ट्रॅक्टर
काळया मातीत मातीत, ट्रॅक्टर चालते| ट्रॅक्टर चालते, ट्रॅक्टर चालते|
मालक डिझेल टाकते, ड्रायव्हर त्याला र
हाकते|
काळया मातीत मातीत ....||१||
नागराले जोडता, नागरणी शेताची करते|
बैल जोडीच्या जीवाले, लय आराम पडते|
वखराले जोडता , वखरणी शेताची करते|
शेतकऱ्याच्या जीवाले,लय आराम पडते|
रोटर जोडता मशागत वावराची करते|
भुसभुशीत करून निघा शेताची राखते|
निगा शेताची राखते, ट्रॅक्टर चालते|
काळया मातीत मातीत....||२||
पेरणी यंत्राला जोडता, ओल्या शेताला पेरते|
बियाण्याला टाकता, पेरणी बियाची करते|
खताला टाकता, बिया सोबत पेरते|
शेतकऱ्याच्या जीवाला, लय आराम पडते|
खते बियाला टाकते, रासण्या शेताच्या करते|
रासने शेताच्या करते, ट्रॅक्टर चालते|
काळया मातीत मातीत......||३||
फवारणी यंत्राला जोडता, फवारणी पिकाची करते|
मळणी यंत्राला जोडता, रास धान्याची टाकते|
शेतकऱ्याच्या जीवाला, लय आराम पडते|
ट्रॉली ट्रॅक्टरला जोडता, धन्य घराला आणते|
ट्रॅक्टर चालते , काळया मातीत .....||४||
डॉ.सुभाष लक्ष्मण पाटील
संत ज्ञानेश्वर महाविद्यालय
सोयगाव छ. संभाजीनगर
Main page content
छंदमुक्त कविता
| प्रकाशन दिनांक | लेख/कविता/गझलेचे शीर्षक | वाचनसंख्या | प्रतिसाद संख्या | साहित्य प्रकार | अंतिम अद्यतन |
|---|---|---|---|---|---|
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 423 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 9 minutes 40 seconds ago
- 12 minutes 34 seconds ago
- 14 minutes 27 seconds ago
- 15 minutes 39 seconds ago
- 16 minutes 40 seconds ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका | 32,321 |
| हंबरून वासराले चाटते जवा गाय | 32,186 |
| शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती | 31,784 |
| हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची | 31,767 |
| संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती | 31,723 |
| वादळाची जात अण्णा | 31,561 |
| ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन | 31,304 |
| गगनावरी तिरंगा - ॥२१॥ | 31,213 |
| आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून! | 31,181 |
| विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल | 30,005 |
| भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन | 29,916 |
| गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते | 29,534 |
| पिकलेला काटा अन् करपलेली पिके | 29,189 |
| कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन | 29,010 |
| दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ | 28,045 |
| हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ | 27,654 |
| श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। | 27,533 |
| नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ | 27,009 |
| प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी | 26,861 |
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,344 |

प्रतिसाद (1)
डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर,…
डॉ. मीरा पंडित
डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, तुमची 'ट्रॅक्टर' ही कविता वाचताना प्रत्यक्ष काळ्या मातीतील शेतीचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. आधुनिक शेतीतील यंत्रांचे महत्त्व आणि त्यामुळे शेतकरी राजा व त्याच्या बैलजोडीला मिळणारा आधार तुम्ही ज्या अस्सल ग्रामीण बाजात मांडला आहे, त्याला खरंच दाद द्यावीशी वाटते.
या कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची सुंदर लय आणि गेयता! "काळया मातीत मातीत, ट्रॅक्टर चालते" हे ध्रुवपद वाचताच या कवितेला एक छान लोकगीताचा ठेका प्राप्त होतो. नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करणे, पेरणी, फवारणी, मळणी आणि शेवटी ट्रॉलीतून धान्याची रास घरापर्यंत आणणे—शेतीच्या या प्रत्येक टप्प्याचे वर्णन अत्यंत अचूक आणि ओघवत्या शब्दांत केले आहे.
कवितेतील "बैल जोडीच्या जीवाले, लय आराम पडते" आणि "शेतकऱ्याच्या जीवाले, लय आराम पडते" या ओळींमधून कष्टकऱ्यांबद्दलची तुमची संवेदनशीलता आणि आपुलकी स्पष्टपणे जाणवते. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाही कवितेचा गोडवा आणि अस्सल गावरान भाषेचा गोडसपणा कुठेही कमी झालेला नाही.
अशा या ऊर्जादायी, लोकगीतासारख्या गुणगुणाव्याशा वाटणाऱ्या कवितेबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!