Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

जलजीवन मिशन सुद्धा नापास

Main page content

Profile picture for user SatishDeshmukh
By SatishDeshmukh | 11:07 PM IST, गुरू November 26, 2026
मागोवा

जलजीवन मिशन सुद्धा नापास

'जलयुक्त शिवार अभियान' सन 2014 ला सुरु करून  'महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करू' अशी स्वप्ने दाखविण्यात आली.  त्यानंतर 'गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' अशी मोहीम (कागदावर) राबविण्यात आली. तसेच 'सत्यमेव जयते फार्मर कप' ही स्पर्धा आली. आता नदी जोड प्रकल्प आले आहे. अश्या आकर्षक नावाच्या घोषणा करून सुद्धा महाराष्ट्रात पावसाळ्यात सुद्धा टँकर राज चालू आहे. तीच परिस्थिती 'जलजीवन मिशन' ची आहे.

महाराष्ट्रामध्ये जशी संतांची गौरवशाली परंपरा आहे, तसेच पाणी प्रश्‍नासाठी कार्य करणारे, अक्षरशः आपले आयुष्य वाहून घेणाऱ्या जलतज्ञांचेही निस्वार्थी काम आहे. परंतु पाणी विषयावर काम करणाऱ्या सर्व जल तज्ञांकडून एका प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे, याची मला खंत आहे. 
बीड मध्ये एक विद्यार्थिनी योगिता उन्हामध्ये पाण्यासाठी पायपीट करून उष्माघाताने मरण पावली होती. ती बातमी वाचल्यावर गेले दहा वर्षा पासून आम्ही ही मागणी करीत आहोत की ग्रामीण भागातील माऊलींना व शाळकरी विद्यार्थिनींना घराचा उंबरठा न ओलांडता, नळाने घरात पाणी मिळायला पाहिजे. 'जल जीवन मिशन' (हर घर मे नल और हर नल मे जल) ची पंतप्रधानांनी लाल किल्यावरून घोषणा करण्यापूर्वी पासून.

टी. व्ही. वर तर भारी जाहिरातबाजी केली जात होती की "जल जीवन मिशन" ने 13 कोटी ग्रामीण कुटुंबांच्या नळ जोडणीचा टप्पा गाठला आहे. हे चुकीचे आहे.
आम्ही बरेच ठिकाणी ग्रामीण भागात दौरा करून सर्वे केला. त्यात असे आढळले की,

काही ठिकाणी ही योजना अजून कागदावरच आहे. ती पण फक्त सांड पाण्यासाठीच आहे. कपडे, भाडे धुणे वगैरे. पिण्याच्या पाण्यासाठी RO प्लॅन्ट मधून 2-3 किलोमीटर वरून पाणी आणावे लागते. ह्या योजने मध्ये कंत्राटदारांचा प्रचंड कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याची कॅग मार्फत चौकशी व्हावी. उदाहरणार्थ, अहिल्यानगर मध्ये जलजीवन योजनेतील अनियमितता आणि गंभीर त्रुटी आढळून आल्यावर झेडपी ने दहा अभियंतांना कारवाई करून निलंबित केले. 
सिस्टिम डिझाईन मध्ये अनेक मूलभूत दोष आहेत. पाईप लाईन मध्ये जोडणी सॉकेट न देताच मुख्य पाईप जमिनीत गाडला जातो. त्यामुळे काही ठिकाणी (उदा. खळद) ग्रामपंचायती ने काम थांबवले आहे. वाशेरे (ता. खेड) मध्ये सव्वा तीन कोटी रु. खर्च करून सात किलो मीटर वरून पाईप  लाईन केली. पण डोंगर चढणीचा विचार न केल्यामुळे पंप पाणीच ओढत नाही. म्हणजे पाण्यासारखा पैसा खर्च करून एक थेंब पाणी नाही, घशाला कोरड. असे मूलभूत तांत्रिक दोष आहेत.

सगळी अर्धवट कामे आहेत. जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या सांगलीच्या कंत्राटदार हर्षल पाटील यांनी दीड कोटींच्या थकीत बिलापोटी आत्महत्या केली. ठेकेदारांची 35,000 कोटी रु. ची बिले देणी (केंद्राचे 16000 कोटी तर राज्याचे 19000 कोटी रु) सरकारने थकवली आहेत. केंद्राने सप्टेंबर 2024 पासून निधी दिलाच नाही. जलजीवन मिशन च्या कर्मचाऱ्यांचे मानधन हे गेली 9 महिन्यांपासून थकीत असल्यामुळे ते राज्य स्तरीय आंदोलन करणार होते. त्यामुळे कामे ठप्प आहेत. काही जिल्ह्यात योजनाची सुरुवातच झालेली नाही.

बऱ्याच ठिकाणी पाण्याचे शाश्वत स्रोतच उपलब्ध नाहीत. पुणे जिल्ह्यात बरेच ठिकाणी प्रकल्प वीज जोडणी अभावी कार्यंवित होऊ शकले नाहीत. ह्या योजना स्थानिक सत्ताधारी नेत्यांच्या प्रभावाखाली असल्यामुळे तिथे भरघोस आर्थिक तरतूद होते. इतरत्र पूर्ण दुर्लक्ष केले गेले.
निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापर होत आहे.

पाण्याची गुणवत्ता बरोबर नाही. खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील एका गावातून आणलेल्या विहिरीचे पाणी तपासल्यानंतर लॕबने  "पिण्यासाठी योग्य नाही" असा निष्कर्ष दिला आहे. हे सर्वश्रुत आहे की आजही भारतात 70 % रोग हे जलजन्य आजारामुळे होतात.
आम्ही पुरंदर तालुक्यातील दोन गावातील RO प्लॅन्टच्या पाण्याचे सॅम्पल (IS 10500 च्या निकष प्रमाणे) लॅबला टेस्टिंग साठी दिले. तेव्हा असे रिपोर्ट आले की त्या पाण्यात टीडीएस (Total Dissolved solid) फक्त 36 mg/L आहे. जरी ते आवश्यक मर्यादा 500 mg /L च्या आत असले तरी ते 150 ते 300 mg/L पाहिजे. RO प्लॅन्ट मध्ये पाण्यातील शरीराला उपयुक्त  कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी 92-99 % उपयुक्त खनिजे काढून टाकल्यामुळे कालांतराने थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायूंचे पेटके, हृदयरोग व हाडांच्या घनतेशी संबंधित समस्यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

सध्या शहरांमध्ये 210 ते 295 लिटर प्रति दिन प्रति माणशी पाणी वापर आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानुसार, शहरी पाणी पुरवठ्यासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन 135 लिटर हे निकष सुचवण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागांसाठी, जल जीवन मिशन अंतर्गत 55 लिटर ठरवले आहेत. असा दुजाभाव का?

भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे झाली तरी ग्रामीण भागात किती हाल. पाणी ही मूलभूत गरज शासनाला पुरवता येत नाही. त्यांना 2 ~ 3 मैल जा- ये रपेट करावी लागत आहे.

सन 2019 मध्ये सुरु केलेल्या ह्या योजनेचे हे काम 2024 पर्यंत संपवायचे उद्दिष्ट होते. निवडणुकीच्या काळात असा दावा केला गेला की 80% काम पूर्ण झाले आहे. मग अचानक उद्दिष्ट मर्यादा कालावधी एकदम 2028, म्हणजे 4 वर्षांनी का पुढे ढकलला?
अर्थमंत्री नीर्मला सीतारामन यांनी देशाच्या आगामी 25 वर्षांच्या वाटचालीवर भाष्य करताना "अमृत काळ" चा उल्लेख केला होता. आमचे मागणे हेच आहे अमृत काळात अमृत तुम्हीच प्या. आम्हाला फक्त शुद्ध पिण्याचे पाणी, ते ही घरात द्या.

संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरविलेल्या सहाव्या  शाश्वत विकास ध्येयामध्ये (SDGs- Sustainable Developement Goals) सन 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी हे उद्दिष्ट  ठेवले आहे. 
सर्वात वाईट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव नाही.

"प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे" याचा घटनेतील मूलभूत मानवी हक्कांमध्ये समावेश झाला पाहिजे. "जलजीवन मिशन" ची अंमलबजावणी युद्धपातळीवर झाली पाहिजे.

  • सतीश देशमुख
    जी – ६५, आदित्यनगर, गाडीतळ
    हडपसर, पुणे – ४११०२८
    E-mail ID : deshmukhsk29@gmail.com
    Mob : 9881495518
     
  • Log in or register to post comments
  • 6 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,364 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,257 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,275 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,051 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,503 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,415 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,228 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,899 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,124 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,021 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,461 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,307 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,275 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,644 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,287 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,379 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 2889 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    13 hours 24 minutes ago
  • धन्यवाद
    13 hours 25 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    15 hours 4 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    15 hours 7 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    15 hours 9 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
आजचे शेतमालाचे बाजारभाव 1,769
माझे फेसबूक स्टेटस-1 782
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 392
माझे फेसबूक स्टेटस - 2 286
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 274
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 210
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 176
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 166
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 158
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 134
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 133
किती चाटणार भारतपुत्रा? 117
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 99
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 98
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 86
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 85
नागपुरी तडका - ई पुस्तक 85
मातृत्वाचा शृंगाररस 82
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 79
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 78
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,130
माझे फेसबूक स्टेटस-1 181,803
शुभारंभ 134,986
रानमेवा - भूमिका 109,400
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,578
आजचे शेतमालाचे बाजारभाव 94,921
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,561
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,096
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,689
उद्देश आणि भूमिका 77,672
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 74,255
विचारपूस 71,930
गणपतीची आरती ॥३५॥ 67,903
सत्कार समारंभ : वर्धा 66,774
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,376
किती चाटणार भारतपुत्रा? 62,102
जात्यावरची गाणी 56,069
माझे फेसबूक स्टेटस - 2 50,295
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,105
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,491
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini