Main page content
Search
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
User login
Who's online हजर पाहुणे
Who's new नवीन सदस्य
- 2 hours 55 minutes ago
- 3 hours 3 minutes ago
- 3 hours 14 minutes ago
- 1 month 2 weeks ago
- 2 months 1 week ago


रानातला शेर-१
गंगाधर मुटे
।।रानातला शेर-१।।
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी
© गंगाधर मुटे ''अभय"
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3342772035747461
http://www.baliraja.com/node/77
जबरदस्त
मुक्तविहारी
सर्वच शेर जबरदस्त आहेत सर !
चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात
गंगाधर मुटे
चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने
© गंगाधर मुटे ''अभय"
http://www.baliraja.com/node/782
'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू
गंगाधर मुटे
'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल
© गंगाधर मुटे 'अभय'
http://www.baliraja.com/node/859
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3126698790688121
खेड्याकडून जावे शहराकडे जसे
गंगाधर मुटे
खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी
© गंगाधर मुटे 'अभय'
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3130000063691327
कोणीतरी यांची आता, पडजीभ
गंगाधर मुटे
कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे
© गंगाधर मुटे 'अभय'
अन्नदाता या युगाचा जाहला
गंगाधर मुटे
अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)
© गंगाधर मुटे 'अभय'
आयुष्य म्हणजे पेंडूलम,
गंगाधर मुटे
आयुष्य म्हणजे पेंडूलम, दोलायमानी मॅच असते
कधी मीलरचा सिक्सर तर, कधी सूर्याची कॅच असते
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर
#रानातला_शेर
गंगाधर मुटे
आयुष्याच्या वळणावरती
जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन्
हात हवेचा धरून गेलो
#रानातला_शेर #गंगाधर_मुटे
तुझी सांग येथे दखल कोण घेतो?
गंगाधर मुटे
तुझी सांग येथे दखल कोण घेतो?
कशाला घशाला उगा त्रास देतो?
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर
http://www.baliraja.com/node/215
17 जुलै 2019
गंगाधर मुटे
तू कोसळ मुसळधार, जशी हवी तशी, कुठेही, कशीही
मी ओढ्याच्या रुपात, सावरेन तुला, बाहूत घेऊन
© गंगाधर मुटे १७/०७/१९ #थेट_बांधावरून
१०/०८/२०२१
गंगाधर मुटे
तुलाच दिसतो तुझ्यात भारी, अस्सल गाढा थोर समीक्षक
परी स्वतःला तपासले का? ठेऊन कुल्हा थंड तव्यावर
#गंगाधर_मुटे #गझलेचा_शेर #आर्वीकर
१०/०८/२०२१ ०५:३८
28/10/2025
गंगाधर मुटे
मोह-मायेला कवटाळून बघावं म्हणतो
आता थोडंस स्वतःसाठी जगावं म्हणतो
- गंगाधर मुटे #शेर #शुभरात्री_लोक्सहो
11/11/2025
गंगाधर मुटे
हमीभावाचा फासा टाकून पाडणार भाव
शेतीही बुडणार अन् कर्जही बुडणार तोपर्यंत
शेतमालास रास्त भाव नाही मिळणार तोपर्यंत
कर्जमुक्ती एकमेव पर्याय उरणार तोपर्यंत
कर्ज पेरले, कर्ज उगवले तर कर्जच पिकणार ना?
घाट्याच्या धंद्यात काय दुसरे पिकणार तोपर्यंत
- गंगाधर मुटे #शुभरात्री_लोक्सहो
- गंगाधर मुटे
11/01/2020
गंगाधर मुटे
अवकाळी पावसाच्या, गीत अंगाई गाण्याने
तरु वल्ली पिकासवे, शेत झोपले उताणे
नीत एकुलता एक, बैल हुंगतो तबेला
गारा वादळानं त्याचा, साथी जोडीदार नेला
© गंगाधर मुटे
--------------------
180120
गंगाधर मुटे
मी दगडाला पूजत नाही, घाव घणाचे त्यासी देतो
आधी त्याचा देव बनवतो, नंतर त्याला पुजेस घेतो
- गंगाधर मुटे