गझल
विळखा अरे ऋणाचा
फळली मला कधीही नाही कृषी मुळावर.
मारूनही फवारा पडली अळी फुलावर.
मारूनही फवारा पडली अळी फुलावर.
कर्जास या अता मी फेडायचे कशावर,
लागत तरी निघाली नाही कुण्या पिकावर.
लागत तरी निघाली नाही कुण्या पिकावर.
जीएम बी बियाणे पेरायला मनाई,
शेती कशी करावी या तुगलकी तिरावर.
शेती कशी करावी या तुगलकी तिरावर.
जर रास्त दर मिळाला मालासही कृषीच्या,
मरणार मी कशाला लटकूनिया सुळावर.
मरणार मी कशाला लटकूनिया सुळावर.
'रविपाल ' तू कितीदा ऋण फेडले तरीही,
विळखा महा-जनांंचा पडला तुझ्या घरावर.
विळखा महा-जनांंचा पडला तुझ्या घरावर.
• गज़लकार •
डॉ. रविपाल भारशंकर, हिंगणघाट जि. वर्धा.
• अक्षर गणवृत्त •
आनंदकन
• लगावली •
गागालगा लगागा गागालगा लगागा

खुप छान सर
महेश
खुप छान सर
धन्यवाद महेश!
Dr. Ravipal Bh…
महेश खुप खुप आभार तुझे. धन्यवाद.
खूप सुंदर
RANGNATH TALWATKAR
खूप सुंदर
धन्यवाद तालवटकरजी
Dr. Ravipal Bh…
खुप खुप आभार आपले.
छान
मुक्तविहारी
आभार मुक्तविहारीजी
Dr. Ravipal Bh…
धन्यवाद आपले *bq*
Badhiya
Pradip thool
Ati sunder Dr. Saheb must
धन्यवाद गांधीजी
Dr. Ravipal Bh…
आभार *bq*
खूप छान!!!!
Dhirajkumar Taksande
बढिया गझल डॉ साहेब!
धन्यवाद धिरज भाऊ.
Dr. Ravipal Bh…
खुप खुप आभार आपले
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


स्पर्धाविजेती प्रवेशिका.
गंगाधर मुटे
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
*congrats* :congrats:
*bq* *bq*
धन्यवाद सर आपले!
Dr. Ravipal Bh…
आणि तुमचे पण हार्दिक अभिनंदन *bq*