Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

पहिल्या शेतकरी - स्त्री कवी संमेलनाचा वृत्तांत

Main page content

By Dr. Ravipal Bh… | 1:30 PM IST, बुध April 07, 2021

पहिल्या शेतकरी - स्त्री कवी संमेलनाचा वृत्तांत

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रावेरी, जि. यवतमाळ येथे होऊ घातलेले यावर्षीचे ७ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन हे प्रत्यक्षात होऊ शकले नसून त्यास पर्याय म्हणून आभासी/ ऑनलाईन पद्धतीने झूम व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरू असलेल्या 'वेब मिलन सप्ताहाचे' आज दिनांक २१/०३/२०२१ ला दुसरे पुष्प 'शेतकरी - महीला' कवी संमेलन" गुंफण्यात आले. झूम मीटिंग व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साकारण्यात आलेले हे कवी संमेलन श्रोत्यांना खरेच खूप आनंद देऊन गेले व ते साक्षात मंचावर होत आहे की काय असे जाणवले. सदर कवी संमेलनाला अध्यक्ष म्हणून अनुपमा जाधव तर सूत्रसंचालक म्हणून कुमारी लक्ष्मी बल्की हे लाभले.

भूषण तांबेकर (ठाणे) यांच्या "शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदा" या अत्यंत सुंदर अशा कवितेने सुरू झालेल्या सदर कवी संमेलनात अध्यक्षांसह ऐकून नऊ कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून अक्षरशः श्रोत्यांची मने जिंकली. हिंमत ढाळे (अकोला) यांनी, "आठवण" ही कविता सादर करून लहानपणी घरी असलेल्या पारिवारिक एकोप्याची जाणीव करून दिली. व त्या आठवणींनी कसा आजही अंगावर काटा येतो अशी मार्मिक भावना आपल्या कवितेतून व्यक्त केली. त्यानंतर आलेल्या तुळशीराम बोबडे (अकोला) यांनी, महिला विश्व विषयक सादर केलेल्या आपल्या कवितेतून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण केवळ बोलतो पण कृती मात्र काहीच करत नाही असे सांगितले.

त्यापाठोपाठ आलेल्या तेजस आंबाखाये (यवतमाळ) या वयाने अतिशय तरुण असलेल्या कवीने शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाविषयी त्याला पडलेले प्रश्न आपल्या कवितेतून मांडले. डॉ. सुनील पखाले (वर्धा) यांनी, "टीस" या आपल्या कवितेतून 'हाताच्या फोडावाणी मायी वाढवली पोरं, आता गिधाड नजरेचा लागला जिवाला या घोरं", या ओळी सादर करीत आपल्या मनाची अस्वस्थता उपस्थित केली. ऍड. सुशांत बारहाते (हिंगणघाट) यांनी, संकटांशी लढण्यासाठी आता मी तैय्यार आहे, असे सांगणारी धाडसी वृत्तीची, "साथ अपेक्षित आहे" ही कविता सादर केली. त्यानंतर आलेल्या संदीप धावडे (वर्धा) यांनी, शेतकऱ्यांच्या जीवनावर एक भन्नाट कविता सादर केली. "घे पोट्ट्या घे, ते सरकीचं पाकीट घे.. घ्या दोन दोन सासं, अन पेरा आपलेच श्वासं" या त्यांच्या ओळी श्रोत्यांच्या अंतरंगात कोलाहल मचवून गेल्या.

त्यानंतर सुत्रसंचालिका कुमारी लक्ष्मी बल्की (यवतमाळ) यांनी, "बाप - अश्रू" ही आपली कविता सादर करून श्रोत्यांच्याही नयनात पाणी आणलं. शेवटी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मुटे सरांनी, "सच्चे दिन म्हणता म्हणता लुच्चे दिन आले, अन् शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले" ही आक्रोश - पूर्ण कविता सादर केली व सदर कवी संमेलनाची यशस्वी सांगता झाली.

सदर कवी संमेलनाच्या अध्यक्षा, अनुपमा जाधव (पालघर) या तांत्रिक अडचणींमुळे कार्यक्रमात भाग घेऊ शकल्या नाहीत.

- डॉ. रविपाल भारशंकर

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 2975 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 7 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 6 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 6 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 6 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 6 hours ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    2 days 6 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
दुष्काळ... 12
मास्क आणि ती.... 12
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 11
हंबरून वासराले चाटते जवा गाय 10
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 10
भाजीपाल्याच्या भावात, कोरोना गावात : करोना माहात्म्य ||७|| 9
शेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०११ 9
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 9
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 9
छंदमुक्त कविता- धावपट्टी 8
युगात्म्याची कविता 8
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 8
फुलू दे शिवारी 8
जात्यावरची गाणी 8
कविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं' 8
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 8
शेतक-यांचा राजा बळीराजा 8
दुःखात राहतो मी 8
आम्ही शेतकरी... 8
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल 8

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,509
नियमावली 44,818
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,149
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,822
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,738
शरद जोशी 40,744
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,115
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,057
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,546
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,046
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,045
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,799
गरीबी कशामुळे? 36,067
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,616
आईचं छप्पर ।।१०।। 34,525
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,021
रे नववर्षा 33,748
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,297
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,271
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,267

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini