पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
""""""""""बळीराजा""""""""""
माया पयाटीनं तुरीनं लावला माया जीवाले बेज्जा घोर.. म्हटल आता बळीराजा बनशील कास्तकाराचा पोरं...! ||1||
पयाटी तं माई सुरवातीला जशी होती चंद्राची कोर.. आता पडली माई पयाटी बुळापासुन पुर्ण लालभोर...! ||2||
गेला तीच्यावर आता लाल्या माया जीवाले लावला घोर.. अशी माई पयाटी होती लहान बोंडे होते तीले भरपुर महान...! ||3||
अशी माया पराटीची गाथा सांगता सांगता सरत नाई.. तुरीच पिक मले आता कसच काही पुरत नाही...! ||4||
अवंदा लावला पिकानं बळीराजाच्या गळ्याले दोर.. ईचार करुण थकला बळीराजा शेवटी झाडाला बांधतो वावरातचं नायलाँनचा दोर...! ||5||
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.