Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

ओटी

Main page content

By रमेश | 9:15 PM IST, गुरू November 20, 2014
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
छंदमुक्त कविता

ओटी

अर्धा पावसाला संपला तरी
जमीन पुरती ओली झाली नव्हती,
पुढं पाऊस येईल याची हि खात्री नव्हतीच,
तरीही बापाची सकाळ पासून लगबग सुरु होती
मोठ्या उत्साहानं तिफनीची पूजा करत होता,
अर्धओल्या मनात भविष्याची हिरवी स्वप्न पेरत होता.

हळदी कुंकवाच ताट घेवून उभ्या
आईला मी विचारलं,
"घरात खायला दाना नाही,
पाऊस पडण्याची कसलीच आशा नाही…
मग आहे त्यावर पाणी सोडून …
कशाला हे येड्यागत भिकेचे डोहाळे ?"

आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,
"तुला नाही कळणार पोरा,
या येडेपणा मागचं शहाणपण,
शेतकऱ्याला पाहवत नसतं
त्याच्या काळ्या आईचं रितेपण !

पायाला माती लागल्याबिगर तुला
समजणार नाही धरतीच स्थान …

आरं नेहमीच फळाची आशा करून नाही चालत,
कधी कधी मानावं लागतं,
धरतीची ओटी भरण्यात हि समाधान !"

- रमेश ठोंबरे
९८२३१९५८८९

पद्यलेखन स्पर्धा-२०१४
मातीची ओटी.......

राजीव मासरूळकर

गुरुवार, November 20, 2014 - 22:01
Permalink
New

सुंदर कल्पना..... खास कविता !

  • Log in or register to post comments
ओटी

हेमंत साळुंके

शुक्रवार, November 21, 2014 - 03:43
Permalink
New

वा. छान कविता.
पायाला माती लागल्याबिगर तुला
समजणार नाही धरतीच स्थान

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7009 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • surekha
  • Rashin@123

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 15 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    20 hours 20 minutes ago
  • 'लवंगलता' वृत्ताची लय आणि त्यातील विचारांची खोली
    20 hours 22 minutes ago
  • अंतर्मुख करायला लावणारी
    20 hours 24 minutes ago
  • अप्रतिम आणि हृदयस्पर्शी रचना
    20 hours 26 minutes ago
  • सुरेख आयोजन... पत्रिका
    20 hours 58 minutes ago

लोकप्रिय लेखन

Today's:

  • स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24
  • हे पान पहायची परवानगी नाही.
  • पान हरवलेलं दिसतंय....
  • कापला रेशमाच्या सुताने गळा
  • किती चाटणार भारतपुत्रा?
  • विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे
  • शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती
  • पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।।
  • पिकलेला काटा अन् करपलेली पिके
  • आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

All time:

  • पान हरवलेलं दिसतंय....
  • हे पान पहायची परवानगी नाही.
  • पोळ्याच्या झडत्या
  • माझे फेसबूक स्टेटस-1
  • पान हरवलेलं दिसतंय....
  • शुभारंभ
  • रानमेवा - भूमिका
  • नागपुरी तडका - ई पुस्तक
  • आजचे शेतमालाचे बाजारभाव
  • सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता

Last viewed:

  • एल्गार....
  • पान हरवलेलं दिसतंय....
  • १० वे अ.भा.म.शे.सा. संमेलन गुरुकुंज मोझरीत : नियोजन
  • हे पान पहायची परवानगी नाही.
  • २ रे अ.भा.म.शे.सा.संमेलन, नागपूर : कार्यक्रमपत्रिका
  • ८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन
  • ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन
  • ६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत-उद्घाटन सत्र
  • अन ती निबंधात नापास झाली...
  • संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini