"ती"
स्वतःलाच पाहून आरशात आज 'ती' थोडी थांबली
तीच्या संघर्षाची व्यथा 'ती'ने मांडली
तीच लक्ष्मी, तीच सरस्वती अन् तीच शक्ती
तरी सर्व बंधनांची तिच्यावर सक्ती
हरवून बसली स्वतःला कामाच्या गर्दीत
कधी नाही उरली कुणाच्या मर्जीत
दिवा नाही ती तर आहे पणती
तरी स्वार्थी जगात 'ती'ची नाही गणती
माहेर आणि सासर दोन्ही तिला सारखी
परी दोन्ही घरांसाठी ती झाली परकी
जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वतःला हरवले
आरशातल्या 'ती'ने आज स्वतःला सावरले
'ती'च्यातल्या 'ती'ने आज स्वतःला गवसले
जगासाठी जगताना स्वतःसाठी जगायचे ठरवले
