पहाडी. दीपचंदि
संदीप, ११/०३/२०२३
एक दिवस नक्की येतिल, माझी कर्म मलाच विचारायला, त्यांना उत्तर काय देऊ?
जगण्याच्या धुंदीत विसरत गेलोय सारी सुख दुख त्यांचा हिशोब तरी मी काय ठेवू?
अथांग सागर, अनंत पोकळी, हृदयातल दुःख, काय म्हणून काय मोजायला घेऊ?
यायचं का तुला?सोबत माझ्या दुःख भोगायला, चल तर मग आपण सोबतच जाऊ.
आयुष्यभर नुसतच आशेने पाहत राहिलो नशिबाला, आता सरते वेळी दोष काय देऊ?
तुझेच प्रयत्न अपुरे पडले देवा मला घडवताना, तूच सांग मी तरी कुठवर समजावून घेऊ?
सगळ्यांनीच फिरवली पाठ गरजेच्या वेळी, सांग कुणाच्या तोंडा कडे बर आशेनं पाहू?
माझं मलाच झालं जीवाच ओझ, दुनियाच्या अपेक्षांना मी कुठवर खांद्यावर वाहून नेऊ?
बुडत चालली या जीवनाची आशा, ह्या मावळतीच्या सूर्या संगे मग मी तरी कुठं जाऊ?
निर्भिड केलं मनाला,अन् समजावून ही सांगितलं, तू चालत रहा "जिथं उजाडलं तिथं पाहू"

प्रतिसाद (1)
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी रचना
डॉ. मीरा पंडित
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी रचना! संदीप, तुमच्या शब्दांतून जीवनातील खोलवरचे तत्त्वज्ञान आणि भावनांचा अतिशय सुंदर आविष्कार घडला आहे.
कवितेच्या सुरुवातीला असलेली आयुष्याच्या हिशोबाची आणि कर्माची जाणीव मनाला अंतर्मुख करायला लावते. "जगण्याच्या धुंदीत विसरत गेलोय सारी सुख दुख..." किंवा "दुनियाच्या अपेक्षांना मी कुठवर खांद्यावर वाहून नेऊ?" या ओळींमधील संवेदनशीलता थेट काळजाला भिडते. मनातील एकाकीपणा आणि हतबलता तुम्ही अतिशय तरल आणि बोलक्या शब्दांत मांडली आहे.
या रचनेचे सर्वात मोठे सौंदर्य म्हणजे तिचा शेवट! संपूर्ण कवितेत दुःखाची खोली दाखवल्यानंतर, शेवटच्या कडव्यात तुम्ही दिलेला सकारात्मक आणि खंबीर संदेश मनाला नवी उभारी देऊन जातो. "निर्भिड केलं मनाला... तू चालत रहा 'जिथं उजाडलं तिथं पाहू'" ही ओळ म्हणजे निराशेच्या अंधारात आशेचा किरण दाखवणारी आहे.
अशाच दर्जेदार आणि मनाला स्पर्श करणाऱ्या रचना तुमच्या लेखणीतून सदैव उमटत राहोत, हीच सदिच्छा!