Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

वळीव : प्रा. संजय आघाव यांच्या कवितेतील अस्सल ग्रामीण शब्दरचना

Main page content

मुक्तविहारी
By मुक्तविहारी | 8:50 PM IST, शुक्र October 15, 2021
कवितेचे रसग्रहण

कवितेचे रसग्रहण

वळीव : प्रा. संजय आघाव यांच्या कवितेतील अस्सल ग्रामीण शब्दरचना

वळीव

येता वळीव पाऊस वारा उधळीतो खूर
कोकिळेची कुहू - कुहू मध्ये मिसळीते सूर

वारा उधळीतो खूर गंध मातीचा पोटात
पक्षी झुरती रानात गानं घेऊन ओठात

चिंब धरणी नाहते जड भरल्या थेंबात
गर्द हिरव्या कोंबाचा शालू नेसते अंगात

नदीनाल्या पाणी पाणी साचं डचांग डबकी
भरे कोवळ्या पानाची नंग्या खोडाला झुपकी

ये जांभळ्या मेघातून सोन सावली शिवारा
हे दान ज्या देवाचं त्याचा उजळ देव्हारा

- प्रा. संजय आघाव

'चैत्रपालवी' या कवितासंग्रहातील प्रा. संजय आघाव यांची 'वळीव' ही कविता. मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील दौनापूर गावात वास्तव्यास असणाऱ्या संजय आघाव यांच्या एकूणच कवितेत ग्रामीण परिसर, शेती व शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण आल्याचे दिसून येते. त्यांच्या कवितेच्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अस्सल ग्रामीण शब्दयोजना! ओढून ताणून ग्रामीण बोलीतील शब्दयोजना न करता सहज अनुभूतीच्या पातळीवर त्यांची कविता वावरताना दिसते. जगलं भोगलेलं मांडताना संजय आघाव यांची कविता मुख्यत्वे मातीचे गाणे गाताना दिसून येते. कित्येक पिढ्यांची मेहनत या काळ्या मातीसाठी दिलेली असल्याने "मातीच्या केसात । विंचरावं कोणी ।। ज्याच्या हाती फणी । नांगराची" असे कवी 'चैत्रापालवी' संग्रहातील 'मातीच्या केसात' या कवितेत म्हणतो.

वळवाच्या पावसाचे वर्णन सदरील 'वळीव' कवितेत कवीने अत्यंत खुबीने केले आहे. मान्सून उंबरठ्यावर आल्याची वर्दी देण्यासाठी आलेल्या पावसाला वळीव म्हणतात. गरजणारे ढग आणि कडाडणाऱ्या विजा हे त्याचे साथीदार! दुपारपर्यंत वातावरण चांगलंच तापतं. अगदी नको नको होतं. त्यानंतर वळीव तडाखा देतो. धो धो कोसळतो. हा कधी सरळ नसतो. वाकडा, तिरका, वाट्टेल त्या दिशेनं येतो. रस्त्यांवर पाणी साठवून–घरांमध्ये शिरून दाणादाण उडवतो. सोबतीला वाऱ्याला घेऊन काही झाडं आडवी करतो. पिकं झोपवतो. जमलंच तर विजा पाडून चार–दोन बळीसुद्धा घेतो. एकाच झपाट्यात ढग रिकामा आणि आकाश पुन्हा नागवं! वळीवाचा पाऊस जेव्हा रानामध्ये धिंगाणा घालायला येतो तेव्हाची रानाची अवस्था कवीने या कवितेतून खूप सुंदर वर्णन केलेली पाहायला मिळते. वाचक अगदी अंतर्मुख होऊन वाचत राहतो. खूर उधळीत पळणाऱ्या बैलाप्रमाणे वळीवाच्या पावसात वारा थैमान घालत येतो. त्यामध्ये कोकिळेची कुहू-कुहूच्या सुरात घेतलेली तान मिसळते. वळविवाच्या पावसाने ओली झालेली माती गंधित होते. ओल्या मातीचा गंध अशावेळी सगळीकडे पसरतो. ओठांत गाणे घेऊन पक्षी रानात झुरतात. मातीच्या पोटातील मृद्गंध वाऱ्याच्या खुराने आसमंतात उधळला जातो. मृद्गंधाने वातावरण सुवासिक होते. वातावरणात एकप्रकारचे चैतन्य निर्माण होते. दिशादिशांत आनंद भरून राहतो. अशा प्रकारे वळीवाच्या पावसाच्या आगमनाने वसुंधरा चैतन्यमय होऊन जाते.

भरलेल्या जाड अशा टपोऱ्या थेंबांनी जेव्हा पावसाचे रानात आगमन होते तेव्हा धरणी चिंब भिजून न्हाऊन निघत असते. आणि हळूहळू तिच्या अंगावर ती गर्द हिरव्या रंगाचा शालू नेसते. म्हणजे सगळीकडे हिरव्यागार गवताच्या शालीने वसुंधरा सजून नटलेल्या नव्या नवरीप्रमाणे शृंगारिक झालेली पाहायला मिळते. धरणीवर फुटलेले हिरवे हिरवे कोंब धरणीला नवता प्रदान करतात. नदीनाल्यांना पाण्याचा प्रवाह वाढतो. जागोजागी 'डचांग डबकी' साचतात. 'साचं डचांग डबकी' म्हणजे काठोकाठ भरून खड्ड्यात पाणी साचून राहते. इथे ग्रामीण बोलीभाषेतील दुर्मिळ शब्द आले आहेत; जे की आज सहसा कुठेही वापरले जात नाहीत. ग्रामीण भागातील लोप पावत जाणाऱ्या शब्दांना पुनरुज्जीवन देण्याचे काम प्रा. संजय आघाव यांची कविता करताना दिसून येते. 'भरे कोवळ्या पानाची नंग्या खोडाला झुपकी' या ओळीतून निसर्गाच्या सृजनशीलतेचे खूप सुंदर वर्णन केलेले आढळते. पर्णविरहित खोडाला वळीवाच्या पावसानंतर ठिकठिकाणी कोवळ्या पानांची झुपकेदार हिरवळ बहरताना पाहायला मिळते. याठिकाणी कवीची निरीक्षणक्षमता उत्तम असल्याचे यावरून सांगता येईल. 'ये जांभळ्या मेघातून सोन सावली शिवारा' या ओळीत कवीने जांभळ्या मेघांतून येणाऱ्या सावलीला 'सोन सावली' असे म्हटले आहे. जांभळ्या मेघांतून जणू सोन्याची सावली शिवारावर पडते आणि सारं शिवार सोनेरी होऊन जातं! असे कवीने 'सोन सावली'च्या माध्यमातून सांगितले आहे. यानंतर शेवटी कवी म्हणतो, 'हे दान ज्या देवाचं त्याचा उजळ देव्हारा'... यावरून असे म्हणता येईल की, "हे जे काही दान ज्या देवासाठी दिले आहे त्या शेतकऱ्याचा, कुणब्याचा देव्हारा उजळून दे!' भरभरून दान त्याच्या पदरात पाडून त्याला जगातील सर्व सुखांचा भागीदार कर!" अशी विनवणी कवी या कवितेच्या माध्यमातून विधात्याकडे करताना दिसतो.

ग्रामीण भागातील शेतकरी सर्वतोपरी निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडलेला असतो. स्वतःच्या हाती जे काही आहे तेवढे करून तो निसर्गाच्या स्वाधीन होतो. 'वळीव' कवितेच्याद्वारे कवीने शेतकऱ्यांची ध्येयवादी मानसिकता तयार केली आहे. वळविवाच्या पावसाने हर्षोल्हासित झालेल्या शेतकऱ्यांच्या मनोवस्थेचे चित्रण या कवितेत आल्याचे पाहायला मिळते. या कवितेची भाषा साधी, सोपी आणि सरळ आहे. खूर, डचांग डबकी, नंग्या खोडाला, झुपकी, सोन सावली इत्यादी ग्रामीण बोलीभाषेतील शब्दांचा योग्य जागी वापर करून कवीने कवितेचे माधुर्य वाढविले आहे. कवितेला त्यामुळेच जिवंतपणा आल्याचे म्हणता येईल! 'वळीव' ही कविता प्रा. संजय आघाव यांच्या कवितेतील वळीवाच्या पावसाचे वर्णन असणारी अस्सल ग्रामीण शब्दरचना आहे.

- केशव कुकडे (मुक्तविहारी)
क्वार्टर क्र. जुने डी-८, थर्मल कॉलनी,
परळी वैजनाथ - ४३१५२०
जि. बीड
मो.९८६०९८५९११
ईमेल : muktvihari@gmail.com

छान परीक्षण

महेश

रवीवार, October 17, 2021 - 11:23
Permalink
New

खुप छान परिक्षण

  • Log in or register to post comments
खूप सुंदर वर्णन!!

Dhirajkumar Taksande

रवीवार, October 17, 2021 - 19:12
Permalink
New

खूप छान वर्णन, मुक्तविहारी सर!!!

  • Log in or register to post comments
वळीव

लक्ष्मण लाड

सोमवार, October 18, 2021 - 18:34
Permalink
New

प्रा. संजय आघाव यांच्या चैत्रपालवी काव्यसंग्रहातील वळीव ही कविता असुन कवी संजय आघाव यांच्या कवितेला ग्रामीण शब्दांचा बाज आहे , व केशव कुकडे
उर्फ मुक्त विहारी यांनी सुंदर शब्दात रसग्रहण केले आहे. दोघांचेही अभिनंदन .

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

मंगळवार, November 2, 2021 - 21:01
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7405 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 18 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    19 hours 10 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    19 hours 12 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    19 hours 14 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    19 hours 16 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 19 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
हंबरून वासराले चाटते जवा गाय 8
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 8
उठ शेतकऱ्या, घे मशाल 7
मास्क आणि ती.... 7
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 7
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 7
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 7
युगात्म्याची कविता 6
तुझ्यापायीच झाली ही दैना 6
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 6
कविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं' 6
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 6
गझल :शेती चरून गेली. 6
साहेब 6
शेतक-यांचा राजा बळीराजा 6
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 5
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 5
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पारितोषिक वितरण 5
माझ्या मरणाच्या कळा 5
उद्ध्वस्त 5

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,508
नियमावली 44,817
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,148
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,822
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,737
शरद जोशी 40,741
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,114
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,057
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,545
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,045
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,044
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,799
गरीबी कशामुळे? 36,067
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,614
आईचं छप्पर ।।१०।। 34,523
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 33,973
रे नववर्षा 33,747
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,297
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,271
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,265

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini