कापूस काचळी
वृत्त - ख़बब / मात्रीक चामर (२४ मात्रा)
✍🏻@संदीप. १०/११/२०२६
आठवणींचा कापूस जेव्हा मनात दाटून येतो,
विरहाचा प्रत्येक काटा काळजाला बोचून जातो,
तहमीदी शेर
तळपत्या उन्हात मखमली वेदना सांडून आली
कुठे तरी कुणाच्या अश्रूत भिजते तुझी सावली.
गझल -
काचळी आठवणींची काही बोचत नाही
आता कापूस ही मी काही वेचत नाही.
जेव्हा एकांती वर्षेला साद घालतो मी
कोरडा होतो घसा आवाज पोचत नाही.
अनवाणी पायांनी फिरतो काटेरी वाटा
तळपायांना तरी ही काटा टोचत नाही.
रिकामी करून बसलो मी माझी झोळी
मखमली जरी चिंदकं, आत कोचत नाही.
शब्दांत 'संदीप' गुंफतो वेदना आपुल्या
शेंडे झाडाचे उगा नखाने नोचत नाही.
असोला, ता कळमनुरी जी. हिंगोली
संदीप थोरात, ९०४९१४३६५४

प्रतिसाद (1)
अप्रतिम गझल
डॉ. मीरा पंडित
अप्रतिम गझल संदीपजी! 'कापूस' आणि 'काचळी' या अस्सल मातीतील प्रतिमांचा वापर करून तुम्ही विरहाची आणि आठवणींची वेदना अत्यंत तरलतेने मांडली आहे. "मखमली वेदना सांडून आली" हा तहमीदी शेर आणि "रिकामी करून बसलो मी माझी झोळी..." या शेरातील आशय थेट काळजाला भिडतो. वृत्ताची अचूक जाण आणि साध्या, अस्सल ग्रामीण शब्दांतून व्यक्त झालेली प्रगल्भ भावना गझलेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. तुमच्या लेखणीला मनापासून दाद!