पाऊस किती पडतो यापेक्षा तो कसा पडतो यावर शेती उत्पादनाचे भवितव्य अवलंबून असते, इतके साधेसुधे वास्तव बहुतेकांना अजिबातच कळलेले नसावे, असे त्यांच्या अनुमानातून ध्वनीत होत असते. त्यामुळे या अनुमानांचा व भाकितांचा उपयोग फ़क्त टाइमपास करण्यासाठी व जिज्ञासा शमविण्यासाठी होते. त्यापलिकडे अनुमानांचा व भाकितांचा फ़ारसा उपयोग नाही.

  याउलट

  "धोंड्याचे (अधीक मासाचे) वर्ष चांगले वर्ष असते" असा शेतकर्‍यांचा विश्वास असतो. मला सुद्धा तशी वारंवार प्रचिती आली आहे.

  शेतकर्‍यांनी विश्वास कुणावर ठेवायचा?
  हवामान तज्ज्ञावर?
  विज्ञानावर?
  ज्योतिषावर?
  पंचांगावर?
  की
  पारंपारिक कानोकानी ज्ञानावर?

  - गंगाधर मुटे
  ----------------------------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 05/06/2015 - 10:45. वाजता प्रकाशित केले.

  शेतकरी पुत्रांनो,

  जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणवाद्यांना व पर्यावरण प्रेमींना छाती फ़ुगवून अभिमानाने सांगा की माझा बाप तुमच्यासारखी नुसती तोंडाने हवेची वाफ़ दवडत नाही.

  त्यांना हेही ठणकावून सांगा की, माझा बाप घाम गाळून दरवर्षी आपल्या शेतात कापसाची, तुरीची, सोयाबिनची कोट्यावधी झाडे लावत असतो ज्यामुळे सर्वांना शुद्ध हवा खायला मिळत असते.

  - गंगाधर मुटे
  ------------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  बुध, 26/08/2015 - 20:19. वाजता प्रकाशित केले.

  कांद्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकार
  आणि
  शेतक‍र्‍याच्या टाळूवरचे लोणी खाऊ इच्छीणारा इंडियन ग्राहक
  शेतीच्या विपणन अर्थशास्त्रात लुडबूड करायला सज्ज झाला आहे.
  लाखो शेतकरी आत्महत्या करित असले तरी कधीच न हादरणारे, विव्हळणारे व ढिम्मच्या ढिम्मच असणारे हे शेतकरीविरोधी पाताळयंत्री कारस्थानी कांद्याला भाव मिळायला लागल्याबरोबर राक्षसी रूप धारण करायला लागले आहेत.
  शेतकरीपुत्रा आतातरी जागा हो!
  "गरिबी हटविण्यासाठी कुणीही काहीही करण्याची गरज नाही. फ़क्त गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणून तुम्ही जे प्रयत्न करता आहात; तेवढे बंद करा म्हणजे गरिबी आपोआप हटेल"
  हे मा. शरद जोशी विधान पुन्हा एकदा लक्षात घे!!
  शेतकरीपुत्रा आतातरी अर्थ समजून घे!!!
  *********
  ग्राहकालाही "परवडणारा भाव" हवा हे सुत्र फ़क्त शेतीमालासच का? बिगरशेतीमालास का नाही?

  शेतकरीसुद्धा ग्राहक असतो, त्याला हव्या असलेल्या वस्तू परवडणार्‍या किंमतीत मिळाव्या, अशी व्यवस्था कधी निर्माण झाली का?

  शेतकर्‍याला दुर्धर आजार झाला तर त्याला बिनाऔषधानेच मरावे लागते. तेव्हा "परवडणारा भाव" हे सुत्र कुणीच मांडत नाही.
  *********

  कोणत्याही शेतमालाची किंमत अर्थात भाव शेतकर्‍यांना मिळताना त्यातून वाहतूक खर्च, दलाली वजा होणे क्रमप्राप्त आहे.

  कन्याकुमारित कांदा पिकत असेल आणि तो दिल्लीतील ५२ मजली अपार्टमेंट मधील ५१ व्या मजल्यावर राहणार्‍या ग्राहकाला हवा असेल तर शेतकर्‍याला मिळणार्‍या दरात आणि ग्राहकाला आकारल्या जाणार्‍या दरात फ़रक असणारच.

  त्यात गैर असे काहीही नाही, हे व्यापारशास्त्र आहे. smile emoticon

  कांदा हे नाशीवंत फ़ळ आहे आणि सडला की अन्य कांद्यांनाही सडवतो.
  उग्र वास असल्याने लपवून ठेवण्यासारखी स्थिती नाही.
  आधुनिक तंत्रज्ञान वापरून साठवणूक केल्यास प्रचंड खर्च येईल आणि ती न परवडणारी बाब आहे.

  कांद्याचे भाव साठेबाजी मुळे नाही तर गारपीट व अवकाळी पावसामुळे वाढले आहेत.
  *********
  शासकीय धोरणे व्यापाराला पूरक असल्याने कशाचाही व्यापार केला तरी व्यापारी तुपाशीच खाणार आहेत.
  तुपाशी खाण्यासाठी कांद्याचाच व्यापार करणे गरजेचे व अनिवार्य नाही.

  व्यापारी तुपाशी खातो आणि शेतकरी उपाशी राहतो याला व्यापारी जबाबदार नसून "व्यापाराला तारक आणि शेतीला मारक" अशी शासकीय धोरणेच जबाबदार आहे.

  - गंगाधर मुटे
  -------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  बुध, 26/08/2015 - 21:03. वाजता प्रकाशित केले.

  शासकीय धोरणे व्यापाराला पूरक असल्याने कशाचाही व्यापार केला तरी व्यापारी तुपाशीच खाणार आहेत.

  तुपाशी खाण्यासाठी कांद्याचाच व्यापार करणे गरजेचे व अनिवार्य नाही.

  व्यापारी तुपाशी खातो आणि शेतकरी उपाशी राहतो याला व्यापारी जबाबदार नसून "व्यापाराला तारक आणि शेतीला मारक" अशी फ़क्त आणि फ़क्त शासकीय धोरणेच जबाबदार आहे.

  त्यामुळे

  सरकारला सोडून व्यापार्‍यांना दोष देणे केवळ मुर्खपणाचेच नाही तर चक्क नामर्दपणाचे पहिले लक्षण आहे. Lol
  ******
  कांदे थोडेसे महाग झाले तरी इंडियन ग्राहक बोंब का ठोकतात?
  माणसे मरतात का कांदे न खाल्याने?
  स्वस्तात खरेदी करून खाल्लेला कांदाच फ़क्त आरोग्यदायी असतो का?
  महाग कांदा खरेदी करून खाल्ला तर महारोग होतोय का?

  - गंगाधर मुटे
  ~~~~~~~~~~~~~~
  http://www.baliraja.com/node/559

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 24/09/2015 - 19:15. वाजता प्रकाशित केले.

  काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे चांगले
  याचा अर्थ
  काहीच न खाण्यापेक्षा शेण खाणे चांगले
  असा होत नाही.
  शेतकर्‍यांनी शब्दाच्या गारुडखेळापासून सावध रहावे!

  - गंगाधर मुटे
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 24/09/2015 - 19:16. वाजता प्रकाशित केले.

  वर्ष आता आठवत नाही पण २००५ च्या आसपासची गोष्ट असावी.
  मी पुण्याला बालगंधर्व मध्ये "पुरुष" नाटक बघितले. नायक नाना पाटेकरच होते. मध्यंतरात नानांनी नाट्यगृहात फ़िरुन, प्रत्येकाकडे जाऊन भुकंपग्रस्तासाठी निधी गोळा केला होता. तेव्हा मी सुद्धा त्यांच्या कटोर्‍यात माझ्या यथाशक्ती दान टाकले होते.
  याचा अर्थ इतकाच की;
  - नानांच्या सार्वजनिक जिव्हाळ्याविषयी माझ्या मनात शंका नाही.
  - त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय घ्यायचे मला आजतरी काहीही कारण नाही.
  पण
  अपंगांना, दिनदुबळ्यांना, अन्यायग्रस्तांना, निराधारांना, भुकंपग्रस्तांना, आपत्तीग्रस्तांना मदत करणे हा मानवधर्म आहे. त्यांना मदत केलीच पाहिजे.
  पण
  शेतकरी अपंग, दिनदुबळा, निराधार, भुकंपग्रस्त, आपत्तीग्रस्त नाही. त्याचे शरीर शाबूत आहेत. शेती कसण्यात नैपुण्यप्राप्त आहे, कष्ट करण्याची उमेद आणि धमकही त्याच्यात आहे.
  मात्र
  तो शासकिय अन्यायग्रस्त आहे.
  तो काम करतो, कष्ट करतो, घाम गाळतो म्हणून त्याला मदत करण्याची, भीक घालण्याची गरजच नाही.
  फ़क्त त्याच्या श्रमाचा मोबदला त्याला मिळायला हवा. बस्स!
  निसर्गत: त्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळू शकतो. पण सरकार नावाची यंत्रणा शेतकरी विरोधी धोरणे राबवून नैसर्गिक प्रवाहाला अवरुद्ध करते आणि त्याला त्याच्या श्रमाचा मोबदला मिळू नये म्हणून शेतमालाचे भाव मातीमोल होईल अशी व्यवस्था करते.
  हे मकरंद आणि नानाला कळले नसते तर समजून घेता आले असते. पण माझ्या माहितीप्रमाणे नानाला हे सारे कळते. माझ्या कच्च्या माहितीनुसार मकरंद अनासपूरे तर स्वत: शरद जोशी यांच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता आणि "भीक नको हवे घामाचे दाम" अशा घोषणाही देत होता.
  तरी ही चूक जाणूनबुजून का?
  शेतकर्‍याला त्याच्या श्रमाचा मोबदला तेवढा द्यायचा नाही. त्याला भिकारी बनवून रांगेतच उभे करायचा अट्टाहास का?
  कर्मचार्‍यांना पगार/वेतन दिले जाते; मदत/भीक दिली जात नाही.
  पगाराव्यतिरिक्त बोनस दिला जातो; मदत/भीक दिली जात नाही.
  वेळेपेक्षा जास्त काम केले तर ओव्हरटाईम दिला जातो; मदत/भीक दिली जात नाही.
  व्यापार्‍यांना विमा भरपाई दिली जाते; मदत/भीक दिली जात नाही.
  बेरोजगारांना भत्ता दिला जातो; मदत/भीक दिली जात नाही.
  मग शेतकर्‍यानेच असे काय पाप केले की त्याला घामाचे दाम न देता मदत/भीक दिली जात आहे?
  सरकारने शेतकर्‍यांना पीकाच्या उत्पादनखर्चापेक्षा कमी हमी भाव दिलेले आहेत.
  नाना मकरंदने भीक देत फ़िरण्यापेक्षा सरकारने शेतकर्‍यांच्या केलेल्या लुटीची रक्कम
  म्हणजे
  उत्पादनखर्च - हमीभाव = उरलेली रक्कम
  शेतकर्‍याला भरून द्यावी.
  शेतकर्‍यांना त्याच्या हक्काचे देण्यापेक्षा धर्मादाय सदावर्ते चालवून प्रेषितांचाची भुमिका स्विकारल्याने त्यांचेविषयी संशयाचे वलय निर्माण होणे स्वाभाविक आहे.

  - गंगाधर मुटे
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 24/09/2015 - 19:17. वाजता प्रकाशित केले.

  ना मै राईस खाऊंगा
  ना आज चावल खाऊंगा
  मराठी आदमी हूँ मै
  केवल भात खाऊंगा

  - गंगाधर मुटे
  -------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • admin's picture
  admin
  बुध, 21/10/2015 - 13:35. वाजता प्रकाशित केले.

  तूर डाळ प्रकरण - एखाद्या शेतमालाच्या जराशी तेजी आली की लवकरच "सामान्य" माणसांचा तळतळाट व्हायला लागतो. मग तो शेतमाल चेष्टेचा विषय बनवला जातो. पुन्हा शेतकरी आत्महत्यांच्या नावाने गळे काढून रडायचे सोंग घ्यायला ही "सामान्य" माणसे तयारच असतात.

  यंदा सार्वत्रिक नापिकी आहे. सोयाबिनचा उतारा एकरी १-२ क्विंटलच्या घरात आहे. काहींनी तर काढणी करायला परवडत नाही म्हणून उभ्या पिकात औत घालून नांगरून-वखरून टाकले आहे. जे काही सोयाबिन घरात आले त्याच्या बाजारभावात मंदी आहे.

  कपाशीची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. दरवर्षीच्या तुलनेने यंदा कापसाचे २५ टक्केही उत्पादन येणार नाही, असे संकेत आहेत. कापसाच्या भावात घसरण आहे. म्हणजे यंदा शेती पुरेपूर तोट्यात जाण्याची निसर्गाने उत्पन्नाच्या माध्यमातून आणि सरकारने बाजारभावाच्या माध्यमातून ठोस व्यवस्था केलेली आहे.

  अशा परिस्थितीत तूरीची बाजारभावातील तेजी कायम राहिली तर शेतकर्‍यांच्या घरात ४ पैसे येण्याची शक्यता आहे. पण आता "सामान्य" माणूस शेतकर्‍यांच्या जीवावर उठायला सज्ज झाला आहे. प्रसारमाध्यमातून तुरीच्या भावाची बोंब ठोकून सरकारवर दडपण आणण्याच्या कामाला लागल्याचे दिसत आहे.

  सर्वांनी एकदा विचार करावा. आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्याऐवजी त्याच्या प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्यासाठी उताविळ होऊ नये. तूर महाग असेल तर कमी खावा. तूर न खाल्याने मनुष्य मरत नाही, आजारी पडत नाही आणि नपुसंकही होत नाही, याचे भान राखावे.

  अशा दुष्काळी परिस्थितीत "सामान्य" माणूस शेतकर्‍यांच्या बाजूने उभा राहिला तर शेतकर्‍यांना नक्कीच दिलासा मिळेल.

  - गंगाधर मुटे
  ----------------------------------------

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 20:02. वाजता प्रकाशित केले.

  October 23, 2015
  https://www.facebook.com/gangadharmute/posts/1116751021682918

  शेतकर्‍यांना चांगले भाव मिळावे म्हणून व्यापारी ज्या भावात शेतमाल खरेदी करतो त्यापेक्षा पाच-दहा पट जास्तीचे भाव देऊन व्यापार्‍याऐवजी शेतकर्‍यांकडून शेतीमाल खरेदी करणारा भारतीय ग्राहक माझ्या पाहण्यात नाही. कुणाच्या असेल तर सांगावे. शक्य झाल्यास अशा ग्राहकाचा मोबाईल नंबर व संपूर्ण पत्ता सुद्धा लिहावा. म्हणजे निदान माझ्या गावातला तरी संपूर्ण माल तिकडे पाठवतो.
  सरकार तर व्यापार्‍यांपेक्षा कायमच कमी दरात खरेदी करत असते. त्यामुळे "भाववाढीचा फ़ायदा शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांना होतो" अशी थिअरी मांडणारे कोरडी सहानुभूती शेतकर्‍यांप्रती दर्शवत असतात, असे म्हणायला वाव आहे.
  व्यापारी खरेदी करतो म्हणून शेतमाल खपतो. व्यापार्‍यांऐवजी ग्राहक किंवा सरकार खरेदी करेल तर शेतमालाची आणखी मातीमाती होऊन जाईल आणि बाजारात आणलेला माल शेतकर्‍याला वापस घरी घेऊन जावे लागेल.

  तुम्हाला काय वाटते?

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 20:04. वाजता प्रकाशित केले.

  October 24, 2015
  https://www.facebook.com/gangadharmute/posts/1117226041635416

  : शेतमालाची मार्केटींग :

  कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन हे तीन स्वतंत्र विभाग असतात. जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती हे तिन्ही विभाग सांभाळू शकेल असा कुठलाच व्यवसाय अस्तित्वात नाही. औद्योगिक क्षेत्रात सुद्धा यासाठी स्वतंत्र विभाग असतात. मात्र मी जेव्हा शेतीचा विषय सोशल माध्यमात छेडतो तेव्हा दरवेळेस "शेतकर्‍यांनी मार्केटींग शिकावे" अशा आशयाचे निदान दोनचार तरी प्रतिसाद येतच असतात. जगाच्या पाठीवर आजवर जे कुणाला जमलेलेच नाही ते आपण शेतकर्‍याला सांगत आहोत, याचा विसर सर्वांनाच पडतो.

  शेतीमधून कितीही संख्या बाहेर पडली तरी शेती कसायला कोणी तरी उरणारच आहे. जो शेती कसून उत्पादन करतो तोच शेतकरी असतो आणि मी त्याच्याबद्दल बोलत असतो.
  शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. शेती करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला मार्केटिंगसदृश अन्य व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो शेती सोडून केवळ मार्केटिंगमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो शेतकरी नोकरी, पुढारीपणा किंवा व्यापार करायला लागतो तो अल्पावधीतच नोकरदार, पुढारी किंवा व्यापारी होतो; शेतकरी म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. सातबारा नावाने असला तर त्याला शेतमालक म्हणता येईल, शेतकरी म्हणता येत नाही. अर्थात शेतकरी फक्त तोच जो शेती कसून उत्पादनाचा विभाग हाताळतो. एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” भलेही मग सातबारा त्याच्या नावाने असो किंवा नसो. तो भूधारक असो किंवा भूमिहीन असो! आपण जेव्हा शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा शेती कसून उत्पादन करणार्‍याविषयी बोलत असतो; व्यापारी, उद्योजक, दलाल यांच्या विषयी बोलत नसतो. शेती कसणे सोडून सार्‍यांनीच व्यापार सुरू करणे अशी कल्पनाच करणे शक्य नाही. इतके साधे गृहितक समजून घ्यायला काय हरकत आहे?

  शेतीमध्ये मार्केटींग आणि सामुहिक शेती हा काही नवीन शोध अथवा नाविन्यपूर्ण विषय नाही. अगदी पुरातन काळापासून शेतकर्‍याचा एक मुलगा शेती, दुसरा व्यापार आणि तिसरा नोकरी करतच आलेला आहे. जो व्यापारात जातो तो व्यापारी बनतो. जो नोकरीत जातो तो सातव्या वेतन आयोगाचा लाभार्थी बनतो पण जो शेती कसून उत्पादन करतो तो शेतकरी म्हणून उरतोच. शेतकरी, व्यापारी व नोकरदार जरी सख्खे भाऊ असले तरी आपापली कमाई एकत्र करतील व मग त्या कामईचे तीन हिस्से करून समसमान प्रमाणात आपसात वाटून घेतील, अशी कुटुंबव्यवस्था आपल्या भारतात कधीतरी अस्तित्वात होती काय? जर कधीच नव्हती तर शेतकर्‍याला असा सल्ला सांगण्याचे काय प्रयोजन आहे?

  तरीही शेतकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ मार्केटिंग करणे, शेतकर्‍याला वावगे नाही. अनादिकाळापासून शेतकरी शक्य होईल तसे किरकोळ मार्केटिंग करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी गुजरी भरायची. आठवडी बाजार भरायचा. तिथे शेतकरी आपला शेतमाल स्वत: दुकान मांडून विकायचे. ही शेतमालाची मार्केटिंगच होती ना? आपल्या जवळचा शेतमाल विकून येणार्‍या पैशात अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करणे, शेतकर्‍यांच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? कुठे मध्यस्थ होता? कुठे दलाल होता? मग मार्केटिंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला एकएकट्या न जाता गृपने सामुहिकपणे जायच्या. मग सामुहिक शेती म्हणजे अशी काय वेगळी संकल्पना आहे की कुणी ती मोठ्या आवेशात मांडावी?

  शेतकर्‍यांना मार्केटींगचा सल्ला देताना काजू, नारळ, ढोबळी मिरची, संत्री अशाच पीकविक्रीचा सल्ला का दिला जातो? या देशातले बहुसंख्य शेतकरी ही पिके घेतात काय?

  आज मी या देशातल्या तमाम मार्केटींगप्रेमी सुशिक्षितांना, विद्वानांना, तज्ज्ञांना, राजकीय पुढार्‍यांना, अभ्यासकांना, सारस्वतांना, शहाण्यांना, दिडशहाण्यांना, उपटसुंभाना, शेतकर्‍यांच्या हितचिंतकांना तसेच समग्र प्राणीमात्रांना, किड्यामाकुड्यांना, जीवजंतूंना आणि चिंतातूर जंतूंना याद्वारे जाहीर आव्हान देतो की........

  हा देश जाऊ द्या, हे राज्य जाऊ द्या, जिल्हा जाऊ द्या आणि तालुकाही जाऊ द्या..... फ़क्त माझ्या एका छोट्याशा खेड्यात व परिसरात यावर्षी सुमारे ५००० क्विंटल सोयाबिन पिकणार आहे. (दरवर्षी अंदाजे ४०,००० क्विंटल पीकत असते) उत्पादनात यावर्षी घट आल्याने आम्हाला १२,०००/- प्रति क्विंटलपेक्षा कमी भाव परवडणारा नाही. एवढा भाव मिळाला नाही तर कुणालाही कर्जफ़ेड, वीज बील भरणे, किराण्याची उधारी फ़ेडणे, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होणार नाही. कदाचित एखादा आत्महत्त्याही करू शकतो.

  आमच्या आवाक्यात असलेल्या कोणत्याही बाजारपेठेत सोयाबिन नेऊन विकले तरी ४,०००/- प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता नाही. याक्षणी यापेक्षा जास्त भाव मिळवून घेण्यास आम्ही असमर्थ आहोत.

  आता वरिलपैकी कुणीतरी आम्हाला थेट मार्गदर्शन करून मार्केटींगचा थेट सल्ला सांगावा, जेणेकरून आम्हांस सोयाबिनला १२,०००/- प्रति क्विंटल भाव मिळू शकेल.

  - गंगाधर मुटे
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  टीप : १) सल्ला येथेच जाहीरपणे द्यावा. खाजगी फ़ोन, मेल अथवा पत्रव्यवहार करू नये.
  २) प्रक्रियेचा नवा सल्ला देवू नये.

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 20:17. वाजता प्रकाशित केले.

  October 26, 2015
  https://www.facebook.com/gangadharmute/posts/1118155554875798

  आडकित जाऊ, खिडकित जाऊ
  खिड़कित होती राधिकी
  भुलोजीला मुलगी झाली
  नाव ठेवा नापिकी

  - गंगाधर मुटे
  =0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=
  तमाम जनतेला कोजागिरीच्या महाभयंकर शुभेच्छा....!

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 20:20. वाजता प्रकाशित केले.

  November 1, 2015
  https://www.facebook.com/gangadharmute/posts/1120944547930232

  : पुरस्कार परत करण्यामागील कारणमिमांसा :

  आज एका साध्या चर्चेमध्ये मला एका मित्राने प्रश्न विचारला की लाखो शेतकरी आत्महत्त्या करत आहेत तरी शासनसंस्था मख्ख आहे. याच्या निषेधार्थ एकाही सारस्वताने आपला शासकीय पुरस्कार वापस करण्याची कधी साधी तयारी सुद्धा दाखवली नाही. याउलट दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या झाल्याबरोबर याच सारस्वतांनी पुरस्कार परतीसाठी रांगा लावायला सुरुवात केली आहे, असे का? सारस्वतांच्या लेखी सहा लाख शेतकर्‍यांच्या जीवापेक्षा या त्रयीची किंमत मोठी आहे का?

  मी त्यावर दिलेले उत्तर थोडक्यात असे :

  सहा लाख शेतकर्‍यांच्या जीवापेक्षा या त्रयीची किंमत मोठी आहे किंवा पुरस्कार परत करायला निघालेल्या सृजनशील कलावंताना दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांचेविषयी अपार प्रेम किंवा आदर आहे, अशातला हा भागच नाही.

  सृजनशील कलावंत सुद्धा माणसेच आहेत आणि कोणत्याही मनुष्याला प्रथम त्याच्या जीवाची व जीवनजगण्याची हमी हवी असते. एवढी हमी असेल तर त्याला नंतर सन्मान, पुरस्कार वगैरे हवे असतात. स्वत:च्या जीवापेक्षा पुरस्कार-सन्मान वगैरे मनुष्याच्या दृष्टीने कधीही मोठे नसतात. सृजनशील कलावंताना आपले लौकिक अस्तित्वच संपुष्ठात येण्याची भीती वाटायला लागली असल्याने त्यांनी पुरस्कार परत करण्याचा पवित्रा घेतलेला असावा.

  शेतकरी सहा लाख मेलेत काय किंवा बारा लाख मेलेत काय, त्यातून सृजनशील कलावंताच्या जिविताला कसलीच असुरक्षिता/हानी/धोका पोचण्याची शक्यताच नाही. कोट्यावधी शेतकरी मेले तरी खायला अन्न, नेसायला कपडे याचीही उणीव भासणार नाही, अशीही त्यांना खात्री आहे. मग या मुद्द्यावर पुरस्कार कशाला परत करतील?

  या उलट धर्ममार्तंडविरोधी लेखन केल्याच्या कारणावरून जर दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्त्या झाल्या असतील तर धर्ममार्तंडविरोधी लेखनी चालविणारांसाठी ही धोक्याची घंटा वाटत आहे. आता आपला नंबर सुद्धा लागू शकतो, या भितीने त्यांना ग्रासले आहे.

  आणि म्हणूनच

  शेतकरी आत्महत्त्यांच्या निषेधार्थ पुरस्कार वापस न करण्याची मानसिकता असणारे मात्र दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या झाल्याबरोबर पुरस्कार परतीसाठी रांगा लावत आहेत.

  - गंगाधर मुटे
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 20:26. वाजता प्रकाशित केले.

  November 5, 2015

  सकाळ दि. ०५/११/२०१५
  "माझी गझल निराळी" समीक्षण
  धन्यवाद सकाळ आणि @Raj Pathan सर

  Gazal

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 20:31. वाजता प्रकाशित केले.

  November 12, 2015

  पुण्यनगरी
  रविवार ०८ नोव्हेंबर २०१५

  facebook

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 20:37. वाजता प्रकाशित केले.

  November 14, 2015
  https://www.facebook.com/gangadharmute/posts/1126729637351723

  : अनुभवाचे बोल :
  देव आणि ध्येय दोन्ही सारखेच. रस्ता भटकला की कधीच गाठता येत नाही. मग कितीही कष्ट, परिश्रम घेतले तरी ते व्यर्थ गेलेच म्हणून समजा.

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 20:44. वाजता प्रकाशित केले.

  December 5, 2015
  https://www.facebook.com/photo.php?fbid=1137117286312958&set=a.170375506...

  ज्या महिलांना शनीचे दर्शन घ्यायचे नव्हते त्या महिला अनादी काळापासून दुरुनही दर्शन घेत नव्ह्त्या. चबुतर्‍यावर चढून दर्शन घ्यायची परवानगी दिली तर दोन दिवस ढोंगधतुरे करतील. नंतर त्या शनीदेवाकडे ढुंकुनही पाहणार नाहीत.

  ज्या महिलांना शनीचे दर्शन घ्यायचे होते त्या महिला अनादी काळापासून दर्शन घेतच होत्या. त्यांना कसलीच अडचण आली नाही, त्यांची भावभक्तीही कमी झाली नाही अथवा त्यांची अस्मिताही संकुचित झाली नाही. यापुढेही त्या दर्शन घेतच राहतील. त्यांना सरकारी वा न्यायालयीन निवाड्याची गरज नाही.

  मी काही महिन्यापूर्वी तृप्ती देसाईंशी बोललो होतो. त्यांचे एक वाक्य

  "आता मला कार्पोरेशनची निवडणूक लढवायची गरज नाही, थेट एमएलए म्हणूनच निवडून येऊ शकते" Lol

  shani Shinganapur

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 21:03. वाजता प्रकाशित केले.

  December 27, 2015

  जनादेश पुरस्कार

  Janadesh

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 21:16. वाजता प्रकाशित केले.

  December 28, 2015

  जनादेश पुरस्कार

  Puraskar

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 21:19. वाजता प्रकाशित केले.

  December 31, 2015

  जनादेश पुरस्कार

  प्रसिद्ध आणि आजच्या युगातील आघाडीचे सिनेगीतकार, कवी, लेखक, पटकथाकार श्री गुरु ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा योग तर आला पण; उंची कधी गाठता येईल?

  गडकरी रंगायतन, ठाणे ३१/१२/२००५
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  Puraskar

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 21:23. वाजता प्रकाशित केले.

  April 9, 2016

  सिजेंटा इंडिया कंपनीचे 1057 या टोमॅटो वाणां मुळे उत्तर पुणे जिह्यातील शेतकऱ्यांचे जवळ पास 100% नुकसान झाले आहे.

  कंपनीला व सरकारला नुकसान भरपाई मागायला हरकत नाही
  पण तत्पूर्वी
  नविन तंत्रज्ञान वापरतांना काही धोके असतात. याची पूर्वकल्पना न देताच उठसूठ शेतकर्‍यांना परंपरागत शेती सोडून नवीन तंत्रज्ञान वापरायचे अनाहूत सल्ले देणार्‍यांच्या दोन-दोन थोबाडात पण हाणायला पाहिजे.

  आधुनिक तंत्रज्ञान वापरले किंवा निसर्गशेती केली तर लगेच शेतकर्‍याच्या घरात पैशाचा पाऊस पडायला सुरुवात होते, असा अक्कलशून्य बभ्रा करणार्‍या पगारी तज्ज्ञांना व गल्लोगल्लीतील अर्धशिक्षित बॅरिस्टरांना तर बदडूनच काढले पाहिजे.

  शेती कशीही करा, आधुनिक करा की परंपरागत, ओलिताची करा की कोरडवाहू
  जोपर्यंत शेतीधोरण बदलत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांचे मरण अटळ आहे. हे निर्विवाद गणीतीय समिकरण ह्या महाभागांना कधीच मान्य नसते कारण स्वस्तात शेतीमाल लुटून निर्माण होणार्‍या संचयावरच ह्यांची उपजिविका अवलंबून असते.

  शेतकर्‍याला गरीब आणि लाचार ठेवण्यातच ह्यांच्या समृद्धीची व ऐषोआरामाची पायाभरणी झालेली असते.

  - गंगाधर मुटे
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 21:26. वाजता प्रकाशित केले.

  April 11, 2016

  अ‍ॅग्रोवन ११/०४/२०१६

  Agrowon

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 17/11/2016 - 21:31. वाजता प्रकाशित केले.

  पुण्यनगरी ११/०४/२०१६

  Punynagari

  शेतकरी तितुका एक एक!

 • पाने