देशात राहतो मी
पेरून एक दाणा पोत्यात मोजतो मी
कित्येक या जगाच्या पोटास पोसतो मी
आलीत संकटांची कित्येक वादळे ही
झोपून शासनाची औलाद पाहतो मी
नाहीच मंदिराच्या मूर्तीत देव आता
रंकात सापडावा तो देव शोधतो मी
ध्येयात शासनाच्या आली इथे तिजोरी
लाभांश ठेवण्याची जागाच धुंडतो मी
पाठीत खंजराचे कित्येक वार झाले
माझ्याच माणसांचे आघात झेलतो मी
सत्तेपुढे शहाणे लाचार मेंढरे ही
मानाच वाकलेल्या देशात राहतो मी
डॉ.गिरीधर शं. काचोळ,
हिंगणघाट
मो.नंबर - ९७६५०३८६२४
