Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

भावना आणि भावनिक नाट्य

Main page content

By Manjusha sanja… | 9:02 PM IST, गुरू November 26, 2026
ललितलेख

ललित लेख

भावना आणि भावनिक नाट्य

काही दिवसांपूर्वी 'महात्रया रा' यांचा वाचलेला एक उतारा मनात घर करून बसला. भावना आणि भावनिक नाट्य विषयावरील त्यांचे विवेचन. सभोवतालच्या अनेक घटनांचे विश्लेषण करायला भाग पाडणारा तो उतारा. त्या उताऱ्याचा सारांश असा की शेअर मार्केट मधील घसरण असो, एखाद्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांचा राजीनामा असो, एखादी बहुमूल्य वस्तूची चोरी असो, की एखाद्या जिवलग व्यक्तीचा मृत्यू असो अशा प्रसंगी व्यक्ति फार अस्वस्थ होतो, आकांत तांडव करतो, बरेचदा त्याला मोठा धक्का बसून तो बेशुद्ध होतो, कधी कधी हृदयविकाराचा झटका येतो. या सर्व भावनिक नाट्याचा काळ ओसरला की ती व्यक्ती सामान्य दिनक्रमला लागते हा भावनिक पुर ओसरल्यानंतर जे काही करावं लागणार ते करावंच लागतं, म्हणून आपण भावनिक होऊ नये असं नाही पण नाट्यपूर्ण भावनिक प्रतिक्रिया आपण टाळल्या पाहिजे. भावनिक प्रगल्भता म्हणजे भावना टाळणे नव्हे तर भावनिक नाट्य किंवा प्रक्षेप टाळणं होय.
महात्रया रा यांचा हा प्रगल्भ विचार जर प्रत्येकाने स्वीकारला तर सभोवार दिसणारे बरेच प्रश्न शांततेने मार्गी लागतील, बरेच प्रश्न जन्मा आधीच नष्ट होतील पण भवतालातील कर्मगतीच्या आवर्तनाचा विचार केला तर समाजाने ही नाट्यमयता स्वीकारली आहे किंबहुना ती विचारभावाच्या विवेचनाचे भाषा झाली आहे असं वाटून जातं. घडलेल्या कुठल्याही अप्रिय घटनेनंतर त्याच्या होणाऱ्या परिणामांना निस्तरावचं लागतं. सतत फिरत्या असणाऱ्या जीवन चक्राची सोबत करावीच लागते. जे करावे लागणार ते करावंच लागतं. असं असलं तरी प्रथा- परंपरा, रितीरिवाज, पाळताना,समाज जीवन जगतानाच्या नियमावलीचे निमुटपणे पालन करताना आपण या नाट्यमय प्रसंगाला बळी पडतो, ते अटळ होऊन बसतं नव्हेनव्हे ती नाट्यमयता व्यक्तीला समाजाची सहानुभूती मिळवून देते असं बरेचदा आढळून येतं.
एक 85 वर्षाच्या आजी ज्यांचा शेवटचा काळ अतिशय वाईट गेला. मानसिक असंतुला, विस्मरण, शारीरिक व्याधींनी जरजर असणाऱ्या आजींना सांभाळणे कुटुंब सदस्यांनाही जिकरीचे झाले होते. भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती हेच सांगत होती की, 'देवाने लवकर घेऊन जावे', त्यांच्या देहावसानाचा निरोप आला. हायसे वाटले. 'सुटल्या एकदाच्या', नकळत शब्द उमटले. सांगायची गोष्ट ही की त्या आजीच्या सूनबाई अंत्यविधीच्या वेळी, "माझ्या आई गेल्या..., आता कुणाला आई म्हणून..., कशी राहू आई शिवाय..." असे म्हणून जोरजोरात रडत होत्या. त्यांचा तो विलाप पाहून गर्दीतील महिलांचा सुर उमटला, "खूप केलं पोरींन, किती रडते बिचारी".
खरं तर महात्रया रा यांच्या दृष्टिकोनातून हे भावनिक नाट्य. कारण त्यांची सुश्रुषा करताना वर्षभर नाकीन आलेल्या आणि आजीचा त्रास पाहून दुःखी होणाऱ्या परिवारासाठी आजीची या दुःखातून सुटका झाली हीच मनोमन भावना असावी, पण समाजात वावरत असताना भावना आणि भावनिक नाट्य ह्या प्रसंग पाहून व्यक्त केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत असाच प्रत्येक येतो.
'सहानुभूती' आणि 'सोबत' या दोन्ही गोष्टी शिवाय मानव समाधान पावत नाही. स्वतःभोवती काही नियमावलींची तटबंदी उभारून त्यात स्वतःला सुरक्षित समजणारा माणूस, 'लोक काय म्हणतात' यासाठी बरेचदा, बरेच संकेत पाळत, स्वतःला समाजात मिरवत असतो. पण ही असमंजस संकेताची पाळणूक बरेचदा 'समूहाची भावना' म्हणून प्रसरण पावते आणि 'ते करावंच लागतं', अशा अतर्क्य परंपरांना आपण समाज संकेत म्हणून मान्यता देतो. यातूनच विशिष्ट भावना 'असणे- नसणे' त्याहीपेक्षा ती 'दाखवणे' याला जास्त महत्त्व प्राप्त होत जाते.
नुकतीच माझ्या सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या एका घरात चोरी झाली. बऱ्याच सोन्यानाण्यासह मुद्देमाल चोरीला गेला. त्या घरमालकिन बाई घरी आल्याआल्या, घडलेल्या प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्याप्रसंगी कुठलाही आकांत तांडव न करता तिने नवऱ्याला कळवले. तो आल्यानंतर दोघांनी पोलीस स्टेशनला जाऊन चोरीची तक्रार नोंदविली. या घटनेनंतर दोन-तीन दिवसात त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा नियोजित कार्यक्रम होता. अत्यंत आनंदाने त्या कुटुंबाने तो आनंद सोहळा साजरा केला. पण कार्यक्रमात येणाऱ्या निमंत्रितांना मात्र त्या कार्यक्रमाचा निस्पृह आनंद घेता आला नाही. कारण येणाऱ्या प्रत्येकाला त्या हसतमुख जोडप्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की त्यांच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेची आठवण होऊ लागली. "इतके नुकसान झाले तरी हे दोघे कसे काय एवढे आनंदी? " इथपासून तर, "मला वाटतं काही सोनबीन चोरीला गेलं नसावं, उगाच दुसऱ्याची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटे बोलते ही बया", इथपर्यंत गटागटाणे होणाऱ्या मंद आवाजातील कुजबुजीची मजल गेली. काहींनी तर न राहून सरळ विचारून टाकलं, "अहो एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसान झाल्यानंतरही तुम्ही या कार्यक्रमाचा खर्च कसा काय केला बुवा? कसं करवलं तुमच्याकडनं हे?". अशा कुत्सिक प्रश्नांना, "होय राव, पण किती दिवस दुःख करणार", असे संयमाने उत्तर देणाऱ्या त्या जोडप्याच्या आनंदात समाज मनाने का आनंदी होऊ नये हे एक कोडेच!
भरून निघणाऱ्या आर्थिक नुकसान किंवा पुन्हा प्रयत्नाने मिळवता येऊ शकणाऱ्या बऱ्याच घटनांच्या वेळी अनुभवाचे चटके खाऊन, विचाराची दृढता आलेले लोक संयमाने सामोरे जाताना दिसतात. एखादी वेळी नोकरी गेली तरी फार दुःखी होत बसण्यापेक्षा दुसरी नोकरी शोधावी असं समंजसपणे विचार करून वागणारे लोक आहेत. झाला मुलगा नापास म्हणून काय झालं? पुन्हा प्रयत्न करेल, उगाच अकांता नको म्हणून अतिशय समंजसपणे मुलाला भावनिक आधार देणाऱ्या आई वडील सुद्धा दिसतात. असे बरेच प्रसंग सांगता येतील प्रत्येकाच्या जगण्यात चढ-उतार हे येतच असतात कधी आनंदाची उत्साहाची हिरवळ चहू बाजूने पसरते तर कधी अपयश, नैराश्य, आजारपण, अपेक्षाभंग यासारखे काळे ढग डोईवर गिरट्या घालतात. या बऱ्या वाईट प्रसंगांना माणूस नियंत्रित करतो. पण मृत्यू सारख्या प्रसंगी नियंत्रित भावनांच्या रथावर बसून तो काळ पार करणे वाटते तेवढे सोपे नसते.
येथे आठवण होते ती गझल सम्राट सन्माननीय सुरेश भट आणि सन्माननीय द्वादशीवार यांच्यातील एक हृदय प्रसंगाची. कविवर्य सुरेश भट यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. त्या प्रसंगी द्वादशीवारांनी भट साहेबांना फोन केला, म्हणाले, "अरे काय ऐकतोय मी, आत्ता नानासाहेब सांगत होते..." त्यांचं बोलणं अर्ध्यावर थांबत भट साहेब म्हणाले, "झाले ते जाऊ दे, तो आता कधी परत यायचा नाही पण तुला सांगतो, मी आजच एक अप्रतिम गझल लिहिली, ती आधी ऐक", याही अवस्थेत भटांनी फोनवर आपली नवी गझल द्वादशीवारांना गाऊन ऐकवली. ते स्वतःला सांभाळत कसेबसे ऐकत राहिले. गझल संपताच म्हणाले, "बेस्ट अरे पण..." असे म्हणून पुढे द्वादशीवारांना बोलवेना. त्यावर कवी श्रेष्ठ म्हणाले, "पत्रकार असून तू असा कसा रे हळवा?"
असे भावनिक नियोजनाचे कसब अवगत असणारे महान विभूती विरळाच. आज पेज थ्रीच्या काळात भावनिक नियोजनापेक्षा त्याच्या प्रदर्शनाची सवय जास्त वृद्धिंगत होताना दिसते. मग ती आर्थिक भावना असो, धार्मिक भावना असो की सामाजिक भावना असो. कपड्यांपासून डिग्रीपर्यंत, घरापासून गाडीपर्यंत प्रत्येक गोष्ट 'गरज' आणि 'सोयी'पेक्षाही 'दाखवण्यासाठी' जास्त केली जाते की काय असे कधी कधी वाटून जाते. ही भावनिक नाट्यमयता तरुणाईच्या नसानसामध्ये एखाद्या विषाणू प्रमाणे भिनली आहे.
आपला काळ आठवला की वाटतं लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यात वर्ष निघून जायचं पण ते समजून घेणे भावनिक पातळीवर, प्रत्येकाचे आपल्या परी असायचे. पण हल्ली लग्न झाल्या झाल्या अपेक्षांची यादी डोक्यावर काढते. अमुक पद्धतीने अभिनंदन केलं नाही, तमुक ठिकाणी नेलं नाही, ते खरेदी केलं नाही असल्या शिल्लक कारणावरून बोलता बोलता विभक्त होणाऱ्या या पिढीचे आश्चर्य वाटतं. स्वतःच्या आत्महत्तीचे चित्रीकरण, विभक्त झाल्याची वार्ता चित्रीकरण करून समाज माध्यमांवर टाकणे अशा विचित्र भावनिक दुव्हीदेत अडकलेल्या या पिढीला, या नाट्य पेचातून काढून त्यांच्या अंतर्मनात भावनांची रुजवाई कशी करता येईल ही खरंच एक जटिल बाब आहे.
एखाद्याची दुःखद प्रसंगी घेतलेली भेट असो, की एखाद्यास केलेलं सांत्वन असो, नातं आणि आजी आजोबाला चे घेतलेले आशीर्वाद किंवा एखाद्या आनंदी प्रसंगी वृद्धाश्रमाची घेतलेली भेट प्रत्येक गोष्ट ही समाज माध्यमांवर प्रदर्शित केली जाते.
हे सगळं बघून समाजाने तसं करावं ही भावना त्यामागे असेल की 'आम्ही हे केलंय' हे दाखवण्यासाठी केलेलं ते प्रदर्शन असेल, यातला कुठला भाव त्या प्रदर्शन कर्त्याच्या मनात असेल याचा थांग लावणे जरा कठीणच.
आणि त्यातल्या त्यात एखाद्या भावनिक प्रसंगी ती व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात किती संयमाने, त्या प्रसंगास सामोरे जात असेल हे सुद्धा सांगता येणे कठीणच.

मंजुषा संजय कऊटकर,
8007189509.

  • Log in or register to post comments
  • 13 views

प्रतिसाद (1)

खूप खूप धन्यवाद

Manjusha sanja…

गुरुवार, November 26, 2026 - 21:03
Permalink
New

खूप खूप धन्यवाद

  • Log in or register to post comments
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Manjusha sanja…
  • admin
  • भालचंद्र डंभे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 90 *
Who's new नवीन सदस्य
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    11 minutes 20 seconds ago
  • धन्यवाद
    12 minutes 12 seconds ago
  • खूप खूप धन्यवाद
    28 minutes 54 seconds ago
  • धन्यवाद
    36 minutes 32 seconds ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    2 hours 4 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कापूस काचली 7
दुष्काळ... 7
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : वर्ष ९ वे 7
शेतकर्‍यांची प्रति विधानसभा 7
एवढा मोठा नांगूर... 7
५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, पैठण : कार्यक्रमपत्रिका 7
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 7
शेतमालाचा भाव 7
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 7
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 7
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 7
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 6
शेतकरी पात्रता निकष 6
पोळ्याच्या झडत्या 6
तुझ्यापायीच झाली ही दैना 6
मातृत्वाचा शृंगाररस 6
विदर्भाची कन्याकुमारी - शेगावचे आनंदसागर 6
नको फास घेऊ! 6
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 6
रे नववर्षा 6
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,275
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,163
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,755
वादळाची जात अण्णा 31,528
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,522
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,408
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,265
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,181
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,900
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,969
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,903
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,512
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,968
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,910
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,009
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,618
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,479
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,989
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,813
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,285
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini