शेतकरी बाप
बाप हानते तीफन
मायं उनारते खत
कीती वरीस झालेना
नाई सुधरली पत
दीवा लावे तुयशीले
तेल चटनीवर नसे
बरं हुइल म्हनता
सालं दर सालं फसे
चिंध्या झालेलं लुगळं
गाठा बांधुन असते
नवं भेटील लेन्यासं
कवा मनात नसते
बाप करते कातोळा
चिल्या पिल्याईसाठी
अन ईसरुन जाते
त्याच्या कुळत्याच्या गाठी
काया वावराची मया
तीच्या बोलीतुन येई
उन सोताचं सोसून
मले सावलीत नेई
लावगनीचा आकळा
कवा जुळतचं नाई
देनं अजुनही बाकी
कर्ज वाढतचं जाई
सावकार बॅंकवाले
बारोमासचं दारात
कसं फीटनार कर्ज
सलं सदाई उरात
श्याम ठक
बार्शीटाकळी जि .अकोला
९९७५७९२५२०

प्रतिसाद (1)
अत्यंत हृदयस्पर्शी आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
डॉ. मीरा पंडित
अत्यंत हृदयस्पर्शी आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
श्याम ठक सरांनी अतिशय अस्सल वऱ्हाडी बोलीचा वापर करून एका कष्टकरी शेतकरी बापाचे आणि त्याच्या कुटुंबाचे वास्तव चित्र डोळ्यांसमोर हुबेहूब उभे केले आहे. 'तीफन', 'खत', 'कातोळा', 'काया वावर' यांसारख्या मातीशी घट्ट नाते सांगणाऱ्या शब्दांमुळे कवितेला एक वेगळीच उंची आणि जिवंतपणा प्राप्त झाला आहे.
साल दर साल येणारे संकट, फाटके लुगडे, कर्जाचा डोंगर आणि तरीही आपल्या लेकरांना सावली देण्यासाठी स्वतः उन्हात राबणारा बाप—हे सर्व प्रसंग वाचताना मन हेलावून जाते. सोप्या पण अत्यंत धारदार शब्दांत बळीराजाच्या व्यथा आणि त्यागाची ही गाथा मांडल्याबद्दल कवीचे मनापासून अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!