Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

मधमाशा

Main page content

By दत्ता वालेकर | 5:12 PM IST, मंगळ November 24, 2026
कथा

मधमाशा

डोंगराकडची ज्वारी हुरड्यात आली. तसं रामा रोजच्या सारखा पाखरं हाकून आला. वसरीवर उपरणं ठिवलं. हातपाय धुतोय तोवर आडगावच्या परवाच येऊन गेलेल्या पावण्याचा निरोप येऊन सुबाना आला.
रामाच्या घरी परवाच त्याच्या मुलीसाठी बैठक झाली. मुलगी पसंत, देण्या-घेण्याच्या चार गोष्टी जमल्या. पण पावणे नंतर निरोप देतो म्हणून गेले अन् आज सुबाना जवळ कळविलं. रामाला आनंद झाला. पण आता सुबाना जवळ तर लवकरच आटोपण्यासाठीही कळवलं. रामा इचारात पडला. घरात इकावं म्हणलं तर ज्वारीचा दाणा नाही अन् बाहेर अशा आईन टाईमाला कोण काम करील उद्या मोप आपलं पिकलं, पण पावणा दम काढायचा नाही.
घोंगडं टाकलं होतं. त्याच्यावर बसून बोलणं चालू होतं. इतक्यात रामाची बायकू यमना दोन कबशा घेऊन आली. रामा मनला हे बघ सुबाना कसं करावं माणसानं, पेरणीच्या वक्ताला बी भरनाला मइस इकली. आसा काळा च्या प्यावा लागतूय. लय तंग हाय बघ. तोंडाची कबशी खाली ठेवत सुबाना म्हणाला, आरं रामा काई कर, पण आडगावच्या पावण्याचं घर बरयं बघ. पोरगं टमटम चालवीतय. पोरीला तिथं सुख मिळंल बघ. गंगथडीचा धा एकर जमीन भी हाय.
सुबाना उठून गेला. पण रामाच्या डोक्यात विचाराची पाखरं उठून गेला. यमनानं घरातल एक बाटली अन् थैली रामाच्या हाती ठेवून दुकानचं किराणा सामान आणायला सांगितलं.
रामा बाजार चौकात वाण्याच्या दुकानाकडं निघाला. त्याला रावण्या भेटला. त्याचा लहानपणाचा दोस्त. त्याच्या हातात थैली व तेलाची बाटली बघून, काय रं रामू काय चाललंय रामण्यानं रामाच्या खांद्यावर हात टाकीत हटकलं. मग रामानं पोरीचं लगीन जमलंय, तंगी हाय, ज्वारी काढाचीच राहिलीय, काय करावं भाड भाड उलट्या व्हाव्यात तसं रामानं सांगून टाकलं. पोरीचं लगीन जमलं व्हय मग आरं मी देईन धा-पाच हजार, त्याची काय चिंता, रावण्या म्हणाला. मग रामा म्हणाला, बाप रे देव होवून भेटलास. चल, च्या पिऊ, मग कधी येऊ.. हे बग रामा उद्या सकाळी ये अन् तुझ्या ज्वारीचं खळ झालं की मग नंतर पैसे दे. दोघांचा नाष्टा झाला. किराणासाठी आणलेले पैसे हॉटेलात खर्चून रामा बाटली अन् थैली रिकामीच हलवीत घरी गेला. तशी यमना म्हणली, काय व, काय झालं बाया माणसाला काय कळत नाही. बाहीरच्या यवारातलं गुमानं आपलं चुलीपुढं बघावं. निघालेत आपला बचतगट कराया कळना न वळना, रामा खुशीतच मनला.
दुसऱ्या दिसी पाखरं हाकून येता येता रामा रावण्याच्या घरला वाट वाकडी करून गेला. बघतो तर रावण्या बाहेर गेल्याला. त्याची बायको पोरानला तावताव काई बाई बोलत व्हती. रामानं रावण्याबद्दल विचारलं तर मनली, भावजी त्यांचं एक शब्द खरा नाही. दोन दिवस झालं. आमचीच चूल पेटली नाही. त्यानला काम करणं नाही, बाजार चौकात बसावं, कुणी दुकानाला सामानला आलं की असं काई बाई म्हणावं, च्या प्यावा दिवसभर, मी काय करू कळना, इतक्यात एक चिमण्याचा थवा अंगणातून भुर्रकन उडून गेला.
रामाचं पारसं तोंड आणखीनच सपक दिसू लागलं. रामा घरी आला. आंगूळ केली, न्यारी केली. बाहेर पडला. त्याच्या डोक्यात लगन अन् त्यासाठी पैसा हाच विचार घोळत व्हता.
इतक्यात पारावर पाय हलवित बसलेला सखा दिसला. रामा जवळ गेला. बोलत बोलत अडचण सांगितली. सखा न तर यगळाच मार्ग काढला. माझ्या ओळखीचे बँकेत सायब हाय चल जाऊ. म्हणून दोघं बी बँकेत गेले. रामराम झाला. सायबानं बसा मनून मानानंच खुनवलं तसे दोघे बसले. सायबानं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. रामाला वाटलं झालं आपलं काम. पण सायब म्हणला, बँकेत खात हाय पाहिले खाते काढा. मग व्यवहार करा. अर्ज द्या मग मी वर पाठवतो. मंजूर झाल्याबरोबर कळवतो. रामा मोप पोटतिडकीनं सांगून लागला. पण त्याचा कायी उपेग झाला नाही.
हॉटेलात सखा अन् रामा च्या पेले. मग रामा घाईतच मनला वावराकडं जातो बैल बांधलेलचे हायत. त्याला चारावं लागलं. वढा वलांकडून बाबळ बनातून जवळच्या वाटनं झपा-झपा पावलं टाकीत रामानं वावरं गाठलं तसं बैल त्याच्याकडं बघून हंबरले. त्यानं कासरा सोडला. वड्याला पाणी पाजलं. आटुळ्यावर जाऊन बसला खरा पण विचाराची पाखरं गप बसू देत नव्हते. हा हा करून रामा पाखरं उडवीत व्हता. विचार देखील त्याच्या मनातील पाखराच्या गतीनं भरारी घेत होती. तर शेतातलं बुजगावनं योग्यासारखं शांत दिसत व्हतं.
दुपार झाली. यमना भाकरी घेऊन आली. आटुळ्यावरूनच रामा बघत व्हता. आज यमना जरा खुशीतच दिसत व्हती. यरवी हरबऱ्याची आंब लागन मनून दबकत चालणारी यमना आज धडकन चालत व्हती. तसं रामाचीही भूक ढहाळे, वाळकं खाऊन राहिली होती. कुठं पाखरं झाडाच्या कुशीत शिरली व्हती.
यमनानं डोस्क्यावरचं टोपलं बाबळीची दाट सावली बघून ठेवलं. डोस्क्यावरची चुंबळ हातात घेत यमनानं हाक मारली. आव चला की जेवाय. जेवायचं हाय काय नाही म्हणावं तसा रामानं आटूळ्याच्या मेढीला गोफण अडकवली अन् बाबळीखाली येऊ बिनगीतल्या पाण्यानं गुळणा केला. धोतराला हात पुसला.
अन् बसला जेवायला. त्याचं मन लागतं नव्हतं. करडीच्या फुलावर मधमाशा घोंगावत इकडून तिकडे उडत उडत बिनगीच्या बाजूला सांडलेल्या पाण्यावर येत व्हत्या. यमनानं आज रामाच्या आवडीची भाजी केली होती. रामा यमनाला मनला, तू जेवलीस का, जेव संगच थोडा येळ कुणी कायी बोललं नाही.
रावण भाऊजी पैसे देतो मनले त्याचं काय झालं वं
काय व्हायचंय गाठ पडली नाही.
मग दुसरीकडं कुठं इचारून ठिवलं का
आगं आपल्याजवळ नसलं की कुठलं नसतंय
मी धा हजार दिले तर...
रामा हातातला घास ठेवून मनला तू कुठले देणार हायीस मग यमना हातातले काकण मागं पुढं सारून मनली तसं नाही व
'मग कसं'
'मी सकाळी कमलताईकडं गेल्ते'
'कोणत्या कमलताई'
आवं आमी गेलसाली बाया बाया नी बचतगट काढला नाही का त्याची अध्यक्षा. मी नेमानं गेलं सालपासून महिन्याला पैसे भरते. मग माझं पैशाचं काम व्हईल का असं मी अध्यक्षांना विचारलं. पोरीचं लगीन हाय, मालक धा ठिकाणी फिरले. कुठं काम झालं नाही. मग त्या मनल्या, आगं असल्या टाईमासाठी तर बचतगट असतो. मग त्यांनी माझ्या फार्मावर सह्या घेतल्या. अन् माझ्याबरोबर बँकेत येवून दहा हजार रुपये काढून दिले.
रामाचं जेवण झालं, त्याचं लक्ष पाण्याच्या बिनगीकडं गेलं. तसं तिथं बसलेल्या मधमाशा दिसल्या. त्या करडीच्या फुलावरून मोहरीच्या फुलावर उड्या मारीत होत्या. तसंच त्या बाबळीच्या फाट्याला बसलेल्या मोहोहाकडं जायच्या तसं रामाच्या विचाराचं झालं. इकडून तिकडं फिरून फिरून त्याचं लक्ष यमनाकडं जायचं. आणि बायांनी केलेल्या बचतगटाकडं जाऊन मुक्काम करायचं. रामानं यमुनाचा हात हातात घेऊन विचारलं. अगं आसं काय सांगतीस मग तुम्ही मधमाशासारखा मध गोळा केलाय म्हणून सांग की.
तिसऱ्या पारचं ऊनाच्या सावल्या आपले पाय लांबवून देत होत्या बैल कासऱ्याचे सुटून उभ्या धानात चरत व्हते.

- दत्तात्रय गंगाराम वालेकर
विक्रम फोटो स्टुडिओ, घाटनांदूर,
ता. अंबाजोगाई, जि. बीड
पिन - 431518
मो. क्र. 9421440922

  • Log in or register to post comments
  • 18 views

प्रतिसाद (1)

अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…

डॉ. मीरा पंडित

शनीवार, November 28, 2026 - 17:10
Permalink
New

अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध देणारी आणि महिला सक्षमीकरणाचा अत्यंत सुंदर संदेश देणारी कथा!
आदरणीय दत्तात्रय गंगाराम वालेकर सर, 'मधमाशा' ही कथा वाचताना जणू काही एखाद्या गावाकडच्या शेतात किंवा बांधावर बसून प्रत्यक्ष प्रसंग पाहत असल्याचा भास होतो. तुमच्या लेखणीतील अस्सल ग्रामीण बोलीभाषा, म्हणी आणि वाक्प्रचारांचा सहज वापर या कथेचा खरा आत्मा आहे.
मुलीचे लग्न ठरल्यानंतर पैशांची जुळवाजुळव करताना एका बापाची होणारी धावपळ, पोकळ आश्वासने देणारी माणसे आणि बँकेचे किचकट व्यवहार तुम्ही अत्यंत जिवंतपणे उभे केले आहेत. सुरुवातीला "निघालेत आपला बचतगट कराया, कळना न वळना" म्हणत ज्या बचतगटाची रामाने थट्टा केली होती, त्याच बचतगटाने आणि यमुनाच्या दूरदृष्टीने ऐन संकटात आधार दिला, हा कथेचा कलाटणी देणारा भाग मनाला खूप भावतो.
कथेचे 'मधमाशा' हे शीर्षक अत्यंत समर्पक आणि प्रतीकात्मक आहे! ज्याप्रमाणे मधमाशा थेंब-थेंब मध गोळा करून मोहोळ तयार करतात, त्याचप्रमाणे महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून जमा केलेला पैसा संकटाच्या काळात किती मोठा आधार ठरतो, हे तुम्ही अतिशय कलात्मकतेने दाखवून दिले आहे. शेतातील ज्वारीचा हुरडा, पाखरं हाकलणे, आटुळा, बिनगी आणि शेवटच्या ओळीतील निसर्गचित्रण वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभे राहते.
ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन घडवणारी आणि बचतगटाचे महत्त्व पटवून देणारी ही एक अत्यंत दर्जेदार साहित्यकृती आहे. या सुंदर कथेबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा!

  • Log in or register to post comments
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 170 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    17 minutes 6 seconds ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    20 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    21 minutes 53 seconds ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, …
    23 minutes 5 seconds ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर,…
    24 minutes 6 seconds ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
प्रतिनिधींचे मनोगत आणि अभिप्राय : 12sss 23
आईचं छप्पर ।।१०।। 23
एवढा मोठा नांगूर... 22
नागपुरी तडका - ई पुस्तक 21
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 20
गणपतीची आरती ॥३५॥ 19
शेतकरी मर्दानी...! 19
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 18
सदस्यत्व कसे घ्यावे? 17
‘होऊ दे रे आबादानी’च्या निमित्ताने 17
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 17
श्री गणराया - ।।२।। 16
पाणी लाऊन हजामत 15
मोरा मोरा नाच रे : बालगीत ।।१७।। 15
माझे फेसबूक स्टेटस-1 15
पांढरा किडा 15
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 15
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 14
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 14
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 14
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,535
नियमावली 44,845
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,221
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,873
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,834
शरद जोशी 40,802
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,136
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,119
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,608
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,118
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,067
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,816
गरीबी कशामुळे? 36,112
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,879
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,689
आईचं छप्पर ।।१०।। 34,613
रे नववर्षा 33,841
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,338
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,419
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,371
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini