यमन/ देश ,... दादरा
१५/०८/२०२० ✍🏻@संदीप
डोळे असणार सोडा, नसणारा सुद्धा चाचपडून पाहतो
मुळात जिथे विश्वास असतो, तिथेच विश्वास घात होतो
का करावा? आणि कुणाचा? कुणी सांगेल का बरं मला
कुठून येतो? कुठ जातो? माहीत कुणाला कुठ तो राहतो?
प्रेम म्हणजे विश्वास की विश्वास म्हणजे प्रेम, एक कोडंच
का चुंबकाचे दोन ध्रुव ती,, एक उत्तर एक दक्षिणेला जातो?
सर्व आयुष्य निघून जात, थोडासा विश्वास कमवायला
आयुष्यभराच्या मेहनतीला क्षणात कसा बरं तडा जातो.
निघून जात कुणाच सर्वस्व सहज हातातल्या वाळू सारखं
प्रश्न पडतो जीवाला हा विश्वास निघून गेल्यावर कुठ जातो.

प्रतिसाद (1)
वाह! अतिशय प्रगल्भ, विचार…
डॉ. मीरा पंडित
वाह! अतिशय प्रगल्भ, विचार करायला लावणारी आणि मानवी स्वभावाचे वास्तव मांडणारी अप्रतिम रचना संदीपजी! 'विश्वास' आणि 'विश्वासघात' या एकाच नाण्याच्या दोन बाजू तुम्ही अत्यंत तरलतेने आणि प्रभावी शब्दांत मांडल्या आहेत. "सर्व आयुष्य निघून जात, थोडासा विश्वास कमवायला, आयुष्यभराच्या मेहनतीला क्षणात कसा बरं तडा जातो" हा शेर थेट मनाचा ठाव घेतो. चुंबकाच्या दोन ध्रुवांची उपमा आणि हातातल्या वाळूचे रूपक रचनेचे सौंदर्य अधिकच वाढवते. प्रत्येक ओळीत एक सखोल चिंतन जाणवते. तुमच्या लेखणीला मनापासून दाद!