Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

पाणी लाऊन हजामत

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:36 PM IST, गुरू August 01, 2013
पाणी लाऊन हजामत



गुदस्ता पाऊस आलाच नव्हता

कुठं पडला, कुठं पडलाच नव्हता

पीक उगवलंच नव्हतं

जे उगवलं ते जगलंच नव्हतं

जे जगलं ते वाढलंच नव्हतं

जे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं

निसर्गानंच केली होती! हजामत केली होती!! बिनापाण्यानं केली होती!!!



सरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं

आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं

घेन्न! आता कसं वाटsssssते?

आम्ही म्हणालो होतो

मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!



पण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं

मात्र ते मख्ख होतं, ते बोल्लंच नव्हतं

हात काही त्यानं पसरलाच नव्हता....!



औंदा मात्र पाऊस आला

जिकडेतिकडे कहर झाला

डोंगर-दर्‍या हुदडत गेला

छाती फोडून दरवाजा केला

उभं पीक वाहून गेलं

जे वाहवलं नाही ते दबून गेलं

जे दबलं नाही ते कुजून गेलं

जे कुजलं नाही ते सडून गेलं

जे सडलं नाही ते मरून गेलं

निसर्गानंच केली! हजामत केली!! पाणी लाऊन केली!!!



सरकार आलं, मुठभर घेऊन आलं,

आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं,

घेन्न! आता कसं वाटsssssते?

आम्ही म्हणालो,

मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!



पण एक येडं होतं, सर्वांच्या मागं होतं

हात काही त्यानं पसरलाच नाही....!

मात्र ते मख्ख नव्हतं, आता ते बडबडत होतं

स्वत:शीच पुटपुटत होतं



"च्यामारी! आयला!! च्यामायला!!

जवा-जवा पिकलं, भरमसाठ पिकलं

तवा-तवा ह्यांनी, सस्त्यामधी लुटलं

रुपयाचा शेतमाल चार आण्यात नेला

म्हून माहा धंदा घाट्यामंधी गेला

ह्यांच्यापायी लक्षुमीवर अवदसा आली

गावासंग ग्रामदेवता पुरी भकास झाली"



"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं

कणभर मदतीची भीक मागत सुटणं"



"अरे छी! अरे थू!! असल्या जिंदगीवर

भिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर"



येडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो

मात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो



                                             - गंगाधर मुटे ’अभय’

---------------------------------------------------------
ग्रामीण
शेतकरी
शेतकरी काव्य
shetkari
Farmer
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
मार्ग माझा वेगळा
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
कविता
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेत्कर्याच्या वेदनान्चि जानिव

महादेव कापुसकरि (-)

शुक्रवार, August 2, 2013 - 13:01
Permalink
New

शेत्कर्याच्या वेदनान्चि जानिव असनारे लोक या भारत देशाच्या पाठिवर अतिशय अल्प प्रमानात आहेत हे खरे दुर्दैव आहे. आनि शासन आनि सत्ताधारि ( मग ते कोनत्याहि पक्शाचे असोत ) सर्व समजत असतानाहि जानिवपुर्वक डोळेझाक करतात त्यामुळे हा घटक स्वातन्त्र्यपुर्व काळापासुनच सर्वात उपेक्शित राहिला आहे.आपल्यासारखे मोजकेच लेखक या उपेक्शितान्चे दु:ख जानुन त्यान्च्याविशयि लिहितात हेहि नसे थोडके !

  • Log in or register to post comments
धन्यवाद

गंगाधर मुटे

मंगळवार, August 13, 2013 - 21:19
Permalink
New

धन्यवाद महादेवराव कापूसकरी सर.

  • Log in or register to post comments

In reply to शेत्कर्याच्या वेदनान्चि जानिव by महादेव कापुसकरि (-)

"हक्काचं टनभर सरकारवर

कविता गोरे

मंगळवार, November 4, 2014 - 12:56
Permalink
New

"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं
कणभर मदतीची भीक मागत सुटणं"
"अरे छी! अरे थू!! असल्या जिंदगीवर
भिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर"
येडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो
मात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो

  • Log in or register to post comments
धन्यवाद

गंगाधर मुटे

मंगळवार, November 4, 2014 - 13:26
Permalink
New

धन्यवाद कविता गोरे
या कवितेची आठवण काढून दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. :namo:

कविता लिहिल्याच्या दिवसापासून पुन्हा मीच वाचली नव्हती. अशा अनेक कविता/लेख आहेत की ते पुन्हा वाचायची मी हिंमत करू शकत नाही.

आज ही कविता फेसबूकवर शेअर करत आहे. :)

  • Log in or register to post comments

In reply to "हक्काचं टनभर सरकारवर by कविता गोरे

(विषय दिलेला नाही)

कविता गोरे

मंगळवार, November 4, 2014 - 13:27
Permalink
New

:)

  • Log in or register to post comments
ज्वलंत!

अत्रुप्त आत्मा

मंगळवार, November 4, 2014 - 15:12
Permalink
New

ज्वलंत!

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 11270 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • निलेश देवकर
  • admin
  • sanket111

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 200 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    21 seconds ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    43 minutes 7 seconds ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    13 hours 33 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 4 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 4 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
मातृत्वाचा शृंगाररस 12
दुष्काळ... 12
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 12
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल 12
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 11
विचारपूस 11
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 11
फुलू दे शिवारी 10
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 10
प्रतिनिधी उपस्थिती आणि सहभाग नोंदणी - १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 10
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे! 10
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 10
बा बळीराजा 10
मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 9
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण 9
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 9
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 9
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 9
गझल 9
शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार 9
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,511
नियमावली 44,825
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,163
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,828
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,766
शरद जोशी 40,757
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,117
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,062
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,560
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,050
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,046
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,803
गरीबी कशामुळे? 36,072
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,620
आईचं छप्पर ।।१०।। 34,528
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,318
रे नववर्षा 33,751
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,301
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,280
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,272
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini