Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

शेती गेली एकांतवासात.

Main page content

By Subhash.patil | 12:08 AM IST, गुरू November 26, 2026
ललितलेख

शेती गेली एकांतवासात .
साधारणतः दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. हिवाळ्याचे दिवस होते, रविवारच्या दिवशी फेरफटका मारण्यासाठी शेतात गेलो.सगळ्या शेतातून फिरावं म्हणून शेतात गेलो होतो . शेतात गहू हरभरा पेरलेला होता. हरभऱ्याची दोन-तीन झाडे हातात घेतली व खात खात सर्व रानातून चक्कर मारल्यानंतर पाणी पिऊन तीन चार वाजेच्या सुमारास शेतातच खाली बसलो. थोड्या वेळाने आडवा झालो,आणि थोडीशी झोप लागली. झोपेत असताना मला स्वप्न पडले आणि स्वप्नातच शेती बोलू लागली.
शेती माझ्याजवळ बसली होती आणि माझ्याशी बोलू लागली होती, बोलता बोलता आपले दुःख सांगण्याचा प्रयत्न करत होती .पुढे ती म्हणाली माझी अवस्था सासरी गेलेल्या सासरवासीन मुलीप्रमाणे झाली आहे. सासरी गेल्यावर मुलगी जशी एका बाजूला बसते.आणि सासरकडील मंडळी एका बाजूला बसते .तिला त्या घरात अनोळखी असल्यासारखे वाटते .आज मलाही माझ्याच घरात एकाकी वाटत आहे आधुनिकतेच्या नावाखाली तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या नावाखाली माझ्याकडे येणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन बदलला. माझ्याकडे जसा पक्षांचा थवा,जसा प्राण्यांचा घोळका तशी माणसे,बाया, मुले काम करण्यासाठी शेतात यायचे,आणि शेतीची कामे करायची.आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली माझ्याकडे हळुवारपणे शेतावर येणाऱ्या माणसांची संख्या कमी झाली, आणि आज कोणीच माझ्याकडे येत नाही पुढे शेती थोड्या रडक्या आवाजात पुढे बोलू लागली. म्हणाली शेतीमध्ये ज्या गोष्टी निर्माण होत होत्या त्या गोष्टी लय उपयोगाच्या होत्या उपयोग कमी होत गेल्यामुळे मला एकांत वासात गेल्यासारखे वाटते. माझे दुःख ऐकण्यासाठी कोणी येत नाही . माझ्यासारख्या कित्येक शेतजमिनी ह्या एकांत वासात जात आहेत याची प्रमुख कारणे कारणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे
पेरणी :
पूर्वी वावराची पेरणी करण्यासाठी आठ ते दहा लोकांची आवश्यकता होती. त्यावेळी संपूर्ण लहान मुलांसह शेतामध्ये येत होती.त्यांचा गोंधळ पक्षांच्या किलबिलाटासारखा वाटत होता. आज तांत्रिकीकरणामुळे एक व्यक्ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करून जातो. म्हणून मला एकाकी वाटत आहे.
निंदनी, फवारणी :
पेरणीनंतर सर्व बाया पोरं शेतामध्ये पिकांची निंदणी करण्यासाठी येत होत्या.त्यांच्या गप्पा गोष्टींनी, मायबोलीतल्या गाण्यांनी सारे वावर आनंदी होत होते.परंतु आज तननाशकाचा व कीटकनाशकाच्या फवारणीमुळे तीही आता द्रोणच्या साह्याने केली जाते. त्यामुळे शेताकडे कोणीही येत नाही, आणि शेवटी मला या शेतामध्ये एकाकीपणाची जाणीव होते.
कापणी मळणी :
पूर्वी शेतातील मालांची कापणी,सोंगणी मजुराच्या साह्याने होत होती. त्यामुळे मळणी हाताने, बैलाच्या साह्याने होत असल्यामुळे शेतीमध्ये लगबग दिसून येत होती. आता हार्वेस्टरच्या साह्याने कापणी व ट्रॅक्टरच्या साह्याने मळणी होत असल्यामुळे शेतीमध्ये मजुरांची संख्या कमी होत चालली आणि त्यामुळे मला एकाकी वाटत आहे.
जनावरांची संख्या कमी झाली:
सोयाबीन सारखी पिके आल्यामुळे व तन नाशकाचा वापर होत असल्यामुळे जनावरांची, बैलांची संख्या कमी झाली. बैलांच्या घुंगरांचा ,टाळांचा आवाज आता कानावर येत नाही , आणि मला एकाकीपणाची सवय झाल्याचा भास होत नाही तर प्रत्यक्षात एकाकी असल्याचे वाटते
सरपन, जळतन :
पूर्वी स्वयंपाकासाठी, पाणी तापवण्यासाठी लाकडांचा, पराटींचा, तुराट्यांचा वापर केला जात असे . त्याच्यासाठी सरपन गोळा करणाऱ्या बाया शेतात यायच्या. आता गॅस सिलेंडर आल्यामुळे त्या बायांची वावरात येण्याची संख्या कमी झाली माझे दुःख सांगण्यासाठी आज घडीला शेतात कोणीही येत नाही.
यावरील सर्व कारणामुळे शेती करण्यासाठी बाया माणसांची आवश्यकता कमी झाली जंगले कमी झाली पशुपक्ष्यांची जनावरांची संख्या कमी झाली आणि अशाच पद्धतीने मला एकांत वासात राहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

  • Log in or register to post comments
  • 8 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Manjusha sanja…
  • admin
  • भालचंद्र डंभे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 42 *
Who's new नवीन सदस्य
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप खूप धन्यवाद
    1 minute 1 second ago
  • धन्यवाद
    8 minutes 39 seconds ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    1 hour 36 minutes ago
  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    5 hours 34 minutes ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    7 hours 45 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
एवढा मोठा नांगूर... 7
५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, पैठण : कार्यक्रमपत्रिका 7
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 7
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 7
शेतमालाचा भाव 7
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 7
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 7
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 7
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 6
शेतकरी पात्रता निकष 6
पोळ्याच्या झडत्या 6
तुझ्यापायीच झाली ही दैना 6
मातृत्वाचा शृंगाररस 6
विदर्भाची कन्याकुमारी - शेगावचे आनंदसागर 6
नको फास घेऊ! 6
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 6
रे नववर्षा 6
कापूस काचली 6
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४) 6
उजेडाचा पाठलाग.. 6
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,274
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,163
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,755
वादळाची जात अण्णा 31,528
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,521
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,407
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,264
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,181
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,896
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,969
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,903
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,512
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,968
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,905
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,009
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,618
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,479
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,988
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,813
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,285
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini