Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

कोरोना काळ आणि भाजीपाला पीकाला मिळालेला भाव

Main page content

By निलेश देवकर | 9:32 PM IST, मंगळ November 24, 2026
शेतकरी जीवनातील सुखद अनुभव

लेखनविभाग :
शेतकरी जीवनातील सुखद अनुभव

कोरोना काळ आणि भाजीपाला पीकाला मिळालेला भाव

कोवीड १९ मूळे संपूर्ण जगात धास्ती आणि भितीचे वातावरण पसरले होते . भारत सरकारने मार्च २०२० ला संपूर्ण लाॅकडाऊन चा आदेश काढला. त्यानंतर हळूहळू लाॅकडाऊन वाढतच गेले. आमच्या कडे थोडीशी बागायती शेती असून आमच्या परीसरातील अनेक शेतकरी हे साधारणतः इतर पीकांबरोबर भाजीपाला पीकाचे उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गाव अकोला शहरापासून साधारणतः १२ कि. मी. अंतरावर असल्याने पूर्वी बैलगाडीने आणि आजच्या काळात भाड्याच्या वाहनानी शेतकरी आपला शेतमाल, भाजीपाला मंडईत आणि बाजार समितीत पोहोचवतात. आमच्या वडीलांनी कोवीड परिस्थितीत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भाजीपाला वर्गीय पालकाचे पीक घेण्याचे ठरविले. उपलब्ध पाणी स्रोताचा विचार करून त्यासाठी पाऊन एकर जागेवर नियोजन केले, शेत तयार झाले, वाफे वगैरे तयार करून पालकाचे बी शेतात टाकले. संपूर्ण लॉकडाऊन असल्यावरही शेतीकामास मुभा होती, हे बरेच होते. संपूर्ण मशागती नंतर पालक पीक एक सव्वा महिन्यात तयार झाले. पालक काढणीस आला त्याची काढणी सुरू केली. गाडीवान आणि भाजी बाजारातील कमीशन एजंट दोघेही अतिशय प्रामाणिक आणि ईमानदार व्यक्ती. तसा त्यांच्याशी असलेल्या अनेक वर्षे संबधातून ही खात्री निर्माण झालेली. दुपारी चार नंतर पालकाची काढणी करायची ,पालक शेतात धुऊन बैलगाडीने घरी न्यायचे, रात्री पालकाच्या जुळ्या उभ्या करायच्या . कारण त्याचे पॅकींग संध्याकाळीच केले तर तो खराब व्हायची शक्यता अधिक. रात्री दोन वाजता उठायचे, पालक फारी मध्ये रचून बांधायचा सकाळी ४.०० ला गाडीवान गाडीत गावातील आमच्या मालासह इतरांचा माल घेऊन जायचा. मालाचा तुडवडा असल्याने भाजीपाला मंडईत दिवस उजाडण्या पूर्वी माल विकला जायचा. तो ही इतर वेळच्या भावापेक्षा तिप्पट तर कधी चौपट भावात. शहरातीलच नव्हे तर बाहेरगावाहून आलेलेही विक्रेते बाजारात यायचे, उशीरा आलेल्यांना रिकामा हाताने परत जावे लागत असे. तुटवड्यामुळे भाजीपाला विक्रेते चढ्या भावाने माल खरेदी करत असत. भाजीपाला विक्रेत्यांना तो माल प्रशासनाने सुट दिलेल्या सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेतच विकावा लागायचा. त्यामूळे त्यांच्याकडचाही माल तीन तासात संपून जायचा. कमीशन एजंट विकलेल्या मालाची पट्टी पैशांसह गाडीवाल्याकडे पाठवून द्यायचा. सकाळी ८.०० पर्यंत विकलेल्या मालाचे पैसे हातात पडायचे. पुढील काही दिवस शेतातील पालकाचे पीक संपेपर्यंत हे चालले. त्या भितीदायक आणि नकारात्मक काळात या पीकाने पावसाळ्याच्या सुरूवातीलाच समाधानकारक आर्थिक लाभ दिला. नेहमी शेतमालाच्या भावाची चिंता सतावत असते . पण हा काळ भाजीपाला पिकाच्या बाबतीत सुखावह ठरला असेच म्हणावे लागेल .

-निलेश जगदेवराव देवकर .
मु.पो.डोंगरगाव
ता.जि.अकोला.444104
मो.क्र.9604919343.
e mail-
nileshdeokar35@gmail.com

  • Log in or register to post comments
  • 24 views

प्रतिसाद (1)

निलेश जगदेवराव देवकर सर,…

डॉ. मीरा पंडित

शनीवार, November 28, 2026 - 17:15
Permalink
New

निलेश जगदेवराव देवकर सर, तुमचा हा लेख वाचताना २०२० च्या लॉकडाऊनमधील ते संपूर्ण चित्र पुन्हा एकदा डोळ्यांसमोर जिवंत उभे राहिले. संपूर्ण जग भीतीच्या छायेत असताना, तुमच्या वडिलांनी दाखवलेली समयसूचकता, उपलब्ध पाण्याचे अचूक नियोजन आणि घेतलेला धाडसी निर्णय हा खरोखरच कौतुकास्पद आहे.
दुपारी चारपासून पालकाची काढणी करणे, रात्री जुड्या बांधणे आणि पहाटे दोन वाजता उठून पॅकिंग करून चारच्या गाडीने माल बाजारात पाठवणे—शेतकरी कुटुंबाची ही अहोरात्र चालणारी धडपड तुम्ही ज्या सहज आणि ओघवत्या शब्दांत मांडली आहे, त्याला खरंच दाद द्यावीशी वाटते. या लेखातून केवळ शेतीचे गणितच नव्हे, तर गावाकडच्या माणुसकीचे आणि विश्वासाचे दर्शनही घडते. गाडीवान आणि कमिशन एजंट यांचा प्रामाणिकपणा वाचून मन भरून येते.
संकटातही संधी शोधून, कष्टाच्या जोरावर मिळवलेला हा आर्थिक लाभ आणि त्यातून मिळालेले समाधान इतर शेतकऱ्यांसाठीही नक्कीच दिशादर्शक ठरेल. साधी, प्रवाही आणि थेट हृदयाला भिडणारी भाषा हे या लेखाचे मोठे वैशिष्ट्य आहे.

  • Log in or register to post comments
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 170 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    17 minutes 17 seconds ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    20 minutes 11 seconds ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    22 minutes 4 seconds ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, …
    23 minutes 16 seconds ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर,…
    24 minutes 17 seconds ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
प्रतिनिधींचे मनोगत आणि अभिप्राय : 12sss 23
आईचं छप्पर ।।१०।। 23
एवढा मोठा नांगूर... 22
नागपुरी तडका - ई पुस्तक 21
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 20
गणपतीची आरती ॥३५॥ 19
शेतकरी मर्दानी...! 19
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 18
सदस्यत्व कसे घ्यावे? 17
‘होऊ दे रे आबादानी’च्या निमित्ताने 17
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 17
श्री गणराया - ।।२।। 16
पाणी लाऊन हजामत 15
मोरा मोरा नाच रे : बालगीत ।।१७।। 15
माझे फेसबूक स्टेटस-1 15
पांढरा किडा 15
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 15
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 14
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 14
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 14
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,535
नियमावली 44,845
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,221
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,873
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,834
शरद जोशी 40,802
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,136
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,119
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,608
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,118
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,067
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,816
गरीबी कशामुळे? 36,112
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,879
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,689
आईचं छप्पर ।।१०।। 34,613
रे नववर्षा 33,841
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,338
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,419
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,371
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini