Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

वाईन इज फाइन पण ....

Main page content

Anil Ghanwat
By Anil Ghanwat | 9:23 AM IST, बुध March 09, 2022

*वाईन इज फाईन पण .....*
अनिल घनवट

महाराष्ट्र शासनाने मॉल मध्ये वाईन विक्रीची परवानगी दिली व महाराष्ट्रभर विरोध, समर्थन, विनोद, कोट्यांना उधान आले. विरोध करण्यात नेहमी प्रमाणे विरोधी पक्ष सर्वात पुढे. हा निर्णय सध्या विरोधात असलेल्या पक्षाने सत्तेत असताना घेतला असता तर आता सत्तेत असलेल्यांनी विरोध केला असता. हा अनुभव अनेक वेळा अनेक विषयां बाबत आलेला आहे. राजकारण्यांना शेतकरी किंवा जनेतेच्या प्रश्नांचं, हिताचं काहीच देणे घेणे नसते. फक्त सत्तेत रहाणे किंवा सत्तेत येणे इतकेच धेय्य असते. असो, त्यांचा धंदा आहे. आपण आपल्या धंद्याचा विचार करू या.
वाईन विक्रीच्या निर्णया बाबत विरोध करणार्‍यात विरोधी पक्ष, काही महिला संघटना व समाजसेवी संस्था व वारकरी सांप्रदायातील काही व्यक्तींचा दिसला. सामान्य नागरीक शांत आहेत. शेतकरी समर्थनात आहेत. द्राक्ष शेतकर्‍यांना समजते की खप वाढला तर त्यांच्या द्राक्षाला किंवा धान्याला चांगले दर मिळणार आहेत. सामान्य नागरिकांना माहीत आहे की ज्यांना प्यायची नाही ते मॉल मध्ये काय पान टपरीवर जरी वाईन विक्रीला ठेवली तरी पिणार नाहीत व ज्यांना प्यायची आहे ते कुठे ही जाऊन पिणार आहेत. ज्या राज्यांमध्ये व जिल्हयांमध्ये दारूबंदी आहे किंवा होती त्या राज्यां मध्ये सर्वात जास्त गावठी दारू पिली जाते. कुठे सरमाडी, कुठे खर्रा,कुठे हातभट्टी, कुठे खोपडी, कुठे आणखी काही नावाने हे पेय्य उपलब्द्ध होत आहे. दारूबंदी असलेल्या गुजरात मध्ये खोपडी पिऊन अनेक लोक मेल्याच्या बातम्या आधुन मधून येतच असतात. मग किमान १००० चौरस फूटाच्या मॉल मध्ये वाईन विकली तर काय बिघडलं? सिगरेट प्रत्येक पान टपरीवर मिळते, किराण दुकानात मिळते म्हणुन सर्व गाव सिगरेट पिते आहे असे काही झाले नाही मग मॉल मध्ये वाईन वकली तर सगळा समाज व्यसनाधीन होईल हा कसला तर्क?
वाईन पाण्यासारखीच आहे हे म्हणणे जसे चूक आहे तसे वाईन म्हणजे दारू आहे हे म्हणणे सुद्धा चूकच आहे. अनेक राज्यांमध्ये घराघरात वाईन तयार केली जाते व बाया पोरांसह सर्व तिचा आस्वाद घेतात. वाईन ही अॅपिटायझर म्हणुन घेतली जाते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. भारतात हे धनिक लोकांचे पेय्य आहे. यात नशा कमी. आपल्या कडे रम, विस्की हे अधीक अल्कोहोल व नशा असलेली दारू सर्वत्र उपलब्ध आहे. किराना दुकानात नसली तरी दुकाने आहेतच लोक रांगा लावून ती विकत घेतात. पितात.
मर्यादे पलिकडे नशा करणे घातक आहे, त्याचे समर्थन करणे योग्य नाही, करू नये. मर्यादे पलीकडे चहा पिणे सुद्धा मानवी प्रकृतीला घातकच मग तिची किराना दुकानातली विक्री बंद करायची का?
भारतात वाईनचे सेवन वेदिक काळा पासून सुरु असल्याचे दाखले आहेत. अगदी इंद्राच्या दरबारात सोम रसाचे सेवन जाहिर रित्या केले जाते. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले एक रत्न आहे. यात वाईट काय आहे? अतीसेवन वाईटच मग ते कशाचे ही असो. एका ह.भ.प.ने वाईन विक्री बाबत बोलताना अकलेचे तारे तोडले. दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात दखलअंदजी केली व माफी ही मागितली. खरे तर ज्यांनी कुठली नशा केली नाही अशांनी समजाचे जीवन सुकर व्हावे यासाठी काही योगदान दिल्याचे दिसत नाही. ज्यांनी वेगवेगळे शोध लावून मानव जिवन सुकर व सुसहाय्य केले ते बहुतेक वाईन घेत किंवा थोडीफार नशा करत असत हे पहायला मिळते. आज देशातील बहुतेक उच्च पदस्त अधिकारी, मंत्री, न्यायाधीश, उद्योगपती, पोलीस अधिकारी, कालाकर सर्व वाईनच नाही तर बीअर, रम, व्हिसकी, स्कॉच सारखी मद्ये घेतात. भारतीय सैन्याला तर अधिकृत नियमत पुरवठा केला जातो. ही गोष्ट इतकी वाईट असती तर हे केले असते का?
शेतकर्‍यांनी वाईन विक्रीची व्याप्ती वाढण्याचे समर्थन केले आहे. याचे प्रमुख कारण आहे शेतकर्‍याचे व्यापार स्वातंत्र्य, उद्योग स्वातंत्र्य. वाईन फक्त द्राक्षा पासूनच नाहीतर अनेक फळांपासून व गहू, तांदूळ, नाचणी सारख्या पिकां पासून ही तयार केली जाते. तिचा खप वाढला तर दोन पैसे जास्त मिळतील ही एक आशा. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर याचा बराच परिणाम होईल. देशात ११० वाईनरीज आहेत त्यापैकी ७२ महाराष्ट्रात आहेत. देशात ३४,००० हेक्टर क्षेत्र वाईनसाठीच्या द्राक्षांच्या लागवडीखाली आहे. १७ दशलक्ष लिटर वाईनचे उत्पादन दरसाल होते. १५० दशलक्ष अमेरिकन डोलरची आपली बाजारपेठ आहे. या पैकी ७०% वाईन भारतात तयार होणारी आहे व ३०% वाईन ऑस्ट्रेलिया व युरोपियन युनियन मधून आयात केली जाते. भारतातून ही काही देशांना वाईनची निर्यात होते.
उच्चवर्गातील लोक आयात केलेली वाईन, प्रतिष्ठचे प्रतिक म्हणुन पितात पण ती तुलनेने बरीच महाग असल्यामुळे सर्वसाधारण लोक भारतीय वाईनलाच प्राधान्य देतात. वाईनचा प्रसार व्हावा म्हणुन वाईन टूरीझमचे प्रयोग होत आहेत. नाशिकची सुला वाईन दर्जेदार वाईन म्हणुन ओळखली जाते व ते भारतातील सर्वात मोठे वाईन उत्पादक आहेत.
वाईन किराना दुकानात विकली गेली तर याचा फायदा थेट शेतकर्‍यां पर्यंत पोहोचेल का अशी रास्त शंका काही मंडळींनी उपस्थित केली आहे. महाराष्ट्रातील राजकारण व शेती आधारित उद्योगांचा इतिहास पाहिला तर हे सर्व उद्योग काही राजकीय घराण्यांच्या ताब्यात आहेत. साखर, दूध उद्योगात खाजगीकरण आले तरी उसाचे व दुधाचे दर बारामतीतूनच ठरतात असे जनतेचे म्हणणे आहे. वाईन उद्योग सुद्धा बारामती मध्ये रुजला आहे व तेथूनच नियंत्रण हण्याची शक्यता आहे. वाईन मॉल मध्ये विकली तरी त्याचा फायदा शेतकर्‍यांपर्यंत पोहोचेल की नाही या बाबत शंका घयायला वाव आहे. शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांनी १९८०च्या दशकात वाईनरी सुरु केली होती. त्यांची अडवणूक या राजकारणयांनी केली होती पण ते पुरून उरले. एक महिन्यापुर्वी त्यांच्या वाईनरिला भेट देण्याचा योग आला होता. आता व्यवसायाचा बराच विस्तार झालेला दिसला. राजकारण्यांचा हस्तक्षेप व नियंत्रण जर थांबले तरच वाईनचा नफा शेतकर्‍यां पर्यंत पोहोचेल नाहीतर ऊस व दुधाच्या शेतकर्‍यांसारखे यांचे गुलाम बनून रहावे लागेल. शेतकर्‍यांनी आपल्या शेतात पिकलेल्या मालावर प्रक्रिया करून, मुल्यवर्धन करून विकले तरच त्या पिकाचा रास्त भाव मिळू शकतो. वाईन उद्योग हा त्याचा एक मार्ग आहे. वाईन विक्रीत खुलेपणा येणे चांगले पण त्याचा फायदा मुठभर राजकारणी किंवा उद्यगपतीं पर्यंत मर्यादित न रहाता शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा.
०६/०२/२०२२

अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 2302 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Rajshree
  • RANGNATH TALWATKAR

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 90 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    23 minutes 16 seconds ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    4 hours 7 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    4 hours 11 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    4 hours 14 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    4 hours 15 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 27
रानामधले शेर...! 25
किसान क्रांती 19
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 18
माझे फेसबूक स्टेटस-1 17
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण 17
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 15
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 15
गझल 13
विचारपूस 13
शुभारंभ 12
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे! 12
दुष्काळ... 12
भुलाबाई कशी दिसते 12
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 12
आम्ही शेतकरी... 12
पोळ्याच्या झडत्या 11
लोकशाहीचा अभंग 11
शरद जोशी 11
शेतकरी पात्रता निकष 10
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,520
नियमावली 44,842
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,204
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,851
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,834
शरद जोशी 40,791
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,132
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,080
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,595
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,078
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,064
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,815
गरीबी कशामुळे? 36,090
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,751
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,671
आईचं छप्पर ।।१०।। 34,578
रे नववर्षा 33,808
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,335
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,360
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,339
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini