Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

मातीमोल आयुष्य

Main page content

By Pratibha | 6:40 PM IST, शुक्र September 27, 2019
कथा

गद्यलेखन स्पर्धा - २०१९
विभाग : कथा : कर्जाच्या विळख्यात शेती
मातीमोल आयुष्य

विठोबा ! नावासारखाच साक्षात विठुमाऊलीच रूप ! सावळा रंग , कंबरेला सफेद धोतर , पायात कोल्हापुरी आपल , अगदी साधी राहणी . दिवसभर शेतात राब - राब राबायचे आणि संध्याकाळी विठोबाच्या देवळात भजनाला हजर राहायचे . रात्री चटणी - भाकरी खाऊन , हाताची उशी करून , फाटलेली गोधडी पांघरून झोपी जायचे . हा विठोबाचा रोजचा दिनक्रम . आणि यात त्याच कुटुंब त्याची साथ द्यायचा . त्याची बायको जणा आणि दोन मुलं महेश , रुपाली . खूप गोड कुटुंब .

विठोबाचे जीवन बऱ्यापैकी चालले होते . दोन वेळची भाकरी , अंग झाकण्यापुरते कपडे , घरखर्च कसाबसा भागत होता . विठोबा खूप मेहनती होता . त्याची बायको जणा घर व्यवस्थितरित्या सांभाळायची त्याबरोबरच शेतीच्या कामातही त्याला मदत करायची . असा एकमेकांना आधार देत त्यांचा संसार सुखाचा चालला होता . महेश आणि रुपाली गावातल्या सरकारी शाळेत शिकत होती . दोघे मन लावून शिकत होती .

पण म्हणतात ना की देव प्रत्येकाची परीक्षा बघत असतो किंवा असही म्हणता येईल की या सुखी संसाराला बहुतेक कोणाचीतरी नजर लागली असावी . त्या वर्षी पावसाने हजेरी लावलीच नाही . दुसऱ्या सगळ्या शेतकऱ्यांसारखे विठोबाही शेतात बैलजोडी जुंपून शेत जोतायच्या तयारीत होता . जवळ - जवळ पूर्ण शेत जोतून तयार झाले होते . आता फक्त पाऊसरायाच्या आगमनाकडे डोळे लागले होते . एकदा का पाऊस पडला की बिया पेरणीचे काम सुरू करण्याच्या तयारीत विठोबाच नाही तर गावचे सगळेच शेतकरी होते . परंतू पाऊस विठोबाच्या गावचा रस्ता विसरला होता बहुतेक ! मधेच कुठेतरी वस्तीला राहीला असावा . आकाशाकडे नजर लावून सगळ्यांचेच डोळे थकले होते . पण पाऊसराया काही दर्शन द्यावयास तयार नव्हता . का झाले असावे असे ? आधी असे कधीच घडले नव्हते . उशिरा का होईना , पाऊस आपली हजेरी लावायचाच . पण शेत जोतून एक महिना उलटला तरी आकाशात काळे ढग काही दिसेनात . आता मात्र विठोबासह गावातल्या प्रत्येक शेतक-याच्या मनात धडकी भरली आणि सगळ्यांना दुष्काळाची भीती सतावू लागली . पण कोणी बोलून दाखवत नव्हत , कारण अजून कोणी आशा सोडली नव्हती .

दोन महिने उलटले . आता मात्र विठोबाला काळजी वाटू लागली . शेतात जमिनीला भेगा पडल्या होत्या . गावातल्या तळयाचे , विहीरीचे पाणी आटून गेले होते . पाण्यासाठी गावकरी वणवण फिरत होते . दोन - तीन किलोमीटर अंतर चालून पाणी भरून आणत होते . जनावरही चारा आणि पाण्याविना अर्धमेली झाली होती . आपल्या सर्जा - राजाच्या काळजीने विठोबाला रात्र - रात्र झोप लागत नव्हती . त्यांना सुकलेला चारा का होईना तो पुरवत होता . पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत होता . कारण सर्जा - राजा ही विठोबासाठी फक्त बैलजोडी नाही तर त्याच्या कुटुंबाचा भाग होता . त्यांच्या जीवावरच इतकी वर्षे विठोबा शेतीची कामे पूर्ण करायचा . आता अशा कठीण परिस्थितीत त्यांची काळजी घेणे हे त्याचे कर्त्तव्य होते . घरात बायको - पोरांची स्थितीही बिकट होती . दोन वेळेचे अन्न शिजवण्यासाठी सुद्धा कष्ट पडत होते . जणा खूप हिंमतीने परिस्थिती सांभाळत होती .

घरातील धान्य संपले होते . त्या दिवशी जणाच्या डोळ्यांत अश्रु काठोकाठ भरले होते . कधी नव्हे ती अशी वाईट वेळ तिच्या कुटुंबावर , गावावर आणि प्रियजनांवर ओढवली होती . विठोबाला जेव्हा हे समजले , एका क्षणासाठी त्याला काय करावं ते सुचेना . मग शेवटी काहीतरी विचार करत तो घराबाहेर पडला आणि थेट जमीनदाराच्या घरासमोर येऊन थांबला . त्याच्या आधीच काही शेतकरी आणि गावकरी जमीनदाराकडून काही मदत मिळते का या आशेने तिथे जमले होते . पण नंतर त्याला समजले की काहीतरी गहाण ठेवले तरच जमीनदार पैसे किंवा धन - धान्य देणार . ही खूप गंभीर बाब होती . जमीनदार अशा अडचणीच्या काळातही गावकऱ्यांचा फायदा उठवण्यास धजत नव्हता . विठोबाला एका क्षणासाठी जमीनदाराचा खूप राग आला . पण काय करणार ? दुष्काळामुळे सगळ्यांचेच हात - पाय बांधले गेले होते . विठोबा त्याच क्षणी घरी परतला . त्याने जणाच्या सोन्याच्या कानातल्या कुडया कापडात गुंडाळल्या आणि जमीनदाराकडे जायला निघाला. जणाच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह उमटले , पण तिने तोंडातून चकार शब्दही काढला नाही . तिला बहुतेक परिस्थितीचा अंदाज आला असावा . विठोबा लगोलग जमीनदाराकडे पोहोचला आणि दागिने गहाण टाकून पैसे घेऊन आला . येताना वाण्याकडून घरासाठी लागणारे जिन्नस घेऊन आला . त्याबरोबरच मुलांना खाऊ , कपडे , शाळेच्या उपयोगाचे साहित्य आणि मुख्य म्हणजे सर्जा - राजासाठी हिरवा चारा ! थोडया वेळासाठी का होईना सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून विठोबाला समाधान वाटले . पण एका विचाराने त्याचे मन धजावले आणि ते म्हणजे हे असे किती दिवस चालणार ? दिवसेंदिवस परिस्थिती अजूनही गंभीर होत चालली होती . घर - दार , बायको - मुले आणि आपल्या जनावरांना दुष्काळाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी विठोबाने एक - एक करत जणाचे सगळे दागिने गहाण ठेवले . घरातील तांब्या- पितळेची भांडीही विकली . शेवटी एक दिवस असा आला की ज्या दिवशी विठोबाने जमीनदाराकडे आपली काळी आई , आपल्या जमिनीचा तुकडा गहाण टाकला . जणाने खूप अडवले पण विठोबाला हे हलाखीचे दिवस पाहवत नव्हते . तो आपल्या परिवारासाठी स्वतःचा जीव देण्यासही तयार होता . पण जीव द्यायची वेळ विठोबाच्या जीवनात लवकरच येईल असे त्याला , जणाला किंवा त्याच्या मुलांना स्वप्नातही वाटले नव्हते .

सर्जा - राजाची हालत मुबलक प्रमाणात खाद्य आणि पाणी न मिळाल्यामुळे खूपच खंगून गेली होती . आखिर त्या दोघांनी आपले प्राण सोडून दिले . विठोबा त्या दिवशी दोघांच्या गळ्यात पडून खूप रडला . जणा आणि पोरांचीही आसव थांबायचे नाव घेत नव्हती . कारण त्यांच्या परिवाराचे सर्वात प्रिय सदस्य दुरावले गेले होते . त्यांच्या अशा जाण्याने विठोबा पूर्णपणे खचून गेला . त्याच्या डोळ्यांसमोरून थांबायच - राजाचे चेहरे काही करून हटत नव्हते . त्यांच्या आठवणींनी विठोबाचे काळीज तुटायचे .

कर्जाचा डोंगर विठोबाच्या मानगुटीवर बसला होता . रात्र - रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळे लागत नव्हते . कधी झोप लागलीच तर दचकून जागा व्हायचा . विठोबाचे धैर्य संपत चालले होते . त्याचा आत्मविश्वास जवळ - जवळ संपुष्टात आला होता . जणाला हे सगळे कळत होते . ती आपल्या नवऱ्याला खूप जपत होती . समजावत होती की ही परिस्थिती अशीच राहणार नाही . लवकरच बदलाव येईल . पाऊसराया आपल्यावर कृपादृष्टी जरूर दाखवेल . काळी आई पुन्हा आपल्या लेकरांना कुशीत घेईल . हिरवाईने आपले जीवनही हिरवगार होईल . पण विठोबाला जणाचे बोलणे स्वप्नगत वाटायचे . हे सुंदर स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही , अशी त्याच्या मनाची खात्री पटली होती . अशाच विचारांनीशी खूप उशिरा त्याचे डोळे लागले .

दुस-या दिवशी विठोबा पहाटेच उठला . जणा आणि मुले अजून झोपली होती . ते सुकलेले चेहरे पाहून विठोबाच्या डोळ्यांत पाणी भरून आले . किती समाधानी जीवन तो जगत होता . पण हे काय होऊन बसले ! निसर्गाचे चक्र इतक्या वाईट रीतीने फिरेल असे त्याला कधीच वाटले नव्हते . तो निसर्गासमोर हरला होता . अंथरूणातून उठून लगबगीने आपल्या शेताकडे चालू लागला . मनात हजारो गोष्टींनी थैमान घातले होते . विचारांच्या तंद्रीत असतानाच तो शेतावर येऊन पोहोचला . तिथे पोहोचताक्षणी काळ्या आईची दुष्काळामुळे झालेली परिस्थिती बघून त्याने जोरात टाहो फोडला . त्याचे आक्रंदन ऐकायला आसपास कुणीच नव्हते . त्याचे रडणे , ओरडणे हवेत विरघळून गेले .

विठोबाच्या शेताच्या बांधावरती वडाचे एक झाड होते . पाऊस न पडल्यामुळे झाड सुकून सगळी पाने केव्हाची गळून गेली होती . विठोबाला एका क्षणासाठी वाटले की त्याची प्रतिकृतीच त्याच्यासमोर उभी आहे . प्रतिकृती - सुकलेली , वाळलेली ! त्याने धावत जाऊन झाडाला घट्ट मिठी मारली . परिस्थितीने जार - जार झालेले धोतर जे त्याने कंबरेवर लपेटले होते , झटकन कमरेवरून काढले आणि झाडाला बांधून त्याचा फास बनवला . तो फास स्वतःच्या गळ्यात अडकवला अन् शरीर झोकून दिले . क्षणार्धात सगळे संपून गेले . सगळी स्वप्ने , आश्वासने , जगण्याची आशा ! सगळेच काही ! गावकऱ्यांकडून ही बातमी जेव्हा जणाला कळाली , आधी तिला विश्वासच बसला नाही . ती वेडयासारखी शेताकडे धावत सुटली आणि तिच्या मागून मुलेही धावली . प्रत्यक्षात ते दृश्य बघून जणा बेशुद्ध होऊन धरतीवर कोसळली . दोन्ही मुले खूप घाबरली होती . त्यांना काय करावे काही कळत नव्हते . आईला उठवायचा प्रयत्न करत होती , रडत होती . आणि हे सर्व बघता तिथे जमलेल्या गावकऱ्यांचे काळीज तुटत होते . कारण काळया मातीचा पुत्र अखेर मातीत एकरूप झाला होता . क्षणार्धात विठोबाचे आणि त्याच्या कुटुंबाचे अख्खे आयुष्य मातीमोल झाले होते .

प्रतिभा
कथेविषयी

Pratibha

शुक्रवार, September 27, 2019 - 18:41
Permalink
New
  • Log in or register to post comments
कथेविषयी

Pratibha

शुक्रवार, September 27, 2019 - 18:42
Permalink
New
  • Log in or register to post comments
कथा वाचून अभिप्राय जरूर कळवा

Pratibha

शुक्रवार, September 27, 2019 - 18:46
Permalink
New
  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शुक्रवार, September 27, 2019 - 21:44
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

  • Log in or register to post comments
धन्यवाद

Pratibha

शनीवार, September 28, 2019 - 13:17
Permalink
New

धन्यवाद

  • Log in or register to post comments
स्पर्धाविजेती प्रवेशिका.

गंगाधर मुटे

शुक्रवार, January 3, 2020 - 21:50
Permalink
New

स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
*congrats* :congrats:
*bq* *bq*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7617 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Rutuja Bane

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 12 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 3 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 3 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 3 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 3 hours ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    2 days 4 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 7
वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन 7
जागर 7
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 7
गझल :शेती चरून गेली. 7
उठ शेतकऱ्या, घे मशाल 7
शेतकऱ्याची व्यथा 7
मातीच्या कुशीत रुजलेले स्वप्न 7
रानी चा पाऊस अन्- ती 7
प्रतिनिधी नोंदणी : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 7
२ रे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन 7
ऋतू रुसला 7
नागपुरी तडका - ई पुस्तक 7
पाऊस पडतो तरी कसा! 7
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल 7
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 6
तुझ्यापायीच झाली ही दैना 6
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 6
फसगत 6
शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर 6

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,122
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,831
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,747
वादळाची जात अण्णा 31,519
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,193
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,163
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 30,966
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,839
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,329
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,942
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,492
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,318
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,997
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,596
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,464
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,985
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,791
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,258

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini