Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

सातवे अ.भा.मराठी गझल संमेलन, आष्टगाव

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 3:35 PM IST, सोम February 11, 2013
मराठी गझल
सातवे अ.भा.मराठी गझल संमेलन, आष्टगाव 




                  गजल सागर प्रतिष्ठान तर्फे मोर्शी तालुक्यातील आष्टगाव (जि. अमरावती) येथे उभारलेल्या सुरेश भट गजलनगरीत दि. ९ आणि १० फेब्रुवारी २०१३ रोजी सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आष्टगाव हे गझलनवाज श्री भिमराव पांचाळे जन्मगाव आहे. अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद सोनेवाने तर उद्‌घाटक म्हणून गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे अध्यक्ष आणि दुबईच्या मिटकॉन इंटरनॅशनल चे संचालक डॉ.संदीप कडवे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके, उर्दूचे प्रख्यात शायर जनाब नसिम रिफअत ग्वालियरी, मुंबई येथील विक्रीकर सहआयुक्त सुभाष येंगडे तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन जोशी, आष्टगावच्या सरपंच कांताबाई इंगळे, आमदार ऍड. यशोमती ठाकूर, आमदार डॉ. अनिल बोंडे, गजलकार ए. के. शेख, सिद्धार्थ भगत, अमर हबीब, संमेलनाचे निमंत्रक गजलनवाज भीमराव पांचाळे व्यासपीठावर विराजमान होते.


Bhimrao Panchale
सुरेश भट गजलनगरी


                  यावेळी गजलनवाज भीमराव पांचाळे म्हणाले, आपण ज्या गावात वाढलो, ज्या डोंगरदर्‍यांमधून फिरलो, ज्या गावात आपल्याला आद्यस्वर गवसला, त्या गावात संमेलन व्हावे, अशी माझी इच्छा होती. जात्यावरचे आईचे गाणे हाच माझा आद्य स्वर होता. आईच्या मांडीवर डोके ठेवून गाणे ऐकताना मी झोपी जायचो. शिवरात्रीला सालबर्डीला जाणार्‍या भाविकांच्या ‘महादेवा जातो गा...’ या पहाडी स्वरांनी मनात घर केले. आपली पत्नी गोव्याची. मात्र तिला आपल्यापेक्षाही या गावाची ओढ अधिक. गावकरी, मित्र यांच्या सगळ्यांच्या आग्रहातून हा विचार समोर आला आणि हे संमेलन आज आष्टगावात होत असल्याचे भीमरावांनी सांगितले. ४२ वर्ष आपण गजल गात आहोत. हा प्रवास आज निर्णायक वळणावर आला असल्याचेही भीमराव पांचाळे यांनी स्पष्ट केले.

गझलनवाज
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुरेश भटांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.



                  न्यायाधीश मदन जोशी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रख्यात शायर नसीम रिफअत यांनी शेरोशायरी सादर केली. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुरेश भटांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रास्ताविकातून गज़लनवाज भीमराव पांचाळे यांनी आपल्या गावच्या मातीची ओढ म्हणून आष्टगावात संमेलन घेण्याचा माझा मनोरथ या संमेलनानिमित्ताने पूर्ण होत असल्याची भावना व्यक्त केली. पहाडी रागातील "महादेवा जातो गाऽ' या ओळी गुणगुणून त्यांनी सभागृह आपल्या सुरेल स्वरांनी भारावून टाकले.

                  याप्रसंगी "गज़लसागर'च्या गज़लसंमेलन विशेषांकाचे तसेच "मराठी गज़ल : सुरेश भटांनंतर' या प्रातिनिधिक गजलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. दुबईकरांच्या वतीने भीमराव पांचाळे यांचा संदीप कडवे यांच्या हस्ते; तर लाखनीवासींतर्फे संमेलनाध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने यांचा प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



भिमराव पांचाळे
 याप्रसंगी "गज़लसागर'च्या गज़लसंमेलन विशेषांकाचे तसेच "मराठी गज़ल : सुरेश भटांनंतर' या प्रातिनिधिक गजलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.


                      सातव्या अ. भा. मराठी गज़लसंमेलनाच्या उद्‌घाटकीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना वसंत आबाजी डाहाके यांनी आष्टगावसारख्या छोट्याशा खेड्यात अखिल भारतीय स्तरावरचे मराठी गज़लसंमेलन होणे हा अपूर्व योग असल्याचे म्हटले. गज़ल मराठीत आणण्याचे खरे श्रेय सुरेश भटांचेच, असे सांगून गज़ल हा रूपबंध जे मागतो, त्या दिशेकडे वळणे खरोखर कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
                        खास दुबईहून गज़लसंमेलनाकरिता आलेले संदीप कडवे यांनी आपल्या उद्‌घाटकीय भाषणात बोलताना गज़लचे माहेर आखातात असल्याने पुढचे अखिल भारतीय मराठी गज़लसंमेलन आखातात झाल्यास गज़ल आपल्या माहेरी आल्यासारखे होईल, असे प्रतिपादन केले. आखातात मराठी गज़लसंमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत, असे त्यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
                       गज़लचे शब्द विश्‍वशांती व राष्ट्रशांतीचे दूत व्हावेत; तसे ते क्रांतीची मशालही व्हावेत. आमची गज़ल ही वर्तमानातील प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सूक्ष्मदृष्टीने विचार करण्यासाठी तत्पर असली पाहिजे. समाजातील दुःख, दैन्य व दारिद्य्र पाहून ती कळवळली पाहिजे, अन्याय पाहून ती चिडली पाहिजे, त्याविरोधात झुंजली पाहिजे व पेटून उठली पाहिजे, असे प्रतिपादन सातव्या अखिल भारतीय मराठी गज़लसंमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने यांनी व्यक्त केला.


Marathi Gajhal
एक चिमुकली गझल सादर करताना





gazal
गझल मुशायरा



गझलनवाज
गझलनवाज भिमराव दादा आणि जेष्ठ गझलकार ए.के.शेख यांच्यासोबत गझलकार सुप्रिया जाधव, प्राजक्ता पटवर्धन आणि गंगाधर मुटे


------------------------------------------------------------------------------------------------------------
सातव्या अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलनाच्या निमित्ताने मराठी गझल समेलन विशेषांक काढण्यात आला.

अंक वाचण्यासाठी अंकावर क्लिक करा.

पाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा.

------------------------------------------------------------------------------------------------------------

या संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात मी ही हजल सादर केली होती. त्याची ही चित्रफ़ित.


----------------------------------------------------------------------------------------
गंगाधर मुटे
मराठी गझल
मराठी गजल
सातवे अ.भा.मराठी गझल समेलन
भिमराव पांचळे
गझलनवाज
सुन्दर............ पुस्तक

अतिथी सदस्य (-)

बुधवार, February 27, 2013 - 18:09
Permalink
New

सुन्दर............

पुस्तक कुथे मिलेल क्रुपया कलवावे....

  • Log in or register to post comments
गझल हा सुरेश भटानंतर.... हा

गंगाधर मुटे

बुधवार, February 27, 2013 - 18:59
Permalink
New

गझल हा सुरेश भटानंतर....
हा प्रातिनिधीक गझलसंग्रह गझल सागर प्रतिष्ठान यांचेकडे मिळू शकेल.

ऑनलाईन विशेषांक मात्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घ्यावा लागेल.

  • Log in or register to post comments

In reply to सुन्दर............ पुस्तक by अतिथी सदस्य (-)

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 10943 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • millennialpillow
  • Subhash.patil

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 295 *
Who's new नवीन सदस्य
  • millennialpillow
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 4 hours ago
  • धन्यवाद
    1 day 4 hours ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    1 day 5 hours ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    1 day 5 hours ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    1 day 5 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 102
गझल 101
आईचं छप्पर ।।१०।। 101
वरुणा ! वरुणा ! 100
गरीबी कशामुळे? 99
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 98
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 97
पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा 97
उपद्रवी जिवाणू 97
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 97
सटवाई 96
मोती असे गळाले.. 95
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल 92
हालहाल पोचलेत कुंचल्यातही तुझे 92
हरवलेल्या पोळ्याचे संदर्भ 92
२ रे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन 92
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 92
भारत कशाला म्हणतात! 92
गज़ल : विळखा अरे ऋणाचा 92
मातीतल्या बियाला 91

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,501
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,276
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,994
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,968
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,837
वादळाची जात अण्णा 31,725
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,620
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,390
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,294
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 30,189
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,994
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,645
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,376
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 29,073
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,193
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,758
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,600
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,081
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,921
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,400

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini